मेकॕनिकल इंजिनियरींग

Submitted by नीलम बुचडे on 7 September, 2017 - 03:57

माझ्या भावाने मेकॕनिकल इंजिनियरींगचा डिप्लोमा यंदाच पूर्ण केला आहे. CNC, Pro-E हे course पूर्ण केलेआहेत. वडिलांची बदली गोव्यात झाल्याने तिकडे संपूर्ण कुटुंब स्थायिक होणार आहे. त्यामुळे भावाला गोव्यात नोकरी हवी आहे. कृपया मार्गदर्शन करावे. naukri.com monster, linkedIn इ. साईटवर प्रयत्न केले पण काही झाल नाहीय. काय प्रयत्न करावे लागतील याविषयी कृपया मार्गदर्शन करावी.

Group content visibility: 
Use group defaults

त्याच्या पगाराची लगेच गरज नसेल तर डिग्री करू द्या. >>>> +१
Diploma base freshers ना जॉब मिळन जरा अवघडच आहे.

ACGL वगैरे कंपनीच्या पोर्टलवर जाऊन पहा Job Vaccancies आहेत का ?

खरंतर डिग्री घेण्याएवढी आर्थिक परिस्थिती नाहीय. डिप्लोमा साठी शैक्षणिक कर्ज घेतले आहे. त्यामुळे नोकरी मिळवणे महत्त्वाचे आहे. गोव्यात मिळाल्यास उत्तम होईल. कृपया लवकरात लवकर मार्गदर्शन करावे.

गोव्यातील प्लेसमेंट बद्दल नाही सांगता येणार पण CNC Programming, CAD-CATIA/ProE इ. सॉफ्ट स्किल्स असतील तर जॉब मिळण्यात काही अडचण नाही. सुरूवातीची कमी पगारावरची apprenticeship आणि शॉप फ्लोअरवरचं स्ट्रगल मस्ट आहे.
शुभेच्छा!

मेकला पुण्यातच जॉब जास्त आहेत असे वाटते.गोव्यात मेक वा ऑटो सेक्टर नसावा बहुधा .वडीलांची बदली झाली आहे याचा अर्थ मुलाने तिकडे गेले पाहीजे असे नाही.पोट जिकडे नेईल तिकडे जायची तयारी हवी.असो,निर्णय त्याचा आहे.मला वाटतं पुण्यात राहीला तर खूप पुढे जाईल.बघा सांगून त्याला.

१. तो ज्या शहरात आहे तिथे नोकरी करत असेल किंवा तिथे नोकरीच्या संधी जास्त असतील किंवा ऑफर येत असतील -- तर गोव्याला न जाता इथेच राहून अनुभव घ्यावा आणि नंतर डिप्लोम + अनुभव बेसिसवर गोव्यात नोकरी शोधावी.
**च वर्षांचा आहे एकटा कसा राहिल ही काळजी करू नका. जमेल हळूहळू.

२. गोव्याला जायचेच असेल तर काही काळ कामाविना / पगाराविना काढायला लागेल याची मानसिक तयारी ठेवावी. काही काळ कितीही असू शकतो.

३. IIT Goa website वर Jr Lab Asst ची जाहिरात आहे. 3 yrs diploma with relevant experience अशी पात्रता हवी आहे. पण जाहिरातीची PDF clear नाहीये. त्यात चुका आहेत. संस्थेशी संपर्क साधून नेमकी पात्रता काय आहे ते विचारून घ्या आणि त्याप्रमणे अर्ज करा. जाहिरात आणि संपर्क क्रमांकासाठी कृपया IIT Goa website पहा.

शुभेच्छा.

डिग्री केल्याशिवाय नोकरीच्या फद्यांत पडू नका, फक्त डिप्लोमा करून, नंतर कितीही Experience आला तरी जॉब चेन्ज, प्रमोशन, हाय सॅलरीज मिळताना खुप त्रास होतो

Nestle Goa and Chougule mines Goa
येथे प्रयत्न करा तसेच bosch गोवा येथे सर्व्हिस इंजिनिअर च्या संधी आहेत