दिशा प्रेमरंगांनी खुलल्या

Submitted by प्रणय. on 25 September, 2017 - 10:05

ती आवडणारी मैत्रिण
सोबत माझ्या वावरली
प्रपोज केल्यावर ठरवून
थोडं घाबरून बावरली ॥धृ॥

सौंदर्य उधळते बघून
प्रेमात पडलो होतो
घायाळ तिच्या नजरेनं
अलगद फसलो होतो ॥१॥

मनी ध्यानी नसताना
मैत्री जुळवूनी आणली
काळ हळू लोटताना
बहरून किती आली ॥२॥

कोमल हळव्या क्षणांनी
अगणित आठवणी दिल्या
सांजवेळी हात गुंफूनी
दिशा प्रेमरंगांनी खुलल्या ॥३॥

घरी दोघांनी सांगताना
धांदल आमुची उडाली
घरी प्रेमासाठी भांडताना
दिशा दोघांनी ठरवली ॥४॥

ठरवून घर सोडताना
आपले हातून निसटले
ऊभा संसार करताना
कष्टांना दोघांनी उपसले ॥५॥

झुलतो झोपाळी सुखाच्या
संघर्षक्षण संपूनी गेले
संसार वेलीवर आमुच्या
चैतन्य इवलेसे उमलले ॥६॥

–प्रणय.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा प्रणयजी.. आज प्रेम कवितांची बरसातच केलीत मायबोलीवर.. खूप छान..
पुढील लेखनास शुभेच्छा !!!