नमी

Submitted by अविनाश जोशी on 3 September, 2017 - 10:57

मी अशोक . अशोक साठे राहायला पुण्यात वेदांतमध्ये म्हणजे कर्वेनगरमध्ये, नुकताच निवृत्त झालो. कसला पाश नाही. मुलं परदेशात. बायको परलोकी. एकट्याच शांत आयुष्य. नाही म्हणायला दिवसभर नमी असते. १२/१३ वर्षाची पोर. समजायला लागल्यापासून आमच्याकडेच असते. आता ८ वीत आहे. हुशार आणि चुणचुणीत आहे. घरी कामवाल्या बायका असल्या तरी कामाची भारी हौस .
४/५ दिवसानंतर पावसाची रिपरिप थांबली होती. घरी बसून कंटाळा आला होता. पाय मोकळे करायला बाहेर पडलो. निमित्त होते भाजीचे. हातात पिशवी पाहिल्यावर नमी धावलीच.
' नमे! घरातच थांब . मी जरा भाजी घेऊन येतो.'
' हो पण. भाजीवाल्याकडून घ्या , भाजीवाली कडून नको.'
'नमे !!! फारच अगाव झालीस '
'तस नाही दादा, ती मोठ्या शेंगा म्हणून जून गोवारी तुमच्या गळ्यात बांधते. आणि कोवळ्या भुईमुगाच्या म्हणून फुसक्या देते; pauimt
;बरं बरं जास्त शहाणपणा नको शिकवू. आणि जरा गणिताकडे लक्ष द्या. बाई ओरडत होत्या.; मी तिच्या वीक पौईन्टवर बोट ठेवले आणि बाहेर पडलो.
नमीचे म्हणणे काही खोटे नव्हते, भाजीबद्दलचे माझी अक्कल प्रसिद्ध आहे. घेवडा , चावली , पापडी अशा गोष्टी माझा पापड करतात. तर पोकळा अंबाडी. मेथी, माठ हि मंडळी माझा माठ करतात. नाही म्हणायला कांदे आणि बटाटे ह्या दोन भाज्या मला बरोबर ओळखता येतात.

विठ्ठल मंदिराच्या इथे भाजीवाले बसलेच होते. माझे भाजी घेणे सुरु झाले. म्हणजेoi भाजीवाली पिशवीत काही काही टाकत होती आणि मी बरं बरं म्हणत होतो.
तेवढ्यात मला शेजारी नमी उभी दिसली.
' नमे ! कार्टे! तू इथे काय करते आहेस ?'
माझ्या ओरडण्याने नमी दचकली.
' मी नमी नाही. आणि मी तुम्हाला कशी दिसते?;
' तू नमी नाहीस तर कोण आहेस? आणि मला न दिसायला मी काही आंधळा नाही'
'मी नमीचे भूत आहे. आणि मी कोणालाच दिसता कामा नये. आजचा माझा पहिलाच दिवस आहे कामाचा आणि सुरु होण्यापूर्वीच मी घोळ घातला ' न.भू.
'तू कोण? काय बोलतीयस?' मी
'मी नमीचे भूत आहे .' भूत आता फारच गोंधळलेले दिसत होते.
'आग पण नमी तर अजून जिवंत आहे, मग तीच भूत हि काय भानगड आहे?' मी
'आता मला माझे सर ओरडणार. एक तर मी तुम्हाला दिसले. त्यात आमच्या GPS घोळामुळे मला नमी सापडत नाहीय. आणि आता तुम्हाला सगळं सांगणं भाग आहे. माझं काही खर नाही' नभु
'जरा नीट सांगशील का ?'
हो.एखादा प्राण जायच्या अगोदर तीन दिवस त्याच्या भुताची जबाबदारी सुरु होते. त्या व्यक्तीजवळ त्याने वावरायचे असते. ठराविक दिवशी,ठराविक वेळेला आणि ठराविक जागीच त्याचा प्राण जातो आणि त्या क्षणीच त्याचा आत्मा भूतात विलीन होतो.' नभु
'आणि ह्याचे एक जरी चुकले तरी गोंधळ सुरु,' न भू
मी काही न बोलताच तिथून सटकलो. मला त्या भुताची दया येत होती पण मला नमीमहत्वाची होती. घरी येऊन बघितले तर नमी ठणठणीत होती. साधी शिंकत पण नव्हती. माझ्या डोक्यातून भुताचा विचार पार निघून गेला
दुसरा दिवस उजाडला. परत भाजीवाल्याकडे नभु दिसले. एका दिवसात तिची तब्येत खालावली होती.
'काय ग ? सापडली का नमी?'
'नाही ना. मला असे सांगितले होते कि ती भाजी घ्यायला रोज येते. GPS चुकला तरी इथे सापडेल.' नभु
'परत एकदा विचार '
'दुर्देव माझे. आता रेंज येत नाही' नभु
'आणि ठराविक ठिकाणी नाही सापडली तर आणि ठराविक वेळी मी
'मग काय ? त्याच मरण टळते . कमीच उद्याचा दिवस आहे.; नभु
'बेस्ट लक मी
तसाच घाईघाईने घरी आलो. मला पोरीला इतक्यातच मारू द्यायचे नव्हते
'नमी बेटा ! माझे. एक काम कर. उद्या सकाळी सहाच्या गाडीने भोरला जा. माझे पत्र
दे आणि संध्याकाळापर्यंय परत ये.'
मेल करा कि' नमी
'मुकाट्याने जा "
तिला कास सांगणार कि जाण किती आवश्यक आहे
दुसऱ्यादिवशी सकाळी लवकरच ती भोरला निघून गेली
सकाळी आरामात नऊनंतर मी भाजी कडे गेलो.
नभु काकुळतीने वाट पाहत होती
'आत्ताच माझा संपर्क झाला. मला तुमच्या घरी जायला सांगितले आहे. ती तुमच्याबरोबर राहते'
'आग पण भाज्या?
'तुम्ही नुसती नाव घ्या. भाज्या तुमच्या घरी पोहोचतील'
तिला घेऊन मी घरी परतलो
'फार कमी वेळ उरला आहे. नमिल बोलवना; नभु
विजयीमुद्रेने मी म्हणालो 'आता ती कुठली सापडायला? ति तर गेलि भोरला
नभुने उडीच मारली ' अरे वा !! तिचे मरण भोरलाच होते, बाय!!'

[नादभय ह्या आगामी संग्रहातून]

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तय . आवडली कल्पना

आधी वाटलेलं नमी ऐवजी अशोकच जातात की काय