गाव
काल मी पाहिला स्वप्नात एक गाव
कल्पलेला होता, जसा माझ्या मनांत
चारी बाजूस तटबंदी डोंगर-माळ
जणू सज्ज उभी तयाच्या रक्षणास
तटबंदी टेकड्यांची, गट्टी जमे ढगांशी
खेळतांना मुसळधार ,पाऊस पाडण्याची
सर्वत्र डोलती हिरवी गार शिवारें
वा-याच्या झुळके वर नाचती माळराने
कृषीवल फिरवी समाधानी नजर
बैलांना झाली होती चा-याची चंगळ
शेतात लागलीय धान्याची रास
बैल गाड्या घेतील बाजारपेठत धाव
नजरेस नव्हते सिमेंट चे जंगल
टुमदार कौलारू घरे होती सुंदर
कोठे दिसत नव्हते वीजेचे जाळे
रात्री चमकणार होते आकाशात तारे
सारे गाव कसे स्वच्छ अन् निर्मळ
प्रदूषणला कुठे नव्हता , थारा कणभर
काल मी पाहिला स्वप्नात एक गाव
कल्पलेला होता जस्सा माझ्या मनांत
.......वैशाली वर्तक
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
sundar...
sundar...
छानच...
छानच...
हे स्वप्न कधि पुर्ण होईल ?
हे स्वप्न कधि पुर्ण होईल ?
छान लिहले आहे....