मायबोली गणेशोत्सव २०१७ - तुमच्या गावाचा गणपती

Submitted by संयोजक on 24 August, 2017 - 01:12

जास्वंदीच्या माळा शोभे तुझ्या गळा
पाहण्या तुला लोचनात भाबड्या लेकरांचा लळा

हार फुल दुर्वा वाहू चरणी
पाहिले का आगमन चिंचपोकळीचा चिंतामणी(चा)

चंदनाचा टिळा शोभे तुझ्या कपाळा
रमला दगडूशेठचा आगमन सोहळा

Ganesh (3).jpg

आपल्या गावचा गणपती म्हणजे आपला खास जिव्हाळ्याचा विषय. मग तो गावच्या जुन्या देवळातला असो की सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा असो. त्याला आपण आपल्या मनाच्या गाभार्‍यात जपून ठेवतो. तसेच त्याची स्मृती कायमची कोरली जावी म्हणून आपल्या कॅमेर्‍यातही छायाचित्राच्या रुपात जतन करतो. अशी प्रकाशचित्रे बघण्यासाठी सगळे मायबोलीकर उत्सुक आहेत.
तर मित्रहो, लवकर लवकर कामाला लागा आणि आपली अशी प्रकाशचित्रे ह्या धाग्यावर अपलोड करा.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१७' ह्या गृपचे सभासद असणे गरजेचे आहे.
३. एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे तुम्ही काढलेले आणि प्रताधिकार मुक्त असावे.
५. फोटो इथेच प्रतिसादात द्यायचे आहेत.

काय म्हणता? तुम्ही अजून काढलेच नाहीत? मग चला! लवकर लवकर फोटो काढा आणि सर्वांना दाखवा बरं!!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Shri Sarvajanik Ganesh Utsav Mandal, Shri. Chatrapati Shivaji Colony, Tilakwadi, Belgaum

मंडळी, मायबोली गणेशोत्सव २०१७ ची सांगता झालेली आहे.
आपल्या भरभरून प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद!
गणपतीबाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!!