नवीन मालिका "तुझं माझं ब्रेकअप"

Submitted by कविता९८ on 31 August, 2017 - 12:21

झी मराठी वर 18 सप्टेंबर पासून रात्री 8.30 वाजता तुझं माझं ब्रेकअप ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Sainkeet Kamat (राखेचामधील अभिराम)and Ketaki Chitale हे मुख्य पात्र आहेत.

Group content visibility: 
Use group defaults

कऊ अनुमोदन.
कथा तद्दन फालतू असणार यात वाद नाही

हो...पण आगीतून निघून फुफाट्यात नको पडायला आपण!! >>>> Lol

८.३० ची वेळ आहे न, मग खुप पर्याय आहेत

>>कळ्या कोमेजल्या की काय?>>> Biggrin
हा हा...हो ना... खुलण्याअधिच कोमेजल्या.. शीर्षकात तेच म्हटलंय ना की कळी खुळणार नाहीये... Lol Wink
हल्ली प्रोमो मधलं सिरीयल मध्ये घडेलच अस काही भरोसा उरला नाही...खुकखु मध्ये जो प्रोमो दाखवला होता ते आता सिरीयल संपत आली तरी खरं होणार की नाही देवास ठाऊक.. Angry ..आता या नवीन मालिकेच्या प्रोमो वरून अंदाज लावण्यापेक्षा 1/2 एपिसोड वरूनच रागरंग कळेल... आणि तसही हिरो हिरवीण कडे बघून अज्जिबात मूड होत नाहीये पाहायचा... सारखं काय लव्ह स्टोरी/ब्रेकअप/पती पत्नी वो/सांस बहू ड्रॅमा.. आता जरा नवीन विषय घ्या म्हणावं... जगात बरेच विषय आहेत की या गोष्टी सोडून.... Angry हेमावम..

८.३० ची वेळ आहे न, मग खुप पर्याय आहेत>>>
कोणते??? >>> एक पर्याय मी वापरते तो म्हणजे टीव्ही बंद ठेवण्याचा Wink , मी करते. आता एकदम नऊ वाजता थोडा वेळ kbc बघते आणि साडेनऊ रुद्रम. साडेसात ला आधी गोठ बघत होते पण तिथेही जे काही चालू आहे ते अजिबात पचनी पडत नाहीये, त्यामुळे रात्री साडेदहा ला बघते. साडेसातला बघितलं तर trp वाढतो म्हणे, म्हणून माझ्याकडून सध्या trp वाढवणे बंद केलंय Lol

नटुकाकी मग कशाला
त्या लागिरं मध्ये पण जवान्+लव्हस्टोरी घुसडलीच्चे की.

सारखं काय लव्ह स्टोरी/ब्रेकअप/पती पत्नी वो/सांस बहू ड्रॅमा.. आता जरा नवीन विषय घ्या म्हणावं... जगात बरेच विषय आहेत की या गोष्टी सोडून.... >> आम्ही नवीन विषय शोधतच आहोत. प्लीज सगळ्या वर्गातले लोक आवर्जून बघतील असा विषय सुचवा. कथा असल्यास कथा सुचवा. तुमची कथा निवडली गेल्यास योग्य ते श्रेय आणि मोबद्ला दिला जाईल.

केतकी चितळे आधी कोणत्या सिरीयल मध्ये होती ? नाव आठवत नाहीये तिच>>
आंबट गोड-स्टार प्रवाह
सास बिना ससुराल-सोनी Tv

अंजुला विचारा >>> Lol

सास बिना ससुराल-सोनी Tv >>> हे माहीती नव्हतं मात्र मला.

दक्षिणा,मी नाहीच बघणार आहे ही मालिका... Happy फक्त इथे अपडेट्स वाचेन... 8.30 ला किचनची कामे उरकून 9 ला केबीसी आणि मग रुद्रम/जिओ केबीसी प्ले अलॉंग...
>>>प्लीज सगळ्या वर्गातले लोक आवर्जून बघतील असा विषय सुचवा>>> हे जरा विषयांतर होईल पण थोडक्यात लिहिते...
बाकीच्या चॅनल्स वर जरा तरी व्हरायटी पाह्यला मिळते... हिंदी चॅनल्स वर पांचाल,मॅडम मे आय कम इन ,तेंनाली रामा,सजन रे फिर झुट मत बोलो,टीव्ही बिवी ओर में,वाणी राणी,केबीसि,बेहद,बिघनहर्ता गणेश...काही बोर होत असल्या तरी टिपिकल नाहीत.. इंग्लिश म्हणाल तर मग काय विचारायलाच नको.. गेम ऑफ थ्रोन्स, जिम्मी किंमल लाईव्ह,क्वांटीको,शार्क टॅन्क वगैरे.. जिंदगी चॅनेल वर जरी लव्ह स्टोरी, पती पत्नी वो, सांस बहू ड्रॅमा दाखवायचे तरी काही मालिका फार सुरेख होत्या.. पाणी वगैरे घालणं नाही..अजिबात बटबटीत भडक नाही..फाफटपसारा नाही... आटोपशीर, उगा महाएपिसोड वगैरे नाटक नाही...परत परत पहावश्या वाटणाऱ्या...
हमसफर,जिंदगी गुलजार हैं आणि बऱ्याच काही(खूप आहेत पण इथे नको).. यात एकदम मोजके एपिसोडस..फक्त झी मराठीवरच मात्र तेच तेच रटाळ,पाणीदार काही अपवाद सोडले तर.. म्हणजे कधी एकदा मालिका संपतीये अस होतं... आणि मुख्य म्हणजे विषय/कथा जरी रिपीट असेल तरी चालेल पण बाकी बऱ्याच गोष्टी जस डायरेक्शन,सादरीकरण,लेखन,संवाद, कलाकार यांमध्ये तरी व्हरायटी क्वालिटी हवी...

ह्या शिरेली चा हिरो मख्ख, हरवलेला वाटतोय.हिरोईन रागात येऊन घसा ताणुन ताणुन बोलते. Sad
रोहिणी हट्टगंडी ची हेअरस्टाईल लगेच नजरेत भरली.वेगळा लुक एकदम.आई -बाबा एकदम टीपीकल.भल मोठ्ठ कुटुंब दाखवल आहे म्हणजे सिरीयल केव्हाही पाणीदार होऊ शकते.होप फॉर बेस्ट.

हिरॉईन लाडवलेली व रागीट वाटते.
भलं मोठ्ठ कुटुंब - ही तर झी ची जुनीच सवय. म्हणजे अनेक साईड कथानकं घुसविता येतात, बरीच पर्म्युटेशन्स- काँबिनेशन्स शक्य असतात, लेखकाला विचार करायला वेळ मिळतो व कथानक कसंही लळत लोंबत पुढे न्यायला काहीही प्रत्यवाय उरत नाही!
:रागः

झी मराठी वरची एक ही सिरीयल पाहण्या सारखी नाहीये .
माझ्यामते झी मराठी ने चॅनेल ला काही दिवस टाळ ठोकाव .

Pages