मन माझं भरले नव्हते....

Submitted by मीनल कुलकर्णी on 19 September, 2017 - 23:24

मन माझं भरलं नव्हतं....

जाता जाता पावसाचे
पाऊल होते अडले...
उरल्या सुरल्या सरींना
त्याने पुन्हा मागे धाडले..
यावर्षी सारे हिशेब
पुर्ण करुन जायचं होतं...
कुठली विहीर राहीली कोरडी
त्याला प्रत्यक्ष पहायचं होतं...
नद्या नाले झाडे पक्षी
सा-यांनाच विचारुन झालं...
कुठल्या डोहात , कोणत्या तळ्यात
पाणी साठवायचं राहून गेलं ?
शोधता शोधता अखेर पाऊस
माझ्या पाशी येऊन थबकला
थांब म्हणताच मी , खरतर
मनातुन होता पुरता हबकला...
मला म्हणाला ,असं कसं तू
सांगतेस अजून थोड थांब...
इतके दिवस बरसलो तरी,
कुठे चुकलो सांग ???
कसे सांगू पावसाला
त्याचं काही चुकलं नाही
त्याच्या भेटीला यावेळेस
एकही गाव मुकलं नाही
भरभरुन दिल त्याने
मग कां हे रितेपण सरलं नव्हतं ???.
धरणे सारी भरली तरीही
मन माझं भरलं नव्हतं...
मन माझं भरलं नव्हतं...
- मीनल

 

Group content visibility: 
Use group defaults

वाह अप्रतीम.... खुप सुंदर

कसे सांगू पावसाला
त्याचं काही चुकलं नाही
त्याच्या भेटीला यावेळेस
एकही गाव मुकलं नाही
भरभरुन दिल त्याने
मग कां हे रितेपण सरलं नव्हतं ???.
धरणे सारी भरली तरीही
मन माझं भरलं नव्हतं...
मन माझं भरलं नव्हतं... >>>>>>> speechless खुप छान

सुंदर! आवडली.
>> भरभरुन दिल त्याने
मग कां हे रितेपण सरलं नव्हतं ???.>>

>>भरभरून दिलं त्याने
तरी रितेपण सरलं नव्हतं???<<
असंही चाललं असतं.. Happy

Thanx everyone....thanku rahulji for the suggestion...

वाह...