कविता

Submitted by मी मीरा on 26 September, 2017 - 05:44

कुटुंब / फॅमिली

काळोखी नकारात्मक रात्र पार करून मिळणारी सुखाची रम्य पहाट
म्हणजे फॅमिली
रणरणत्या उन्हातून परतून प्रेमाच्या सावलीत मिळणारा निवांतपणा
म्हणजे फॅमिली
तहानलेल्या घश्याला गोड थंडगार पाण्याने मिळणारी शांती
म्हणजे फॅमिली
थंड हवेच्या झोकात कधी तरी हवी असणारी मऊ ऊबदार जाणीव
म्हणजे फॅमिली
बाहेरच्या कटकटीतून सुटल्यावर मनाचा आवडता विरंगुळा
म्हणजे फॅमिली
पैश्याच्या मागे धावून दमल्यावर पाहिजे असणारा एकमेव निवारा
म्हणजे फॅमिली
काहीही न मागता सगळे मिळणारे खात्रीचे हक्काचे ठिकाण
म्हणजे फॅमिली

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त

काहीही न मागता सगळे मिळणारे खात्रीचे हक्काचे ठिकाण
म्हणजे फॅमिली >>>> +१

छान Happy