शून्य !

Submitted by सेन्साय on 17 September, 2017 - 09:00

.

शून्य राहिलो अस्तित्व
गुंतत मनाच्या गुंत्यात
विसरलो माझाच मी
हरवुनि सारे कवित्व

नव्हे रेशिमाचे ते भावबंध
उरले इतस्तत: विरह काटे
क्रंदत मार्ग क्रमत राहिलो
गोंजारुनि खुडलेले मनस्कंद

ध्वस्त मन नीरव शांत
कालचक्र त्यात विसावले
कृष्णविवराच्या अंधारात
माझाच मी आता प्रSशांत

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ध्वस्त मन नीरव शांत
कालचक्र त्यात विसावले
कृष्णविवराच्या अंधारात
माझाच मी आता प्रSशांत...

खासच.....

ध्वस्त मन नीरव शांत
कालचक्र त्यात विसावले
कृष्णविवराच्या अंधारात
माझाच मी आता प्रSशांत...>>>
मस्तच आवडली कविता