वेळ

Submitted by mrsbarve on 3 September, 2017 - 02:39

कुठेही जायचं तर वेळेच्या आत तयार होऊन त्या ठिकाणी वेळेवर पोहोचायचं हा शिरस्ता पाळणाऱ्यांचा एक वेगळाच धर्म असतो. आणि तो म्हणजे अर्थातच अगदी काटेकोरपणे दिलेली वेळ पाळणे.

लहानपणी शाळेच्या घंटी बरोबर धावत फाटकात प्रवेश करणे आणि मागच्या रांगेत उभे राहून शाळा सुरु व्हायची प्रार्थना म्हणणे हा आमचा ठरलेला दिनक्रम असे. शिकवणीला संध्याकाळी आळम टळं करत पाच मिनिटे उशिरा पोचून ,तशाच मैत्रीणीशी गप्पा मारत परत येतानाही घरी पोचायला उशीर.पुढे कॉलेजच्या दिवसात सगळी कामे अगदी लास्ट मिनिट पूर्ण करताना वेळेची मर्यादा सांभाळताना मस्त त्रेधा उडे .

लग्न झाल्यावर साडी नेसणे हा उपक्रम हातात घेतला तर बाहेर जायला हमखासच उशीर !कारण साडीच असायचं पण नवर्याच्या मते वेळ न पाळणे हा काही एकांचा गुणधर्मच असतो. तर काही लोकांचं काय; हळदी कुंकवाला सुद्धा पाच वाजता या ,अस सांगितले असेल तर पाचला जाऊन पोहोचतात. माझयासारखीला मग त्या वेळ पाळण्याच्या वृत्तीचा रागच येतो.शिवाय नवरा बायकोच्यातला एक जण काटेकोर वेळ पाळणा रा आणि एकजण वेळे कडे साफ दुर्लक्ष करत असणारा असा भेटला तर दर बाहेर जाण्याआधी जी काही शाब्दिक लढाई होते त्याविषयी तर काही बोलायलाच नको.

हे वेळ पाळणारे लोक मग वेळेचे फारच टेन्शन घेत असतात बुवा .सत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसादाला किंवा जेवणाला साडे सहाला या म्हणून सांगितले असेल तर सावकाशीने सात असा माझया सारख्याच्या डोक्यातल्या घड्याळाचा काटा आपॊआप पुढे सेट झालेला असतो. माझया साड्यांचा/ड्रेसचा कप्पा धुंडाळण्यात बराच वेळ गेल्यावर सव्वा सहा नंतर साडी नेमकी सापडते,हि साडी मागे कधी आणि कोणाकडे जाताना नेसली होती इत्यादी व्यवधाने संभाळत तेव्हढा वेळ जातोच ना! इकडे नवर्याच्या खालून शंभर हाका ... मग नुसती चिडचिड !अस वाटत याच्या घड्याळाचा गजर पण आपोआप पाच मिनिटे आधी होत असेल! वेळ पाळणारी माणसे अशी स्वतः वेळेचं खूप जास्ती टेन्शन घेतात आणि दुसर्याना पण ते टेन्शन देतात. अर्थात वेळ न पाळणारी माणसे मुळात टेन्शन न घेणारी असतात त्यामुळे बर्याचदा 'नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे!

पण वेळ न पाळणारे लोक काही एव्हढेही गये गुजरे नसतात हा! त्यांचे एक गणित ठरलेले ले असते पंधरा वीस मिनिटे इकडे तिकडे फार तर!एव्हढच! पण म्हणून त्या गोष्टीलाच चक्क "उशीर" म्हणायच?वेळ पाळणारे लोक पंधरा मिनिटांच्या आत बाहेर होण्याला चक्क "उशीर" म्हणतात. मला ते अजिबात पटत नाही.

वेळ न पाळणाऱ्या लोकांनी कितीही चंग बांधला तरीही ते वेळेत कुठेही पोहोचू शकत नाहीत (असा वेळ पाळणाऱ्या लोकांचा दावा असतो.)त्यांचा पिंड तो नसतोच!कितीही आधी तयारी केली तरी माझी एक मैत्रीण म्हणते त्याप्रमाणे "उशीर"किती "पटकन" होतो!!

खरंच या वेळेला वेळेत वेळच्यावेळी पाळलं पाहिजे असा प्रण करून मी एक जानेवारी पासून ठरवलं. आणि मग प्रत्येक लहान सहान गोष्ट एक चॅलेंज वाटू लागली. उदाहरणार्थ सातच्या आत उठणे आठच्या आत ब्रेकफास्ट,घरचा डबा तयार करणे,शाळेत उशीर न होता पोचणे ,नवाच्या आत ऑफिस ला पोचणे,फ्रिज मधले लेफ्ट ओव्हर वेळेत क्लीन करणे,भांडी दहा मिनिटात डिश वाशरला लावणे ,कपडे लाउंडरी वेळेत करणे अशी सुरुवात करत चक्क वेळेत तयार होऊन वेळेत आमंत्रण देणाऱ्याच्या घरी पोचणे वगैरे पर्यंत मजल मारली. पण भरपूर दमछाक होऊ लागली. आणि एक दिवस "व्हाट्स ऍप" वरचा जोक वाचला .

एका खेड्यात एक वक्ता भाषण द्यायला आला तो म्हणाला "बंधुनो बसला असाल तर उठा,उठला असाल तर चाला ,चालत असाल तर धावा"एक धोतर टोपी वाले मामा उठले, हातावर तंबाखू मळत म्हणाले,"ते बरुबर हाय ,पण पावनं येवढं करून जायाचं कुट हाय?"

एकदम फिस्कनं हसू आलं आणि अगदी खरं खर वाटलं ! आणि बरोबर पंधरा मिनिटांच्या आत बाहेरचा पाढा पुन्हा सुरु झाला!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलय.. Happy
पण पावनं येवढं करून जायाचं कुट हाय?" >>> Lol

छान लिहिले आहे.

मी स्वतः काटेकोरपणे वेळ पाळते. त्यामुळे वेळ न पाळणारे लोक दुसर्‍यांचा (आणि त्यांच्या वेळेचा) आदर करत नाहीत, स्वतःची सोय पहातात परंतु दुसर्‍याच्या सोयी गैरसोयीशी त्यांना काहीही देणेघेणे नसते ह्या मताची मी आहे. असो.