प्रतिशोध भाग ७

Submitted by कविता९८ on 6 September, 2017 - 02:13

भाग ५ - https://www.maayboli.com/node/63455?_e_pi_=7%2CPAGE_ID10%2C8512677730

भाग ६ - https://www.maayboli.com/node/63504?_e_pi_=7%2CPAGE_ID10%2C1914884605

भाग ७

"दादा स्वरा अजून कशी नाही आली,
कॉलेज हॉस्टेलवरून इथे यायला इतका वेळ नाही लागत रे दा.
ती ठिक असेल ना?

"तिला कॉल कर आणि विचार ग वेडाबाई.."

"दादासाहेब तुझ्याच समोर तिलाच कॉल करतेय ना उचलत नाही ती.
मला टेंशन येतयं दा."

गौरव काही बोलणार इतक्यात दारावरची बेल वाजते.
काव्या आणि गौरव काव्याच्या रूममधून बाहेर येईपर्यंत काव्याच्या मम्मीने दरवाजा उघडला.
"अरे सियाल तू?
आत ये,आणि ही कोण?"

काव्या संभ्रमात पडली.
स्वरा सियालसोबत का आली असेल..

पण सियाल आणि अनु ला सोबत बघून ती अजून जास्त गोंधळली.
तिच्या डोक्यात प्रश्नच प्रश्न होते.
जेव्हा पासून कस्तुरीचा विषय निघाला होता , तेव्हापासून काव्याच्या आयुष्यात प्रत्येक दिवशी काहीतरी विचित्र घडायच आणि ती प्रश्नांच्या वादळात हरवायची.
आज फक्त तीच नाही तर गौरव सुध्दा विचारात होता.

"स्वरा अजून आली नाही पण अनु आणि सियाल कसे आले ते सुध्दा अस अचानक माझ्या घरी."काव्या तिच्याच विचारात होती.

"काऊ अगं बोल तू यांच्या सोबत,
मी मार्केट मध्ये जातेय"

"आई,आम्ही काव्याच्या रूममध्ये बसून बोलतो,तू जा आरामात ये."

काव्या , गौरव, अनु आणि सियाल आत रूममध्ये जातात.

"सियाल तू इथे का आला??
प्लीज इथे काही तमाशा करू नको."

"काऊ,यार माझं ऐकून तर घे.
मी इथे...."

"सियाल काही बोलू नको आता , बसं झालं.
मला थोडा वेळ दे.माझं डोक शांत झालं की बोलू.यावेळी काहीही बोलणन योग्य नाही.
आपण नक्कीच फ्रेंडस पेक्षा जास्त आहोत.
पण तू तुझा भूतकाळ माझ्यापासून लपवला,मान्य आहे प्रत्येकाचा पास्ट हा असतो. तुला माझ्यावर विश्वास नव्हता का??
फक्त जगाला दाखवण्यासाठी नातं ठेवायच आहे तुला,तुझी प्रत्येक गोष्ट मी का म्हणून ऐकू. आपण ज्या वयात आहोत , या वयात प्रेम की आकर्षण तेच समजत नाही.
आपण हे नात तोडूया,
जर तू हे माझ्यापासून लपवलं तर अजुन किती काय असेल..
अनु दी याला घेऊन जा इथून, माझ्या घरी काही सीन नको.
गौरव दादा तू समजव याला, ओरड काहीही कर..."काव्या खूप रागात होती.

"काऊ काम डाऊन..
सियाल , अनु तुम्ही चुकीच्या वेळी आलात."

"ठीक आहे,
सियाल चल निघुया.."

एवढ बोलून अनु जवळपास सियालला खेचतच घेऊन गेली.गौरव ही त्यांच्या मागे गेला आणि ते गेल्यावर दरवाजा लावून पुन्हा काव्याच्या रूममध्ये आला.

"काव्या ऐक शांत हो..
ते गेले निघून..
तू स्वराला कॉल कर आणि विचार ती कुठेपर्यंत पोहचली."

"हा,करते.."

काव्या स्वराला फोन लावते पण लागत नाही.
"दा,कॉल लागत नाही."

"आपण १५ मिनिटे वाट बघू , येईल ती."

जवळपास अर्धा तास त्यांनी वाट बघितली पण स्वरा आली नाही.

पुन्हा एकदा दरवाजाची बेल वाजली.
काव्याला वाटलं की आता तरी दरवाजा वर स्वराच असायला हवी.
पण यावेळी सुध्दा स्वरा नव्हती.
कोणीतरी दरवाजा वर लेटर ठेवलं होतं.

पुढील भाग https://www.maayboli.com/node/63785?_e_pi_=7%2CPAGE_ID10%2C7313441661

Group content visibility: 
Use group defaults

Lvkr lvkr post takat ja na plzz...wait nhi hotpudhcha part kdhi yenar hyacha>
आता दर दिवशी भाग टाकेन,
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद अॅना

माझ्यासोबत पण तेच होतय कऊ..असो.. तुम्ही लिखाण थांबवू नका..पू. ले. शु.>>>
माहित आहे,
जर तुम्ही त्यांच्या ग्रुपमध्ये त्यांच्या मर्जीप्रमाणे वागणार तोपर्यंत त्यांना तुमच्या कथा आवडणार,
हे बंद झालं की मग तुम्ही चांगले लेखक/लेखिका नाही.
असो बाकीचे आहेत, वाचून प्रतिसाद देणारे आणि चुका असतील तर त्या दुरूस्त करण्यासाठी मदत करणारे..

छान कऊ....पु. भा. प्र.>>>
धन्यवाद सर

हो

अरे वा.. हा भाग कधी टाकला.. मिस झाला होता माझा...गुड सापडला आज... वेगात चाललीय कथा.. पुढील भागाला शुभेच्छा