दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रद्धांजली. मला फार धक्का बसलेला आहे. आपण किती अनभिज्ञ असतो व कोषात जगतो. काल शनिवार, आरामात घालवला, दुपारी अगदी कॅजुअली ट्विटर उघडले तेव्हा थोडी फार कल्पना आली मग घाबरून एन डी टीव्ही बघितले तर वाइट बातमी खरीच होती. अकाली मृत्यू आलेल्या सर्वा ना मना पासून श्रद्धांजली.

सुलोचनाबाई, आदर्णीय व्यक्तीमत्व, ग्रेसफुल होत्या फार, घरातल्याच मोठ्या वाटायच्या. श्रद्धांजली.

सुलोचनाजी _/\_ मराठी चित्रपटांच्या मंदिरात दीर्घकाळ व शांतपणे तेवणारी एक ज्योत निमाली Sad अगदी माझ्या आजीच्या तोंडून त्यांची स्तुती ऐकली होती त्यालाही दशके लोटली. प्रसन्न आणि ममतेने ओतप्रोत भरलेले भाव असलेला तेजस्वी चेहरा होता. अशी व्यक्तिमत्वे इथून पुढे होणार नाहीत. त्या त्या काळाच्या मुशीतच ती घडलेली असतात. भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

बी आर चोप्राकृत महाभारतातले शकुनीमामा गुंफी पेंटल यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी दुःखद निधन झाले. भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

गुफी पेंटल!! श्रद्धांजली. _/\_
महाभारत मालिकेचे ते कास्टिंग डायरेक्टरही होते. मालिकेचा इतका मोठा लवाजमा होता, पण तरीही प्रत्येक पात्राला सुयोग्य अश्या अभिनेता/त्रीची निवड त्यांनी केली होती.

जुन्या काळातील प्रसिध्द पार्श्वगायिका शारदा (शारदा राजन) यांचे परवा १४ जून रोजी दुःखद निधन झाले. शंकर-जयकिशन यांचे संगीत असलेली त्यांनी गायिलेली अनेक गाणी प्रसिध्द आहेत. "तितली उडी", "जाने चमन शोला बदन", "देखो मेरा दिल मचल गया", "दुनिया की सैर कर लो" इत्यादी. श्रद्धांजली _/\_

Lithium-ion बॅटरीचा शोध लावणारे संशोधक आणि नोबेल पुरस्कार मिळालेले शास्त्रज्ञ John Goodenough यांचे वयाच्या १०० व्या वर्षी २५ जून रोजी निधन झाले. Li-ion बॅटरीच्या शोधामुळे लॅपटॉप, स्मार्ट फोन, इलेक्ट्रिक गाड्या अश्या अनेक ठिकाणी पोर्टेबल आणि कमी वजनाच्या बॅटरीची सोय झाली.

फारच भयंकर घडलं आहे हे. सकाळपासून याच संबंधित बातम्या आहेत न्यूजफीड मध्ये Sad निरपराध नागरिक, स्त्रिया, लहान मुले Sad _/\_

रवींद्र महाजनी यांना श्रद्धान्जली. माझा अतिशय आवडता हिरो आणि माझ्यामते मराठीतला आतापर्यंतचा सगळ्यात देखणा नट. यापुढेही एवढा देखणा नट मराठीला मिळेल असे वाटत नाही. मुंबईचा फौजदार त्यांच्यासाठी कितीतरी वेळा बघितला.

हँडसम हंक गेला !
भावपूर्ण श्रद्धांजली.

रमेश देव यांच्याप्रमाणे ते ही राजस्थानी होते. अरूण सरनाईक, रविंद्र महाजनी, रमेश देव, राजशेखर हे देखणे नट. एकही हयात नाही आता. Sad

Pages