रिकामा

Submitted by वैशाली अ वर्तक on 17 September, 2017 - 09:27

रिकामा
चिमण्या पाखरे गेली परदेशात
मिळविण्या उच्च शिक्षणास
तेथेच रमली , डाॕलरच्या दुनियेत
घरे तयांची , येथे ओसाड
आजीआजोबांना सदैव भेटीची आस.

प्रसंगावत येतात पाखरे
नंदनवना परि सजती घरे
जेव्हां परतती पाहुण्यापरी
ओकी दिसती तयांची घरकुले
पाणावती नयने तयांच्या आठवांने

आलो जरी या जगती
आपण सारे रिक्त हस्ते
कमविले धन मुठी-मुठी भरुनी
परतणे येथून रिकाम्याच हाते
स्थान मात्र मिळवावे अनेक हृदयांमधे

चांगल्या विचारांची वेसण
हवी रिकाम टेकड्या मनास
मग येत नाही म्हणण्यात
रिकामे मन , घर सैतानाचे खास
बोलणेच नुरते तुंबड्या लावी उगाच

अर्धा भरलेला पाहूनी ग्लास
भरावा हा पूर्ण , हीच आस
पण असा विचार न येई मनीं
तो पूर्ण रिकामा तर नाही ?
समाधानी वृत्ती असावी सदा मनांत

खरेदीला जाता रिकामे पाकीट
ठरते असून नसल्यागत
पण आजकालच्या युगात
प्लास्टिक मनी भरले तयात
पाऊले चालती काळाच्या ओघात

वैशाली वर्तक

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहीली. आवडली.
ताई, स्वतंत्र कडव्यांत रचना केली तर जास्त सुटसुटीत वाटेल. Happy

राहुल.....is it o k now?पोस्ट केलीमागे वळून पाहिलेच नाही कडवी तोडायची राहून गेली thank you again