संघर्ष : भाग ०३

Submitted by दिपक ०५ on 15 September, 2017 - 10:03

भाग ०२ पासून पुढे.

अनिकेतने सागर आणि प्रितीला घरी सोडून गाडी राधाच्या घराकडे वळवली अनिकेत काहीच बोलत नव्हता तशी राधाही मौन होती. गाडी घराबाहेर पार्क करून अनिकेत राधाला आत घेऊन गेला राधा खूप दमली होती त्याने तिला सोफ्यावर बसवून कॉफी प्यायला दिली. दिवस मावळत आला होता राधाला असं एकटं सोडून जाणं अनिकेतला योग्य वाटत नव्हतं त्याने परत प्रितीला फोन लावून स्थितीचा अंदाज देत राधाच्या घरी येण्यास सांगितलं. प्रितीने होकार दिला
अर्ध्या तासात प्रिती तेथे पोहोचली. राधा डोळे बंद करून आपल्या बेडवर पडली होती प्रितीचा आवाज ऐकून राधा उठून बाहेर आली अनिकेत आणि प्रिती गॅलरीत बसले होते राधा प्रितीच्या शेजारी येऊन बसली.
‘प्रिती, तू इथे?..’ राधाने विचारलं
‘अनिकेतने सांगितलं तुझे बाबा अजून आले नाहीत तू एकटीच आहेस.. म्हणून आले’
‘हम्म्म.. त्यांची उद्याची फ्लाईट आहे संध्याकाळ पर्यंत पोचतील’
राधाच्या स्थितीत थोडा सुधार दिसत होता. ती आपल्या फोनवर काहीतरी फोटोज् वगैरे बघत होती तशी एका फोटोवर तिची नजर येऊन थांबली तिने तो फोटो अनिकेतला दाखवला..
‘अनिकेत, हे बघ.. काही आठवतंय?’ राधाने कॉलेज मधील एक जुना फोटो दाखवला.
‘हो राधा.’ अनिकेतने होकारार्थी मान डोलावली.
‘किती गोड दिवस होते ना रे ते.. तू, मी, प्रिती, सागर, आनंद... आपणाला कशाचीही पर्वा नव्हती ना रे.. अगदी स्वतःची सुद्धा.. मनाला वाट्टेल तसं वागायचो ना आपण..’ त्यावेळी राधाच्या चेहऱ्यावरील भाव खूप काही व्यक्त करत होता तिच्या डोळ्यात अश्रूही होते आणि ओठावर हास्यही. अश्या अवघडलेल्या स्थितीत राधा बोलत होती अनिकेत आणि प्रिती राधाचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होते..
‘तुला आठवतंय, हीचा सागर एकदा त्या दगडू गँगशी भांडून आला होता..’
‘अगं भांडून कुठे?.. मार खाऊन आला होता म्हण.’ नकळत प्रिती बोलून गेली तसं राधाच्या चेहऱ्यावरही हास्य पसरलं.
‘ हम्म्म.. मग आनंदनी कसलं भारी चोपलं गं त्या दगडू गँगला.’
‘हो..’ प्रिती बिनधास्त हसत म्हणाली राधाही आता पूर्वीच्या रंगात दिसत होती. प्रिती आणि राधाच्या गप्पा हळूहळू रंगात येत होत्या..
‘ प्रिती, तुझं आणि सागरचं असं अचानक जुळेल अशी अपेक्षाही नव्हती कोणाला..’
‘अगं कोणाला काय? मला सुद्धा अपेक्षा नव्हती..’ प्रिती मस्त मोकळेपणाने बोलत होती राधाही जणू झालेला सगळा प्रकार विसरून तो क्षण एंजॉय करू लागली होती..
सागर आणि प्रितीच्या रिलेशनशिप नंतर आता राधाचं लक्ष अनिकेतकडे गेलं.
‘अनिकेत.. तू का नाही जुळवून घेतलंस रे कोणाशी?’ राधा उत्सुकतेनं विचारत होती. अनिकेतला अशा स्थितीत काय बोलावं तेच सुचत नव्हतं. आनंद ची बातमी कळून एक दिवसही पूर्ण झाला नव्हता त्यात राधा आणि प्रिती जणू काही झालंच असं वागत होत्या अश्यात तो काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला. अनिकेतच्या बहिणीचा फोन होता.. बहीण घरात एकटी आहे असं सांगून अनिकेत निरोप घेऊन तेथून निघाला..

राधाच्या अश्या बदलत्या वागण्याचं अनिकेतला खूप आश्चर्य वाटत होतं. पण इतक्यात काही गैरसमज डोक्यात आणनही त्याला योग्य वाटत नव्हतं.. डोक्यात विचारांचं प्रचंड ओझं घेऊन अनिकेत घरी पोहोचला.. त्याची लहान बहीण अनु बेडरूम मधे झोपली होती. दोन दिवसानंतर पोस्ट मोर्टम रिपोर्ट येणार होती त्यामुळे केसशी संबंधित कोणालाही आऊट ऑफ टाऊन जाण्याची परवानगी नव्हती.. रात्रभर आनंदच्या नकोनकोत्या आठवणी येऊन तगमग झाल्यानंतर त्याला कशीबशी झोप लागली..

त्याला सकाळी जाग आली ती मोबाईलची घंटी ऐकून.. मोबाईलची नोटिफिकेशन सूची चमकत होती. राधाचा मेसेज होता
‘हाय..’ अनिकेतने रिप्लाय दिला–
‘हाय, गुड मॉर्निंग..’ अनिकेतचा मेसेज जाताच राधा कडून लागोपाठ दोन–तीन मेसेज आले.
‘कुठं आहेस?’
‘१०:३० ला सेंट्रल कॅफेमध्ये येशील?’
‘सागर ही येतोय तिथेच.. मी प्रितीला घेऊन येते.. आणि हो, डोन्ट बी लेट अनिकेत.. काही महत्त्वाचं बोलायचं आहे’
अनिकेतला राधाचं अशा वेळी सगळ्यांना बोलवून असं कॅफेत भेटणं थोडं खटकलं होतं.. पण त्याच्याकडे जाण्याशिवाय दुसरा मार्ग ही नव्हता.
‘ओके.. आय विल बी देअर’ असा मेसेज पोच करून अनिकेत लगेच तातडीने उठून तयार झाला त्याने घड्याळावर नजर टाकली ०९:४५ झाले होते. बाहेर अनु कॉलेजला जाण्यासाठी तयार होऊन बसली होती. तीनं अनिकेतला हाक मारली
‘दादा.. माझी स्कुटी रिपेअरला दिली आहे, मला आज कॉलेज पर्यंत सोडशिल का?..’
‘हो.. पण लवकर चल, मला जरा महत्त्वाचं काम आहे’ अनिकेतने अनुला तिच्या कॉलेज समोर सोडून तो सेंट्रल कॅफेच्या दिशेने निघाला..

क्रमशः.....

Group content visibility: 
Use group defaults

छान,
उत्सुकता वाढलीय, लवकर टाका पुढील भाग.

छान,
उत्सुकता वाढलीय, लवकर टाका पुढील भाग.>>>+111

किट्टू२१, Vaibhavraj
प्रतिसाद देण्यासाठी धन्यवाद!.

छान,
उत्सुकता वाढलीय, लवकर टाका पुढील भाग.>>>+111

छान!!!!!!!
उत्सुकता वाढलीय, लवकर टाका पुढील भाग.