दोडक्याचे नाचोच्

Submitted by friend१६ on 28 August, 2017 - 11:20

दोडक्याचे साल हलके साफ करून किसुन घेतला

मग त्यात दीड वाटी गव्हाचे पीठ व पाऊण वाटी बेसन पीठ टाकुन हिरवी मिरची ,आलं-लसुण पेस्ट, ओवा, जीरे पावडर, मीरे पुड,कलौजी व तीन टाकुन घट्ट पीठ मळुन 10मिनिटांसाठी झाकुन ठेवले.

नंतर त्या भीजवलेल्या पीठाच्या पोळीसारख्या पोळ्या लाटुन तव्यावर अर्धवट भाजुन घेतल्या व गरम तेलात कुरकरीत होईपर्यंत तळुन घेतल्या.

पूर्ण गार झाल्यावर बंद डब्ब्यात ठेवुन दिले तरी चालते,8दिवस ही कुरकरीत राहतात.

दोडक्याप्रमाणे इतरही भाज्यांपासुन इसे नाचोज् बनवता येतात, शिवाय मैदाचा वापर नाही ना?

पोळी लाटतांना पातळच लाटावी शिवाय तीला काट्या चम्मच्याने टाेचे मारुनच तळावे, म्हणजे ते हवा पकडुन फुगत नाहीं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे रेसिपी.

तव्यावर अर्धवट भाजून मग तळल्याने नेमके काय होते? दाल पक्वान मधले पक्वान तळतानाही हीच टीप मिळालेली आहे पण नेमके प्रयोजन कळले नाही.

नानबा, साधना Thanks for comments Happy
ho tel kami lagte ani crispy hotat lavkar.

Webmaster post karte pakkruti varun, sorry chukun zale.