सल

Submitted by कविन on 12 March, 2009 - 07:11

समीऽर, ऐकतोयस ना, मी दोन तिन हाका मारल्यावर त्याने बघीतल

ह्म्म बोला, नवरा सुखाने पेपर वाचताना बघवत नाही तुम्हा बायकांना.

सोहम,सोहमची मी शब्द जुळवत म्हंटल, सोहमची काळजी वाटते रे. काल पण झोपेत रडत उठला. थोपटुन थोपटुन झोपवला त्याला अगदी लहान मुला सारखा. तू बघितलस ना?

बरं त्याचं काय? इति नवरोबा

त्याच काय काय? नेहमी सारखी मस्ती पण नसते त्याची, सतत काहीतरी विचार करत बसतो. दोन दिवस सांगतोय खाली xxxxजागी दुखतय म्हणुन. दाखवुया का डॉक्टर ना?

झालं तुझ? अग माझे आई किती पाठी लागशील त्याच्या. एकतर शाळांना सुट्टी लागलेय. त्याची दोस्त कंपनी कुठे कुठे गेलेय. त्यात मुंज झाल्यामुळे डोक्याची घेरी बिरी जरा वेगळाच दिसतोय. येणारा जाणारा चिडवतो म्हणुन बसत असेल घरात. मला आठवत माझी मुंज झाली तेव्हा सगळ्य़ांनी मला डोक्यावर वडा वडा म्हणुन टपली मारुन हैराण केल होत. त्याची पण सवय होईल मग येईल पुन्हा मुळ पदावर. नेहमी मस्ती करतो म्हणुन तक्रार करतेस आज नाही करत म्हणून तक्रार. माते धन्य आहेस तू!

आणि उन्हाळी त्रास होत असेल, ते तू आणलयस ना लेमन बार्ली वॉटर ते दे ना त्याला भरपुर. नाही वाटल बर तर जाऊयात डॉक्टर प्रधानांकडे. ठिक आहे? घरगुती उपाय करतेच आहे रे पण ... जाऊदे तू म्हणतोस तसच असेल. मी पण काय वेडी, काही बाही विचार करत बसते. काही दिवस असेच पार पडले आणी एक दिवस चिरंजीव एक प्रश्न घेऊन आले माझ्या कडे

आई, मुंजीत खरा बेडुक भरतात मांडीत?

कुणी सांगितल तुला?

सांग ना पण आई, माझ्या पण भरलाय का?

नाही रे बाळा, कुणी सांगितल तुला? नक्कीच गंमत केली तुझी!

आयुष दादा तर म्हणतो.... नाही खरच त्याने दाखवला पण मला बेडुक.

मग कसा दिसतो तो? मी चेष्टेच्या सुरात विचारलं. बेल वाजली नी विषय तिथेच संपला.

सायले मी सोहमला घेऊन डॉक्टर प्रधानांकडे जाणारे आत्ता तू येणार आहेस का आमच्या बरोबर, ६ ची आहे अपॉईंट्मेंट?

नको आई माझा क्लासच असेल ७.३० पर्यंत तो पर्यंत तुम्ही यालच ना?

बर ठिक आहे पण लवकर घरी आलीस, बाबा आले नसतील तर कुणालाही दार उघडायच नाही शोन्या.

आता पुरे ह आई मी काय सोहम आहे का? चांगली १२ वर्षाची आहे मी. तरी पण ठीक आहे. नाही उघडणार कोणाला दार. कुरियर पण सेफ़्टी डोअर मधुन घेइन. मला पाठ झालय सगळ!

अ‍ॅ$ता पु$ले ह आई मी काय सोहम आहे? माझ का नाव घेतेस ग ताईटले? असा नेहमीचा संवाद होणार म्हणुन मी सोहम कडे बघीतल तर त्याच्या कानावर पण पडल नव्हत जणु तिच वाक्य असा तंद्री लावुन बसला होता कुठेतरी.

काळजात चर्र झाल. मस्तीचा त्रास होतो त्याच्या पण त्याही पेक्षा ह्या वागण्याचा होतोय सध्या. मधेच तंद्री लागते, मधेच दचकतो काय? पोटातच काय दुखत, खाली xxxxच्या जागी तर दुखतच आहे, काल ताप पण होता. माझ्या बाळांची दुखणी तू मला दे रे गणेशा म्हणून हात जोडुन गणेशाला साकड घालुन तिघेही निघालो. सायली क्लासला गेली नी आम्ही डॉक्टरांकडे.

सुदैवाने डॉक्टर वेळेवर आले नी नंबर लगेच लागला.

काय सोहम? कुठे दुखतय बघू? आणि आम्हाला नाही ना बोलावलस मुंजीला? एकीकडे अस म्हणत त्यांच तपासण चालु होतं. थोडा सिरीयस चेहरा झाला त्यांचा, पण एक क्षणच. मग सोहमला बाहेरच्या प्लेरुम मधे खेळायला सांगुन त्यांनी मला समोर बसायला सांगितल.

डॉक्टर काही काळजी करण्यासारख...

माझ वाक्य मधेच तोडत ते म्हणाले, मिसेस जोशी तुम्ही कुठे रहाता? म्हणजे कोण कोण असत घरी?

का हो काय झाल? माझ्या काळजाच पाणि पाणि होत होतं आणि ते थेट न सांगता, घरण्याचा इतिहास विचारत बसलेले.

मी सरला जोशी, समिर म्हणजे सोहमचे बाबा बिइएसटीत क्लेरिकल पोस्ट्वर आहेत. मी घरीच असते. आम्हाला दोन मुलं. मोठी सायली १२ वर्षाची आणि हा सोहम ८ वर्षांचा. आम्ही शास्त्रिनगर भागात रहातो.

बर बर किती दिवसांपासुन तक्रार करतोय सोहम? मला मधेच तोडत त्यांनी विचारलं. झाले असतील ५-६ दिवस आधी वाटल उन्हाळा आहे, पण...

बर ठीक आहे. तुम्हाला माहीत आहे का सोहमची आई त्याला दुखापत झालेय कुणीतरी केल्यासारखी, पडुन लागल्या सारखी नव्हे. येतय का लक्षात?
"It’s a case of sexual abuse. Someone has tried to harm his genitals. that’s why there is swelling and other marks." डॉक्टर प्रोफेशनल भाषेत सांगतात.

भाषा अंगावर येते त्यांची. मी पुतळ्या सारखी निशब्द. अरे कर्मा. काय म्हणायचं हे? इतके दिवस समजत होते सायलीला जपल पाहिजे, मुलगी आहे आता मोठी होत चाललेय. पण हे काय?

माझी अवस्था ओळखुन डॉक्टर बेल वाजवुन पाणि मागवतात. घ्या मिसेस जोशी, शांत व्हा.

शांत व्हा. हा माणुस मला सांगतोय तुमच्या मुलावर काहीतरी शारिरीक अत्याचार झालाय. आणि मी मला शांत व्हायला सांगतोय?

असं होतं कधी कधी मिसेस जोशी. फ़क्त मुलीच नाही मुलगे देखील "sexal abuse" चे बळी ठरतात. सुदैवाने त्याला झालेली शारीरीक दुखापत औषधाने भरुन येण्यासारखी आहे, पण त्याच्या मनाला जी भिती बसलेय, दडपण आहे ते फ़क्त तुम्ही घरचे लोकच प्रेमाने बोलुन, जवळ घेऊन दुर करु शकता.

माझ डोकच सुन्न झाल होत. कस बस रिक्षाने घरी आलो. ७.३० वाजत आले तरी देवापुढे दिवा लावायचं देखील भान राहील नव्हत, की असा छळ मांडल्या बद्दल देवाशीच दावा लावत होते कुणास ठावुक.

समिर साठीही हा मोठा धक्काच होता. पण सोहमला सावरायच तर आम्हाला अजुन विस्कटुन चालणार नव्हत.

हळु हळु रोज थोड थोड गप्पा मारत, त्याच्या मनात शिरलो तेव्हा "बेडुक दाखवतो" प्रकरणा पासुन सगळीच कहाणी बाहेर आली.

अंदाज होताच त्याप्रमाणे आधी आयुषच्या वडीलांनी आम्हाला त्यांचा उत्कर्ष बघवत नाही म्हणुन आम्ही खोट बालंट आणतोय अस म्हंटल. पुढे पोलिस केसची धमकी दिल्यावर तो माणुस घरी येऊन रडला. पोलिसात तक्रार करु नका नाहीतर सोसायटीत तोंड दाखवणं मुश्किल होईल म्हणाले. आमच्या म्हणण्या खातर म्हणा किंवा बदनामीच्या भितीने म्हणा पण ते एकदा डॉक्टर प्रधानांना भेटायला तयार झाले. पुढे प्रधानांच्या सांगण्यावरुन त्यांनी एका मानसोपचार तज्ञांची मदत घ्यायच ठरवल पण ६ महीन्यात ते जागा सोडुन नवीन ठिकाणी रहायला गेले.

आता त्यांच पुढे काय झाल माहीत नाही. पण सोहम मधे औषध, कौन्सिलींग, आणि आमचा संवाद ह्या तिन्ही गोष्टींमुळे खुप चांगला फ़रक पडलाय.

बदललोय ते आम्ही दोघे. कुणावर विश्वास ठेवायचा, कुणावर नाही तेच ठरवू शकत नाही आहोत. माणसं देखील कांगांरुं सारख बाळ सतत जवळ ठेवुन फ़िरु शकली असती तर किती बर अस वाटतय मला.

खर सांगते. इतके दिवस वाटायचं सायली मुलगी आहे, तिला जपल पाहीजे, तिला थोड थोड सांगितल पाहीजे. स्पर्शा स्पर्शातला फ़रक ओळखायला शिकवल पाहीजे. पण सोहम काय मुलगा आहे. तो कुठेही गेला तरी "त्या" बाबतीत सुरक्षीत.

पण तिथेच कमी पडलो आम्ही. आमच्यावर ओढवल तेव्हा कळल, असेही प्रकार होतात. आणि ते देखील आपण सुरक्षीत, सुशिक्षीत म्हणवतो ना त्या समाजात.

कवी, तुला सांगायचा हेतु हाच. मागच्यास ठेच पुढचा शहाणा म्हणतात ना. मी एक ठेच लागुन मग शहाणी झाले. तुझ्या हातात लेखणी आहे. लिहीशील का हे सगळ? जेव्हढे लोक वाचतील तेव्हढे सोहम वाचतील ना ग?

पुढचा एक आठवडा मी नुसती भोवऱ्यात अडकल्या सारखी उलट सुलट फ़िरत होते. नाही उतरल ताकदीने तर? असो नाही पेललं मला तर तो माझ्या लेखणीचा दोष आणि उतरल जर समर्थ पणे तर तिची कळकळ व्यक्त झाली अस मानेन अस ठरवून लिहल आणि तुमच्या पुढे मांडलं.

ह्यात काही दोष असतील तर ते माझ्या लिखाणाचे आहेत. तिचे नाहीत, कारण ती सोळा आणे खरी आहे.

गुलमोहर: 

कवे तस मी कधी लिहित वगैरे नाही..पण कथा छान वाटली...आणखी थोडी वाढवली असतीस तर खुपच छान झाली असती.. म्हणजे तो एक आयुषच्या वडिलांचा प्रसंग, त्यानंतर मुलाला काय लागल किंवा कोणी काय केल हे टाकल असतस तर छान होती..

To the world you may be the one person, but for one you are the world !!!

कवे, थोडक्यात मांडून भिडली कथा..
खूप जपावं लागतं लहान मुलांना, नाहीतर मनावर झालेले आघात आयूष्यभर पुसता पुसले जात नाहीत. Sad
देव करो आणि कुणावरही असा प्रसंग ओढवू नये... Sad

आपल्या समाजात असे प्रश्न्न असतील हे खरतर मान्यच होत नाही. पण ही वास्तविकता आहे.
लेखन परिणामकारक आहे.

खरच होत अस .....
वाचून मला जाणिव झाली की हे अस आपल्या समाजात होत आपल्याम डोळ्यासमोर .......
कल्पना केली तरी अंगावर शहारा आला..........
तू छान लिहिले आहेस.मी वाचून थोडासा सदगदित झालो, किंवा सांगता येत नाही आहे की नक्की काय वाटतय ते...........

----------------------------------

<<बदललोय ते आम्ही दोघे. कुणावर विश्वास ठेवायचा, कुणावर नाही तेच ठरवू शकत नाही आहोत. माणसं देखील कांगांरुं सारख बाळ सतत जवळ ठेवुन फ़िरु शकली असती तर किती बर अस वाटतय मला.>>

खरयं कविता. म्हणून तर मुलांशी आपला संवाद वाढवला पाहिजे.

शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................

कवे... हादरवुन टाकलस मला अगदी! माझाही मुलगा मोठा होतोय... ! मुलगा आहे म्हणुन दुर्लक्ष्य करता येणार नाही!

दक्षिणाला अनुमोदन. कविता तुमच्या शब्दांनी आपलं काम चोख बजावलय.

कविता, चांगली मांडलीस कथा. पण आयुषचे वडील नव्याजागी नवीन सोहम शोधतील याची चीड येते.

छान आहे...नाजुक विषय....

कथा वाचुन सुन्न व्हायला झालेय. मी असतो तर लाथानी तुडवला असता त्या xxxxx ला.
सॉरी मला कल्पनाच करवत नाही आहे.

कविता, एका गहन प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद.

मायबोलीवर वेगवेगळे विषय येत आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे..
पण या गोष्टीला छान नाही म्हणवत आहे.. Sad अशी उदाहरणं का असतात जगात.. ?

असो.. तुमच्या कथेने अवेअरनेस नक्कीच वाढेल.. मुलींबरोबरच मुलांनाही या गोष्टी समजावून सांगितल्या पाहीजेत हे पटले..
वाटेवर काचा का असं काहीतरी नावाचे नाटक आठवले.. लहान मुलांना या गोष्टीची जाणीव कशी करून द्यावी व त्यावर कसे वागावे इत्यादि छान सांगितले आहे त्यात..

हम्म्म, गंभीर समस्या.
इथे टीव्हीवर एक जाहीरात येते त्यात टीनएज होवू घातलेली मुले दाखवलीयेत जी त्यांच्या आई वडीलांना म्हणतात की 'Talk to me' त्यात पण या सगळ्या गोष्टी आई वडीलांनी मुलांना योग्य वेळी सांगाव्यात असे सांगीतले जाते. कोणत्या ना कोणत्या प्रकारे सगळ्या पालकांचा (जर नसेल आधी तर) awareness वाढला तर कदाचित पालक-पाल्य यांच्यात याबाबतचा सुसंवाद वाढेल का, तो वाढायला हवा.

कविता, कठिण विषय आहे. आणि मुलगी आहे म्हणून जपायला हवं ह्या विचारात, मुलालाही जपायला लागतं... हे ध्यानी येत नाही. हे किती सशक्तं उतरलय... सुरेख.
(ही गोष्टं... सोहमची आई मिसेस जोशी सांगतायत... तुला (लेखिकेला) आणि ती तू लिहून काढलीयेस... ही तितकसं स्पष्टं झालं नाहीये. कदाचित शेवटच्या परिच्छेदांमधे... ते अधिक दाखवता आलं तर?)

खरच सुन्न करणारा विषय आहे. ....कशाचीच शाश्वती वाटत नाही असे काही वाचले की.......
फुलराणी

प्रचंड अस्वस्थ करणारा विषय आहे. चांगला मांडलाय.

मुलगा काय किंवा मुलगी काय, कुठल्या वयात त्यांच्याशी ह्यासंबंधी काय बोलायचं हे ठाउक हवं. ते मी माझ्या मुलाच्या डॉक्टरकडून शिकले. निषाद (माझा मुलगा) तेव्हा फक्त तीन वर्षांचा होता. डॉ. लता चंद्रन ह्यांनी त्याला खाली चेकअप करताना त्यांनी सगळ्यात पहीले काय सांगीतलं तर "मी एक डॉक्टर म्हणून तुझ्या आई-बाबांच्या परवानगीनं तुला तीथे तपासणार आहे. एरवी कधी कुणी अगदी डॉक्टरनं सुध्दा तीथे हात लावायची गरज नाही. लावु द्यायचा नाही." तीन वर्षाच्या पिल्लाला त्यात काय समजलं ते तोच जाणे. पण आम्हाला बसवून त्यांनी सगळी चौकशी केली. घरी कोण असतं पासून डे केअरमधे कोण, काय सगळं! दर तपासणीत त्याच्या वयाला साजेसं सांगून, आमच्याकडून पण त्याच्याशी संवाद साधल्या जातोय ह्याची खात्री करून घेतली. 'पोर साधारण १०-११ वर्षांचं झाल्यावर स्वतः आई-वडलांनी न संकोचता आणि मुलाला उगाच न घाबरवता, काय होऊ शकतं, काय व्हायला नको आणि तशी वेळ येतेय असं वाटलं तर स्वतःचा बचाव कसा करायचा' हे 'व्यवस्थित' सांगायला हवं.

प्रत्येक पालकानी मुलांन बसवून ह्याबद्दल नक्की बोलावं. 'स्ट्रेंजर डेंजर' शिकवताना 'धोका अगदी आपल्या वाटणार्‍या विश्वासातल्या लोकांकडूनही असू शकतो' ह्याची मुलांना कल्पना असायलाच हवी.

असो.. तुमच्या कथेने अवेअरनेस नक्कीच वाढेल...बी येस के आनि म्रिन्मयीशी सहमत!

कविता, तुला मनापासुन थॅंक्स, ह्या नाजुक विषयावर लिहील्याबद्दल. आपल्या पाल्याशी सुसंवाद असणे किती गरजेचं आहे.

आयुषचा प्रचंड राग येतो पहिले अन मग नंतर विचार करता कीव वाटते. त्याच्या वडीलांना जर का आपल्या मुलाच्या बाबतीतला हा प्रॉब्लेम आधीच माहीती असेल अन त्यांनी त्यावर काहीही केले नसेल तर वडीलांनाच मानसोपचाराची आधी गरज आहे.

मी कुठेतरी एक वाक्य ऐकलेलं ..जे आपल्या मुलीच्या बाबतीत कधीही होऊ नये असं वाटतं ते आपल्या मुलाच्या हातुनही होता कामा नये. आणि म्हणून पण सुसंवाद आवश्यक आहे.

मृण, तु पण चांगलं लिहीलयस. इकडे शाळेत पण सांगतात नं? ह्या विषयावरच्या वेब साइट्स वगैरे माहीती असतील तर प्लिज सांग.

कविता खुप नाजुक विषयावर लिहिलं आहेस , मुलं लहान अस्ताना पालकांनी खरच खुप जागरुक राहायला हवं. आयुष सारखी कीड आपल्याकडेही आहे फक्त अमेरीकेतच नाही .
हे खुपच भयानक आहे एकंदरीत , एखाद्या लहानग्याचं आयुष्य उध्वस्त होउ शकते. Sad

--------------------------------------------------------------
- सक्षम दळवी

पन्ना, शाळेत सांगतात पण कोणत्या ग्रेडपासून ते मलाही माहित नाही.
कविता, नाजूक विषयाला हात घातला आहेस. आणि चांगलं लिहिलं आहेस.
बर्‍याच मुलगा असलेल्या आई वडिलांचा गैरसमज असतो की आपल्याला मुलगा आहे म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही पण तशी परिस्थिती काही राहिलेली नाही. भारतात काय नी भारताबाहेर काय...

हम्म्म्म, आमच्या आसपासही असे बरेच प्रसंग घडताना पाहिले आहेत. मी तर लेकीला (वय वर्षे ४ )अजिब्बात कोणावर सोडत नाही. मला बाहेर जायचे असेल, तिचा बाबा घरी थांबतो. नाहीतर मी घेऊनच जाते तिला बरोबर. हे दोन्ही शक्य नसेल तर मी जातच नाही. तसे स्पष्ट सिनियर लेडीजना सांगते. आणि कोणी आक्षेपही घेत नाही. समजून घेतात.

तिला शिकवूनही ठेवले आहे की, आई-बाबा सोडून इतर कोणी चड्डीला हात लावला तर एक ठेवुन द्यायची. अतिरेक वाटेल , पण याची खूप गरज आहे हल्लीच्या काळात.
................................
माझे जगणे होते गाणे...

मनापासुन धन्यवाद सगळ्यांना.

दाद - तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. ही "जोशींची" कथा आहे हे अगदी त्रोटक पणे व्यक्त होतय. सुरुवात आहे ना लिखाणाची. जमेल हळु हळु Happy

प्राची - तुझ काहीच चुकत नाही आहे. मी पण असच करते. to be safer than sorry बरोबर ना. म्रुण्मयी ने म्हंटल्या प्रमाणे मी ही सानिकाला ती २.५ - ३ वर्षाची असल्यापासून जमेल तस समजावतेच आहे.

"वाटेवरती काचा ग" हे ते नाटक. आजकाल काही शाळांमधुन ८-९ च्या विद्दार्थ्यांना दाखवतात अस ऐकलय. मलाही बघायचय एकदा.
काही पुस्तके ही आहेत, मलाही मिळवायचेत वाचायला.

http://www.childsexualabuseinindia.blogspot.com/

http://www.helpguide.org/mental/child_abuse_physical_emotional_sexual_ne...

ह्या काही चांगल्या लिंक आहेत. अजुनही असतील.

म्रुण्मयी: खरच अशी माहीती डॉक्टरांकडुन सांगितली गेली पाहीजे.

हि एक बातमी म्हणुन वाचली होती. सुन्न झालेले वाचून. मग मनानेच त्या आई जवळ पोहोचायचा प्रयत्न केला आणि झाली "मिसेस जोशींची" गोष्ट. काही शब्द आपण आपल्या पाशी ही उच्चारताना आजुबाजुला बघतो एव्ह्ढा आपल्या वर आपल्या संस्कारांचा पगडा. त्यातून ह्या विषयावर लिहायच ठरवल्यावर सतत भिती वाटत होती, हा विषय नुसताच नाजुक नाही तर अवघड आहे. लिहीताना काही शब्द विषयानुरुप लिहावे लागणार पण कुठे बिभत्स होता कामा नये. हे जमेल का आपल्याला. हेच ते अवघडलेपण. विषयाचा अवाका खुप मोठा आहे. हे अस काही पण होत आणि ते ही आपल्या मध्यमवर्गीय सुरक्षीत चौकटीतही, हे आधी मला पचायला जड गेलेल ते पचवुन तुमच्या पर्यंत मांडण माझ्यासाठी खुप कठीण होतं. दाद म्हणते तस झालय खर की शेवटला पतकन ही कहाणी जोशी लेखिकेला सांगतात हे एकाच परिच्छेदात आटपलय. खरतर मी पुर्ण exhaust झाले होते लिहिताना. हळु हळु जमेल.

पुन्हा एकदा धन्यवाद Happy

फक्त च... ला हात लावला तरच abuse होतो असं नाही. मुल लहान असलं तरिही कुठला माणूस आपल्याला कोणत्या हेतूने स्पर्श करतोय हे त्याला बरोब्बर कळतं. खरंतर असे प्रसंग टाळायचे असतील तर लहान मुलांशी बोलून त्यांना जास्तीत जास्त जागरूक करणं गरजेचं आहे. शेवटी आई-वडील सतत तरी किती बरोबर रहाणार? मुलं मोठी झाल्यावरही अ‍ॅब्यूज होऊ शकतोच की. रिक्षावाले, शाळेतले शिपाई, इतकंच काय पण गमती गमतीत बरोबर खेळणार्‍या मोठ्या मुलांकडूनही असा abuse होऊ शकतो. त्यामुळे मुलांनाच एम्पावर करणं गरजेचं आहे. आपल्याकडे मोकळेपणाने कधीही बोलले जात नाही, मुलांचे कुतुहल जागे होईल असा प्रसंग टिव्हीवर आला की आपण चॅनल बदलून टाकतो. मुलांच्या मनातले प्रश्न त्यांच्या मनातच रहातात.

आई-वडीलांनीच आपल्या पाल्यांना हे असं होऊ शकतं तसं कधी झालं तर न घाबरता आधी आम्हाला सांग असा धीर दिला तर आयूष्यभर वाहवून न्याव्या लागणार्‍या जखमेवर थोडी तरी फुंकर बसेल.

दुर्दैवाने भारतात चाईल्ड अ‍ॅब्यूज चं प्रमाण ९८% यापेक्षाही जास्त आहे. आपण प्रत्येकानेही आपल्या लहानपणी असा एखादा तरी प्रसंग अनुभवलाच असेल. आपण नाही बोलू शकलो कुणाशी निदान आपल्या पाल्यांना तरी ती संधी दिली पाहीजे.

दक्षिणा १००% बरोबर लिहीलयस.

कविता...खूप छान लिहिले आहे....एक वेगळा, नाजुक पण तितक्याच महत्वाच्या विषयावर लिहिल्याबद्दल अभिनंदन!!

०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

कविता उत्तम आणि वेगळ्या विषया वरचा लेख!! अभिनंदन!!

कविता ! खरंच सुन्न करणारा अनुभव. माझी मुलगी (वय वर्षे ११) तिच्या मैत्रीणीशी गप्पा मारताना "दोस्ताना" ची चर्चा करत होती. ती आणि तिची मैत्रीण दोघीही आपल्या परीने विषय समजावून सांगत होत्या. मी किंवा माझ्या पत्नीने घरातही ही चर्चा टाळली होती. English Medium असल्याने Gay चा डिक्शनरीतला अर्थ दोघींनाही माहिती होता. पण हे कसं शक्य आहे हा गोंधळ मात्र त्यांच्या बोलण्यातुन जाणवत होता. पत्नीच्या लक्षात आल्यावर तीने ते संभाषण मध्येच तोडलं. पण संभाषण त्या क्षणी तोडून आपण फार काही मिळवलं असं नाही हे आमच्या लक्षात आलं. अजुनही आम्ही गोंधळातच आहोत. थोडं विषयांतर झालं, पण मनात असलं तरी काही वेळेला आपण मुलांशी संवाद साधु शकत नाही.

सुंदर मांडणी !

फक्त च... ला हात लावला तरच abuse होतो असं नाही. मुल लहान असलं तरिही कुठला माणूस आपल्याला कोणत्या हेतूने स्पर्श करतोय हे त्याला बरोब्बर कळतं. खरंतर असे प्रसंग टाळायचे असतील तर लहान मुलांशी बोलून त्यांना जास्तीत जास्त जागरूक करणं गरजेचं आहे. शेवटी आई-वडील सतत तरी किती बरोबर रहाणार? >>>>

अगदी बरोबर.. हेच लिहीणार होते.. अगदी जवळच्या नात्यातले/शेजारचे लोक सुध्दा विनाकारण अंगचटीला येणे, गालगुच्चे घेणे असं करतात. मुलींना(मुलांनासुध्दा अस आता म्हणेन) हे वेळीच सांगितले पाहिजे. अन सर्वांत महत्वाचे म्हणजे पालकांशी संवाद.

खरच किती विकृत मनो वृत्तीची माणस असतात. हल्ली कोणावरही विश्वास ठेवण्यात अर्थ नाही.एक जणी कडुन ऐकल की शेजारिण विश्वासाने शेजारच्या आजोबांकडे मुलीला ठेऊन जायची , वय ७०, पण त्यांनी ही त्या ६-७ वर्षाच्या मुलीला ही सोडल नाही , बिचारी रहायला तयार नसायची त्यांच्याकडे पण आईला वाटायच काही तरी नाटक करतेय, एकदा धाय मोकलुन रडायला लागल्या वर खरी गोष्ट कळली.

कविता, अतिशय समर्थपणे विषय मांडला आहेस.
************
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग

Pages