दु:ख उमटत नाही लेखणी

Submitted by र।हुल on 31 August, 2017 - 13:47

चेहर्यावरती हास्य खोटे दावूनी
अश्रूंना आपुल्या दडवतो कोणी
का दु:ख उमटत नाही लेखणी
जाणिवेच्या अभागी आठवणी !

कसे बांधावे प्रसंग,आक्रंदन मनी
बंद जो पुकारला शब्द अक्षरांनी
कसे जावे सहज दु:ख विसरूनी
का व्हावेची बोथट ह्या संवेदनांनी

बघूनी दु:खीतांचे जगणे हळहळूनी
न मांडावे मी त्यांना लेखणीमधुनी
जमणार नाही ते कधी टाळणे हासूनी
माझे शब्द उमटतील गदगद रडूनी

गुदमरल्या श्वासांची सुटका होऊनी
ते पेटतील निखारे आता शब्द बनुनी
शोषितांच्या वेदनेला शांत कुरवाळूनी
होतील सज्ज लढण्यास शस्र बनूनी

―₹!हुल/३१.८.१७

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुदमरल्या श्वासांची सुटका होऊनी
ते पेटतील निखारे आता शब्द बनुनी
शोषितांच्या वेदनेला शांत कुरवाळूनी
होतील सज्ज लढण्यास शस्र बनूनी

छानच !

कसे जावे सहज दु:ख विसरूनी
का व्हावेची बोथट ह्या संवेदनांनी

सुरेख . शेवटच्या कडव्यामध्ये कवितेचा सूर बदलला, आक्रमक झाला आहे. ते आवडलं.

एक typo आहे.
जमनार नाही ते कधी टाळणे हासूनी
=> जमणार ......

दत्तात्रयजी, सायु, तनिष्का, अक्षय,राजेंद्रजी, तृप्तीजी, पंडितजी, समाधानी मनापासून खुप धन्यवाद Happy
तृप्तीजी, करेक्शन केलं. धन्यवाद!