गडबड

Submitted by वैशाली अ वर्तक on 24 September, 2017 - 08:55

कविते साठी दिलेला शब्द "गडबड" त्या शब्दावरील कविता
गडबड 6/9/17
करू नका जरा ही "गडबड"
देती आदेश सतत वरचेवर
पण ,सणवार वा कार्यात काय?
गडबड होतेच ना ऐनवेळेवर ,
न सांगता, न बोलता, होतेच गडबड.

बाहेर गावीं जाण्यास
करुनी तयारी तपशील वार
विचाराने संपविता , सर्व काम
पण, विस्मृती करतेच गडबड
अन् ,शेवटक्षणी उडते तारांबळ.

कार्यक्रमाचे करुनी आयोजन
सगळे असता नीट सुसज्ज
पण, अध्यक्ष महाशयच
न आल्याने ,ठरल्या वेळेवर
खोळंबा होऊन, शेवटी पुन्हा.... गडबडच.

अचानक येता पावसाची सर
झाली गडबड ,माजला की गोंधळ
छत्री असूनी दिसेना जागेवर
ओले होणे ,आले जीवावर
वस्तूची किंमत कळते त्या वेळेवर .

गडबड ही कृतीच अशी
जी केल्या नंतर , वाटे मनीं
उगाचच केलीना गडबडघाई
जरा ,उसंत धरली असती
झाले नसते का, काम पटकनी?

गडबड ही स्वतःच स्त्रीलिंगी
तिचे वर्चस्व सदा दावी
कितीही करूनी जय्यत तयारी
धांधरट पणा तिचाच साथी
ऐनवेळी चुकाच घडवी.

गडबड ही कृतीच अशी
जी केल्या नंतर वाटे
उगाचच केली ना गडबड घाई!

वैशाली वर्तक

Group content visibility: 
Use group defaults