निळावन्ती

Submitted by अनन्त्_यात्री on 23 August, 2017 - 01:36

मग निळ्या दरीतुन हाक
येताच काफिला उठला
नक्षत्रजडित रात्रीला
हुंदका अनावर फुटला

त्या निळ्या दरीच्या गर्भी
घननीळ गूढसे काही
नि:शब्द काफिला भोगी
ती पिठुर रानभुल देही

रिमझिमत्या निळसर रात्री
गारूड निळेसे भिनले
की स्वप्न निळावन्तीचे
मी माझ्यावर पांघरले

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ओ हो हो.....
अफाट.....

_____/\____