प्रश्नत्रयी

Submitted by अनन्त्_यात्री on 1 September, 2017 - 12:45

कृष्ण-विवराच्या
गर्भीच्या कल्लोळा
वेध का लागती
दिक्काल-मुक्तीचे ?

स्थूलास व्यापून
सूक्ष्मात सांडता
कैवल्य ओलांडी
उंबरे कशाचे ?

त्याच्या नि माझ्या
नि:संग नात्याला
पाश हे कशाला
जीवन मृत्यूचे ?

Group content visibility: 
Use group defaults