प्रतिशोध भाग-८

Submitted by कविता९८ on 7 September, 2017 - 04:06

प्रतिशोध भाग-८

"Dear Kavya,
हे पत्र लिहण्यामागे खूप कारणं आहेत,
मी तुला भेटू शकणार नाही.
मी माझ्या गावी जात आहे, काही दिवसांसाठी...
रिटर्न कधी येणार, ते नाही माहित.
तुला कस्तुरीबद्दल जाणून घ्यायच होत,
खर सांगू तर तू जेव्हा त्या ग्रुप मध्ये गेली तेव्हाच तुला सावध करायला हवं होतं.
काव्या, तुला राग येईल पण प्रत्येक ग्रुप चांगला असेलच अस नाही. लोकांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात, आणि ही म्हण या ग्रुपला लागू पडते.
कस्तुरी अगदी तुझ्यासारखी,साधी ,सिंपल अशी..
पण हा वेळ आली की सर्वांना बरोबर वठणीवर आणायला जमत होतं तिला.
कस्तुरी अचानक गायब झाली,
नंतर कुमारच्या वडिलांनी सांगितले की ती आता जगात नाही.
तु ज्या कुमारला भाऊ मानते तो कोणाचा भाऊ बनायच्या लायकीचा नाही.
कस्तुरी त्याला भाऊ मानायची,पण कुमार तिला वेगळ्या नजरेने बघायचा.
कस्तुरीला हे माहित होत की नाही ते तर नाही माहित पण त्याच्या अशाच वागण्यामुळे मी त्याच्या सोबत ब्रेकअप केलं.
तुझ्यासाठी सियाल महत्वाचा आहे म्हणून तुला या सर्वाचा शोध लावायचा आहे की अजून काही लपवत आहेस ते माहित नाही ,पण एवढ सांगते की उगाच या प्रकरणात जास्त गुंतू नको.
कस्तुरी गायब होण्यामागे कुमार आहे अस वाटतं.
त्याच्या वडिलांच्या ओळखीमुळेच तर हे प्रकरण दाबलं गेलं.
खरं काय, खोटं काय ते कुमारच सांगू शकतो....
किंवा कस्तुरी सांगू शकते....
ती खरच मेली असेल तर तिला मारणारा अजून मोकाट आहे.
तुझ्या प्रश्नांची उत्तरे तुला मिळाली.
काळजी घे.
- स्वरा

काव्याने हातात असलेले पत्र वाचलं,
तिच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे तिला मिळाली,
पण आता नवीन प्रश्न उभा होता.
"दादा,
मला समजत नाही
हे सर्व स्वरा भेटून सांगू शकत होती किंवा सकाळी पण सांगू शकत होती.
हे अस पत्र लिहायची गरज नव्हती.
व्हॉटसप वर बोलली असती,कॉल वर पण बोलता आल असतं ना रे..
तिचा फोन लागत नाहीय..
ती कुमार दादा बद्दल जे बोलली ते खर असेल तर तिच्या जीवाला कुमार दादा पासुन धोका आहे.
दा तू तर पोलीस आहे, प्लीज शोध ना की खरच स्वरा गावी गेली आहे का?"

"काव्या,
इथे बस.."

काव्याला सोफ्यावर बसवत गौरव बोलला.

"तू इथे बस शांत,
तुला आता नक्की काय वाटतय ते सांग."

"दादा ,
मी हे का करत आहे हे तुला माहित आहे.
काहीही करून या प्रकरणाच्या मुळापर्यंत जायला हवच."

"ठिक आहे.
ते पत्र दे इथे आणि मला स्वराचा नंबर दे,
मी बघतो.
मी येईपर्यंत घरातून बाहेर पडू नको.
काळजी करू नको ,
आपण जे ठरवलं आहे तसच होईल सर्व.
कस्तुरी प्रकरण जगासमोर येईल आणि यातले गुन्हेगार सुध्दा."

स्वराचा नंबर घेऊन गौरव घरातून निघाला.
तो गेल्यावर काव्याने दरवाजा लावून घेतला आणि प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करू लागली.
गौरव ब्लिडिंगच्या खाली पोहचताच त्याने मुंबईत असणार्या त्याच्या पोलीस मित्राला कॉल केला आणि सर्व सविस्तर सांगितले.
तिथून तो लगेच काव्याच्या कॉलेजच्या दिशेने निघाला.

ती: पोहचला का घरी

तो: हो,आताच..
तो गौरव अचानक इथे आला
नाहीतर सर्व आपल्या योजनेप्रमाणे चालू आहे.

ती: ए,त्याला काही बोलू नको.
रात्री ठरलेल्या जागेवर भेटू.
तू ते रक्ताने माखलेले आपले कपडे आणि बाकी सर्व पुरावे यांची विल्हेवाट लाव.

तो: हो
ते सर्व मी बघतो.
तू जा आराम कर.

ती : हमम
बाय...
आणि जगासमोर हे बहिण भावाच नात करण गरजेचं आहे का??

तो: हो
कारण तुला पण माहित आहे..
बाय द वे,आपण क्राईम पार्टनर झालो Wink

ती:राहुदे,
बाय

तो:बाय

संध्याकाळी गौरव घरी आला तेव्हा दरवाजा उघडाच बघून त्याच्या काळजात धस्स झालं.
तो घरात गेल्यावर त्याने काव्याच्या आईला बघितल्यावर त्याला हायसं वाटलं.
"काय रे?
कुठे गायब होतो?
सुट्टी घेऊन आला आहेस मग जरा बस ना घरी.
तुझ्यासाठी रात्री मस्त जेवणाचा बेत केला आहे.
जा फ्रेश हो , तोपर्यंत मस्त चहा बनवते
आणि जा तुमच्या लाडक्या बहिणीला पण उठवा.
दुपारपासून झोपली आहे.
तिन्हीसांजेला झोपायच नाही किती वेळा बोलली तरी ऐकत नाही."

"हा,
मी उठवतो तिला
तू चहा तिथेच घेऊन ये."

"अरे आधी फ्रेश तर हो."

"हा ग..."
रूममध्ये जाता जाता गौरव बोलला.

गाढ झोपलेल्या काव्याला उठवायची इच्छा तर होत नव्हती तरी गौरवने तिला उठवलं.

"कधी आला तू दादा?"
झोपेतून उठल्या उठल्याच प्रश्न विचारायला सुरुवात केली.

"काव्या, तू फ्रेश हो जा..
मी पण फ्रेश होऊन येतो..
आई चहा घेऊन येतेय."

"दादा पण आधी हे तर सांग की,..."

"काऊ प्लीज नंतर...
मी येतो लगेच."

एवढं बोलून गौरव गेला..
पुन्हा आला तो डायरेक्ट चहाचे कप घेऊन..

"चहा तू का आणला?"

"बोलायच आहे ना आपल्याला.
आईसमोर बोलणार कस या मुद्द्यावर.."

"हमम..
आता तरी सांग.."

"ते पत्र स्वराने लिहिलं आहे हे नक्की."

"आणि हे तुला कस माहित?"

"तुम्हाला मराठी विषय नसला तरी याच वर्षी कॉलेज मध्ये एका कविता स्पर्धेत स्वराने भाग घेतलेला..
तू पण घेतला होता पण नंबर तिचा आलेला हे तू मला दोन आठवड्याआधी सांगितलेलं.
कॉलेज मध्ये ती कविता लावलेली आहे.
अक्षर सेम आहे त्यावरून समजलं."

"मग तिचा कॉल का लागत नाही??"

"तिचा फोन ट्रेस केला तर रत्नागिरी ला जाणार्या रूट वर दिसतोय..
पण तिच गाव सातारा आहे ही माहिती मिळाली आहे."

"मग आता??"

"बघू..
तू विचार करू नको.
मी आहे ना."

"दादा,
लवकर शोध रे.."

"हा..
लवकरच सर्व गुंता सोडवू आम्ही."
काव्याच्या डोक्यावर थोपटत गौरव बोलला.

Group content visibility: 
Use group defaults