फसलेला डाव तुझा

Submitted by र।हुल on 20 September, 2017 - 16:38

तुझ्या नजरेत पुन्हा
मला गुंतायचं नाही
बघुनी तुला, गालांत
मला हसायचं नाही ॥१॥

सोडूनी गेलीस तेव्हा
पुन्हा आठवायचं नाही
आठवून तुला परत
मलाही हरवायचं नाही ॥२॥

वेदना माझी कुणाला
मला सांगायची नाही
सोडलेली आशा पुन्हा
मला धरायची नाही ॥३॥

प्रेमात कधी जिवनात
यापुढे पडायचं नाही
फसव्या वाटे वरूनी
मला चालायचं नाही ॥४॥

गळणारे आसू कधीच
कुणा दाखवायचे नाही
मनाला माझ्याच आता
मला समजवायचे नाही ॥५॥

फसलेला डाव तुझा
मला सावरायचा नाही
जोडलेला संसार माझा
मला उधळायचा नाही ॥६॥

―₹!हुल/ २१.९.१७

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेरी नाईस.. Happy
इतना इमोशनल नही होने का ...

गळणारे आसू कधीच
कुणा दाखवायचे नाही
मनाला माझ्याच आता
मला समजवायचे नाही ॥५

छान !