प्रेमरंग

Submitted by र।हुल on 22 August, 2017 - 13:09

नजर भिरभिरते त्याची
गंमत मजला वाटते
बघुनी त्याला मी
बावरून कधी जाते

खळखळून तिचं हंसणं
वेड मजला लावतं
थरथरल्या ओठांनी
अबोल काही बोलतं

गंभिर त्याचं बोलणं
आधार कधी बनतं
साधंच त्याचं वागणं
भारावून मला टाकतं

सुंदर तिचं दिसणं
बघत रहावं वाटतं
हळूच तिचं लाजणं
भान माझं हरवतं

त्याचं वेड हे लावणं
हलकेच मिठीत घेणं
रंगवेड्या स्वप्नांना
हळूवार कवटाळतं

अलगद बाहूंत येणं
स्वप्नांत हरवून जाणं
तिचं समर्पित हे होणं
नव्यानं प्रेमात पाडतं

―₹!हुल/ २२.८.१७

Group content visibility: 
Public - accessible to all site users