नवीन मालिका "तुझं माझं ब्रेकअप"

Submitted by कविता९८ on 31 August, 2017 - 12:21

झी मराठी वर 18 सप्टेंबर पासून रात्री 8.30 वाजता तुझं माझं ब्रेकअप ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Sainkeet Kamat (राखेचामधील अभिराम)and Ketaki Chitale हे मुख्य पात्र आहेत.

Group content visibility: 
Use group defaults

लागीर आणि जीव रंगला पेक्षा बरी आहे मालिका.. पेस चांगला आहे.. जीव रंगला मध्ये नुसती शाळा आणि तालीम, लागीर मध्ये फोन वर बोलणे आणि शेतात जेवण हेच चाललाय

गोठ सम्पतेय बहुतेक. नकळत सारे घडले साडे सातला लागणार आहे. दुसरा प्रोमो सुद्दा डिट्टो ये है मोहब्बते वर्जन. शगुन कोण झालय ते बघायला हवय. अभिज्ञा भावे सूट होईल शगून च्या रोल मध्ये. Happy

गोठ रात्री साडेनऊला लागणार. नकळत साडेसात ला गोठ च्या जागी. मला फक्त त्यातली छोटी मुलगी आवडली.

इथे चुकून विचारलं का सुलू, संथ चालती याऐवजी.

आता आदर्श सुन वैगेरे सुरु होणार आहे. >>> त्या वरून आठवलं - घाडग्यांच्या सूना काय म्हणतायेत ? अवांतर आहे माहित आहे .

इथे चुकून विचारलं का सुलू, संथ चालती याऐवजी.>>> ओह sorry (जीभ चावणारी बाहुली) , मला माहित नव्हत हा ब्रेक अप चा धागा आहे. संथ चालती समजून चुकून इथेच टायपल. Lol

खरं आहे सुजा, सध्या मी पण रुद्रम बघतेय फक्त. गोठ 2 महिने पकवतायेत म्हणून बंद केली बघायची, 2 महीने फक्त रुद्रम.

या रविवारच्या महाएपिसोडचा थोडा भाग पाहिला. ती आदर्श सुनेची नियमावली ऐकून भोवळ यायला लागली. तरी बर ती सासू आपल्या Modern सासूला ( रोहिणी हट्टन्गडी ) घाबरते.

दहा दिवसात काय तो निकाल लागणार म्हणे!! Uhoh

सासूबाई म्हणते कि तिने लेकावर investment केली आहे.
मी हारले तर तुमच्या लेकाला पण बरोबर घेऊन जाईन असे म्हणायला हवे होते मीराने.

काहीही चालु आहे. धुणी भांडी, स्वयंपाक, डस्टिंग आणि ऑफिसला जाताना मटार सोलुन हवे होते, घरी आल्यावर मीठ आणायला जा
एवढं कोण ऐकतं?

मुलगा आईला स्पष्टपणे सांगतो की तु जे काहीकरतेस्यस ते मला आजिबात आवडत आणि पटत नाहीये.
तुझ्या ह्या वागण्यामुळे तुझ्यावरचं प्रेम कमी नाही होणार. पण तुझ्याबद्दलचा आदर नक्कीच कमी होईल. ते आवडलं मला.

मी हारले तर तुमच्या लेकाला पण बरोबर घेऊन जाईन असे म्हणायला हवे होते मीराने. >>> हो पण आदर्श सूनेने सासूला उलट उत्तरे दयायची नसतात ना!

जोगबाई का आल्या आहेत तिथे राहायला. त्या रोहच्या बातमीदार आहेत ते माहितीये पण कारण काय सांगितलं. मिळकत सगळी सासूला द्यायची पण दहा दिवसात काय मिळकत होणार. मीराच्या वडिलांचंं व्यक्तिमत्व रूबाबदार आहे.

रोह चा काय मॅटर आहे? असल्या अवतारात का आहे ती? Lol
आणि बातम्या का काढतेय मीराच्या?
आणि ती मठ्ठाधिपतीच्या सिरेलीतली भांडखोर म्हातारीचं काम केलेली पण आहे रोह बरोबर.

सस्मित... Happy
मठाधिपतीं च्या शिरेलीत कोण होती ती?

रोह चा काय मॅटर आहे? असल्या अवतारात का आहे ती? Lol
आणि बातम्या का काढतेय मीराच्या?>>>> ती मीराच्या सासुची सासू आहे. मीराची सासू तिच्या धाकात आहे.
खरेच डोक्यावर ठेवलेला वीग फारच कसातरी दिसतो. त्याशिवायही तिला मॉड दाखविता आली असती.

मीराची सासू तिच्या धाकात आहे.>>>>> खरं की काय? मग ही अशी बाहेरुन खबरी का काढत बसलीये?
पण हे जरा ऑड वाटलं की सासु एवढी मॉर्ड आणि मीराची सासु नेहमीच घरातही साड्या नेसुनच. तिचा नवरा आणि ती नणंदही बरीच मॉर्ड दाखवलेय.

ती फक्त मजा बघते आहे. मीच्यासा ला तिने फोनवर ३ महिन्यानंतर येणार असे सांगितले आहे पण खरेतर ती शिमग्यालाच येणार आहे.
मीराने कितीही प्रयत्न केले तरीही हि तिला नापास करणार आणि तेव्हाच मीच्यासाची सा घरात पाऊल ठेवणार.

अरे ती आत्या म्हणजे उज्वला जोग आहे, अनंत जोगची पत्नी, क्षिती जोगची आई. लाजिर वाण्या घरात प्रदीप वेलणकरची बायको, तर असंभव मध्ये हिरॉईनची आई.

Pages