अमृताहूनी गोड >> हेल्दी फ्रुट डेझर्ट >> मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 29 August, 2017 - 14:05

आपल्या परंपरेला जागून माबो ने आपली ह्या वर्षीची पाकृ स्पर्धा ही कठीणच ठेवली आहे. साखर, गूळ, मिल्कमेड वैगेरे काही ही न वापरता गोड पदार्थ बनवणे खूपच कठीण आहे. खूप विचार करून ही माझी गाडी खजुराचे लाडू किंवा खजूर रोल्स यापुढे जात नव्हती. तरी ही हा मी केलेला पदार्थ कसा वाटतोय ते सांगा.
साहित्य:
आटवलेलं दूध ( अर्धा लिटर होल मिल्क आटवून निम्मं करून घ्यावे. )
काळ्या बिन बियाच्या खजुराचे छोटे तुकडे , थोडा खजूर बारीक वाटून , थोडा मध
केळं, चिकू, द्राक्ष, किवी, सफरचंद, याचे छोटे छोटे तुकडे डाळिंबाचे, दाणे,
थोडा सुका मेवा आणि वासासाठी वेलची पावडर.

कृती

आटवलेल्या दुधात वाटलेला खजूर आणि मध मिक्स करून घ्यावे. वेलची पावडर घालावी.
एका उभ्या ग्लासात प्रथम फळांचे तुकडे , खजुराचे तुकडे परत फळांचे तुकडे असं लेअरिंग करावं. नंतर हळुवारपणे आटवलेलं दूध त्यावर घालावं.
वरून थोडा सुका मेवा, डाळिंबाचे दाणे सजावटी साठी घालावेत.
आपले हेल्दी फ्रुट डेझर्ट तयार आहे. सगळ्याना द्या आणि तूम्ही पण खा.

हा फोटो

IMG_20170829_142306.jpg

अधिक टीपा

तसं ह्यात फार इनोव्हेटिव्ह असं काही नाहीये, गोडीसाठी वापरलेला खजूर आणि मध हेच वैशिष्ट्य आहे ह्याच. डाएट पाळणाऱ्या लोकांसाठी हा एक चांगला ऑप्शन होऊ शकतो. अशा प्रकारे आपण खीर आणि बासुंदी ही करू शकतो.

फार काटेकोरपणे फळं नाही घेतली तरी नक्कीच चालेल. आपल्या आवडीची फळं वापरता येतील . पण नैसर्गिक गोडी असणारी फळं वापरावीत.

साखर न घालता ही ह्याची चव छानच लागत होती. मधाचा स्वाद चव खुलवत होता.

पोळी पुरी बरोबर जेवणात ही हे गोड म्हणून करता येईल.

उपासाच्या दिवशी हे खाल्लं तर पोट दिवसभर गार राहील.

मिल्कमेड किंवा डेअरी मिल्क पावडर वापरून दूध आटवायचा वेळ वाचवू शकता. इथे चालणार नव्हतं आणि आटवलेल्या दुधाची चव निश्चितच कैक पटीने छान असते.

फळांचीच सजावट केली आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ममो , मस्त .
मला असले दूधाचे प्रकार आवडत नाहीत . पण जे काही आहे ते मस्त आहे .
खजुराचे लाडू किंवा खजूर रोल्स या व्यतिरिक्त काहीतरी Happy

व्वा! छान दिसतोय हा प्रकार. सजावटही सुंदर.
हेमाताई मला ते दोन्ही ग्लास हवेत. >>>>>>>>जागू एकच घे. वजन वाढेल. Lol एक मला दे. Happy

खुपच सुंदर ममो..
खाली केलेली सजावट पहिले मला ट्रे वरची डिझाईन वाटलेली.. खुप मस्त..

Pages