ज्ञानप्रबोधीनी प्रशाला - पुणे

Submitted by गुलबकावली on 2 September, 2017 - 02:35

नमस्कार, मला माझ्या मुलीसाठी (५वी) "ज्ञानप्रबोधीनी प्रशाला - पुणे" ह्या शाळेबद्दल माहिती हवी आहे.
१) शाळेची वेळ
२) गुणवत्ता
३) अभ्यास व्यतिरिक्त घेतले जाणारे विषय - खेळ, नाच, गाणे ई.
४) बस सुविधा
५) परिक्षा
६) डोनेशन वैगरे घेतात का?
७) कोणाची मुले किंवा ओळखितले कोणी जात असेल तर एकंदरीत कशी आहे शाळा?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मला पण माहिती हवी आहे.
मध्यंतरी ओळखीतले एकजण म्हणाले की जानेवारी/फेब्रुवारीमधे प्रत्यक्ष तिकडे जाऊन चौकशी करा.

साधरण फेब्रुवारीमधे प्रवेश परीक्षा असतात.

हि शाळेची वेबसाईट - http://prashala.jnanaprabodhini.org/

हा मायबोलीवरचा शाळेच्या आठवणींचा धागा - https://www.maayboli.com/node/56581

शब्दाली, खुप धन्यवाद. धागा वाचतेय. जस जसा वाचतेय तस मुलीला ह्याच शाळेत घालायचे हे नक्की होत चालले आहे. खरच खुप धन्यवाद.

धन्यवाद शब्दाली,
प्रवेश परिक्षेबद्दल काही सांगता येईल का ? काय प्रकारे तयारी करून घ्यावी ?

प्रवेश परिक्षेबद्दल काही सांगता येईल का ? काय प्रकारे तयारी करून घ्यावी ?>> ह्याबद्दल मलाहि माहिती हवी आहे.

प्रवेश परिक्षेबद्दल काही सांगता येईल का ? काय प्रकारे तयारी करून घ्यावी ? >>> माझ्यावेळी स्कोलरशिपच्या परिक्षेसारखे प्रश्न होते आणि त्यासाठी शाळेच्याच ग्रन्थालयातून एका आठवड्यासाथी पुस्तके आणली होती, सध्याची काय पद्धत आहे ते शाळेत चौकशी करुनच कळेल.

सध्याची काय पद्धत आहे ते शाळेत चौकशी करुनच कळेल. >> मी मध्यंतरी गेले होते शाळेत चौकशीसाठी. शाळेच्या कार्यालयात एकच बाई होत्या. (बाकीचे जण शाळेत सुरू असलेल्या कार्यक्रमात होते). काहिही तयारी करुन घेऊ नका. आम्ही मुलांचा IQ बघतो. २ चाचण्या असतात. १ पास झाली तर दुसरी होते. मुलांनी काही तयारी न करता येणच अपेक्षीत असत असं म्हणाल्या त्या.

मी या शाळेचा माजी विद्यार्थी. बाकी प्रश्नांची उत्तरे काळानुसार बदलली असू शकतात, पण '६) डोनेशन वैगरे घेतात का?' याचे उत्तर स्पष्ट 'नाही' असे आहे.

मला, अभ्यास व्यतिरिक्त घेतले जाणारे विषय - खेळ, नाच, गाणे ई., बस सुविधा आणि आत्ता कोणाची मुले किंवा ओळखितले कोणी जात असेल तर त्यांचा अनुभव जाणुन घ्यायला आवडेल Happy

मला, अभ्यास व्यतिरिक्त घेतले जाणारे विषय - खेळ, नाच, गाणे ई., बस सुविधा आणि आत्ता कोणाची मुले किंवा ओळखितले कोणी जात असेल तर त्यांचा अनुभव जाणुन घ्यायला आवडेल >> same here.....
स्निग्धा, तुझ्या मुलीला कितवी साठि घ्यायचा आहे प्रवेश? मुलीचे आत्ताचे बोर्ड कोणते आहे? तु पुण्यातच रहातेस का?

स्निग्धा, तुझ्या मुलीला कितवी साठि घ्यायचा आहे प्रवेश? >> ५ वी साठी
मुलीचे आत्ताचे बोर्ड कोणते आहे? तु पुण्यातच रहातेस का? >> आत्ता SSC बोर्ड आहे आणि हो पुण्यातच रहाते Happy

मलाहि माझ्या मुलीला ५वी साठी प्रवेश हवाय.....तीचेहि SSC बोर्ड आहे. पण मी पुण्यात नाहि मुंबईत रहाते.
तुम्ही जर कधी शाळेत गेलात आणि काहि माहिती मिळाली तर कृपया शेअर करा.....

पण मी पुण्यात नाहि मुंबईत रहाते. >> पण मग प्रवेश परीक्षा, त्या जर पास झाली तर प्रवेश आणि पुढची शाळा ते कसं जमवणार?

मी ज्ञान प्रबोधिनीची माजी विद्यार्थीनी आहे.
१) शाळेची वेळ - स. १०:४५ ते सां. ५:०० (माझ्या वेळी)
२) गुणवत्ता - उत्तम (हे बऱ्यापैकी सापेक्ष विधान आहे)
३) अभ्यास व्यतिरिक्त घेतले जाणारे विषय - खेळ, नाच, गाणे ई. - बरेच विषय हाताळले जातात. या बाबतीत शाळा खूप लवचिक आहे पण स्पर्धार्थी किंवा परीक्षार्थी तयार होत नाहीत. शाळेत अभ्यासाव्यतिरिक्त बराच वेळ अवांतर उपक्रमात खर्च होतो. त्याची तयारी असू द्या.
४) बस सुविधा - माझ्या माहितीप्रमाणे नाही.
५) परिक्षा - होतात. दहावीला सीबीएसई बोर्ड आहे.
६) डोनेशन वैगरे घेतात का? - नाही
७) कोणाची मुले किंवा ओळखितले कोणी जात असेल तर एकंदरीत कशी आहे शाळा? - एकंदरीत चांगली शाळा आहे. पण एक पालक म्हणून मुलाच्या शिक्षणात खूप लक्ष घालणार असाल तर प्रबोधिनीत घालू नका! पाचला शाळा सुटल्यावर साडेपाच पर्यंत मुलगी घरी का आली नाही याची चिंता वाटत असेल तर ते बदलावं लागेल! १० मिनिटांवर घर असूनही मी ६:३० च्या आधी कधी घरी गेल्याचं आठवत नाही! शाळा बरीच प्रयोगशील आहे - are you ready to experiment with your child की तुम्हाला पारंपरिक पद्धतीने मुलाचं शिक्षण झालेलं पटेल याचा विचार करा. I do not see any of my non Prabodhini friends as lacking in talent/smartness, career progress/money, or happiness whatsoever. But I know that I am a very different person because I studied at Jnana Prabodhini Prashala.
बाकीचे तपशील तुम्हाला शाळेत चौकशी करून विचारता येतील.

पण मी पुण्यात नाहि मुंबईत रहाते. >>
गुलबकावली, ज्ञान प्रबोधिनीचे मुलींसाठी वसतिगृह नाहीये.

धन्यवाद जिज्ञासा खुप नीट माहिती दिलीस..... त्यांची साईट बघितली आहे.
>>मुलींसाठी वसतिगृह नाहीये.>> मी तीला एकटिला नाहि पाठवणार ...... आम्ही पूण्यालाच रहायला येतोय त्यामूळे तो प्रश्न नाहि.

जिज्ञासा, शाळेचा गणवेष आठवड्यातून एकदा आणि इतरवेळी साधेपणा प्रतीत होईल असे कपडे म्हणजे नक्की रोज काय घालून जायचे?

गुलबकावली, साधेपणा प्रतीत होईल असे कपडे म्हणजे साधी, सामान्य माणसं सद्य स्थितीत घराबाहेर रोज कोणते कपडे घालतात, ते. अगदी पार्टीवेअर किंवा झँग-पँग नको, इतकेच!

या वर्षी ज्यांना पाचवीत प्रवेश पाहिजे आहे, त्यांचा जन्मदिनांक हा ३१ डिसेंबर २००८ च्या आधीचा असला पाहिजे.
अर्थात आता फॉर्म्सची मुदत पण संपली, १७ फेब. पर्यंत होती.