एक काही येत हाती...

Submitted by raajaa on 13 March, 2009 - 05:59

एक काही येत हाती; ओळखीसे वाटते,
वाटेवाटे तोवरी ते हातचेही निसटते.

एक काही येत हाती; देत सृजनाच्या खुणा,
तोच त्याही सर्जनाचा जाणवे दर्वळ जुना.

एक काही येत हाती; पूर्ण अवधूतापरी,
घनघुमत्कारी विलक्षण नाद घुमवित त्यावरी.

एक काही येत हाती; संकेतांच्या मागुनी,
जाग घेती स्मरणस्मृती वेदनांच्या त्यांतुनी.

एक काही येत हाती; राजवर्खी भर्जरी,
अन झळाळी त्याची माझ्या भरुन राही अंतरी.

गुलमोहर: 

मस्तच!!
---------------------------------
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

ओहो, राजा! फार फार सुरेख. सुंदर कल्पना.
शेवटचं कडवं मला कळलं नाहीये, खरच. म्हणजे त्याचा आधीच्या कवितेशी नक्की संबंध कळत नाहीये. खरच समजावून सांगणार?

एक काही येत हाती; ओळखीसे वाटते,
वाटेवाटे तोवरी ते हातचेही निसटते.>>>>ह्या ओळी खुप आवडल्या.

ओळखीचे त्या एवजी ओळखीचे हवय का ? शेवटी मीही जरा अडकलोच. बाकी मस्त.
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

छान!

शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................

कविता आवडली
चु.भु.दे.घे.--राजवर्खी भर्जरी--हे देवाला संबोधून म्हणले आहे का?

एक काही येत हाती; संकेतांच्या मागुनी,
जाग घेती स्मरणस्मृती वेदनांच्या त्यांतुनी.

आशय मस्त आहे.
छान!

ओळखीचे हेच म्हणायचे असावे! छान!

धन्यवाद, मित्रांनो.
आणि ते ओळखी 'से' असेच आहे. म्हणजे ओळखीचे आहे-ओळखीचे नाही असे धूसर धूसर वाटणारे .

सुंदर कविता

राजवर्खी भर्जरी म्हणजे काय ??

अहा...... सुंदरच !!

खुपच सुंदर...

छान

प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com

मला आशय खूप आवडला... सर्वच कडव्यांचा...
अभिनंदन!!
*********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!