पाऊस

Submitted by अक्षय. on 10 September, 2017 - 13:49

पाऊस तुझा माझा

पाऊस तुझा आणि माझा
आपल्या चिंब सोबतीचा
मुसळधार पाऊस सुसाट वारा
स्पर्शाने तुझ्या अंगावरी येई शहारा

चिंब मिठीत तुझ्या
व्हावे मन मोकळे
पहीले मिलन ते आपले
साक्षीस आभाळ सावळे

ओघळे थेंब गालावरी
स्पर्श तुझा ओठावरी
वाटते मला सारी
नशा ही जादूभरी

ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला
मंद-मंद असा सुवास आहे
आजही आठवतोय तोच पाऊस
अडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे
__अक्षय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वाह.!! खरचं पावसात भिजल्यासारख वाटलं अक्षय दादा..
जुन्या आठवणी ताज्या झाल्या..
खूपच सुरेख लिहिलय.

छान

छान!

सुंदर!

दीपक, कऊ, पंडितजी, राहुल, सत्यजितजी,दत्तात्रय साळुंखे सर, मीनल कुलकर्णी, सयुरी, कावेरि प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनःपूर्वक आभार Happy

छान