मी शोधात आहे अशा कवितेच्या,

Submitted by अनन्त्_यात्री on 4 September, 2017 - 01:55

मी शोधात आहे अशा कवितेच्या,
तारे, वारे, रिमझिम, फुलं, वेली, विरहाचे उमाळे,
असं आळुमाळु काहीच नसेल तिच्यात
हुलकावण्या देईल ती, पण तरीही नेटाने शोधेन ती कविता
जी थेट भिडून उलगडताना देईल अनुभव –
हर एक थर सोलूनही जिवंत राहिलेल्या वास्तवाचा,
थंड दुधारी कट्यारी इतका
खराखुरा

Group content visibility: 
Use group defaults

अनंतजी सुंदर !
अजून एक नवा दृष्टीकोण !
Pl. take it easy - Joint venture करुया !
मलाही रंगहीन, बंधमुक्त कविता हवीय !

वावा सुंदर!
तुम्हाला हवी असलेली कविता तुमच्याकडूनच बनेल अशी आशा आहे शुभेच्छा

दत्तात्रयजी, आपल्या सहसंवेदनेबद्दल आभार!
बघूया, माझा शोध मला कुठे नेतो ! Joint venture करायला मी तयार आहे Happy

वाह्!!
हुलकावण्या देईल ती, पण तरीही नेटाने शोधेन ती कविता
जी थेट भिडून उलगडताना देईल अनुभव
>>>
शुभेच्छा!!! Happy

कवितांना मायबोलीवर फार कमी वेळा प्रतिसाद मिळतो. >>>
न येई जादा प्रतिसाद येथे
लिहीणे आम्ही सोडत नाही
असेल गुणगुणण्याजोगे जेथे
कविता आमच्या सांडत राही
Lol