पाऊल मग वळणार नाही

Submitted by माउ on 9 September, 2017 - 00:40

आभासही छळणार नाही
प्रेम तुला कळणार नाही..

मिठीत चांद असूनही
रात विरघळणार नाही

सावल्या ढळतीलही पण
अंतरे ढळणार नाही

उरशील तू तनूवरी
मनात आढळणार नाही

नको वाटेवरी दिसू सख्या
पाऊल मग वळणार नाही..

-रसिका

Group content visibility: 
Use group defaults

मिठीत चांद असूनही
रात विरघळणार नाही >> व्वा! कविता आवडली. Happy

सुंदर !

मिठीत चांद असूनही
रात विरघळणार नाही

नको वाटेवरी दिसू सख्या
पाऊल मग वळणार नाही..>>>
व्वा,खूप छान... लिहीत रहा! पुलेशु!