कविकल्पना - ५ - तर मी आज असा नसतो

Submitted by संयोजक on 1 September, 2017 - 00:17

कविकल्पना - ५ - तर मी आज असा नसतो

तर यंदाच्या गणेशोत्सवात बुद्धीच्या देवाला नमन करून मनातल्या ह्या कविला बाहेर पडू द्या.
संकल्पना अतिशय सोपी आहे. हा खेळ आहे, स्पर्धा नाही. बंधने काहीच नाहीत.
आम्ही आपल्याला कवितांसाठी काही शीर्षके देत आहोत. तुम्ही त्यावर आधारित कविता करायच्या आहेत. कवितेला फॉर्मचे बंधन नाही - मुक्त छंदापासून गझलेपर्यंत काहीही चालेल. एका आयडीने एका किंवा अनेक शीर्षकांवर किती कविता करायच्या ह्याला कसलेही बंधन नाही. शीर्षक कवितेमधे आलेच पाहिजे असा आग्रह नाही. शीर्षक रुढार्थानेच वापरायला हवे असे बंधन नाही.
थोडक्यात काय तर 'होऊ दे खर्च'

पाचवे शीर्षक :
"तर मी आज असा नसतो"

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झालो होतो वेडा मी तुझ्या प्रेमात
तुझ्याशिवाय राहिला न्हवता रस कशात
घरच्यांचा नेहमीच आपल्या प्रेमाला विरोध होता
बाबांनी सांगितलं सोड तुला नाहीतर येऊ नको घरा
होतो आंधळा तुझ्या प्रेमात दिली लाथ ऐशआरामाला
होतीस तू फार खर्चीक झेपेनास मग मला
दिली हाक मित्राला ज्याला मी होता एकेकाळी पोसला
मागितले पैसे म्हणाला नाहीत माझ्याकडे उधळायला
आयुष्याच्या त्या क्षणी तू ही डाव मोडला
कुत्रीही हल्ली भुंकून दूर लोटतात मला
आयुष्याच्या त्या वाटेवर समजला
नसता त्यावेळी जर पाय घसरला
..तर आज मी नसतो असा
(एका नशेच्या आहारी गेलेल्याची दशा)

रंगणं फार कठीण नसतं, हातपाय नेटाने मारावे लागतात
स्ता नेतोच पुढे पुढे, पावलं आपल्याला टाकायची असतात

मीठ अन्नाची रूची वाढवतं, प्रमाण नेमकं साधायला हवं
ग देते उब, धग नि चटकाही, अंतर रा़खणं जमायला हवं

ग काहीतरी म्हणतच असतं, त्याचं त्याला तरी कुठे आठवतं
सं प्रत्येकाला खूष करायला, एक आयुष्य पुरेसं नसतं

सार्‍या जगाची चिंता वाहणे, रामदासांना जमून गेलं
को त्या भिडेला बळी पडून, स्वतःचं जगणं राहून गेलं

गळं कळतं तर होत का नाही, गुंत्याशिवाय हाती काही येत का नाही
तो, ती ते, असे समोरच असतात, त्यांच्या चुकांतून मी शिकतो का काही

गुरू आणि धड्यांची वानवा नाही, गृहपाठाचीच अपूर्ण वही
अभ्यासात कमी पडलो नसतो, तर मी आज थोडा वेगळा असतो

* * * * * * * * * * * *

इ.स. १६६०
कबरीत पडल्या पडल्या, अफझल खान स्वतःला कोसतो
शिवबाची हुषारी ओळखायला चुकलो, नाही तर मी आज असा नसतो

पुर्ण कविताच खूप मस्तय..
मला ,
जग काहीतरी म्हणतच असतं, त्याचं त्याला तरी कुठे आठवतं
असं प्रत्येकाला खूष करायला, एक आयुष्य पुरेसं नसतं
नको त्या भिडेला बळी पडून, स्वतःचं जगणं राहून गेलं>>> ३ लाइन्स फार आवडल्या.. Happy