सुटोत बंधही सारे कैद ही खास आहे

Submitted by निखिल झिंगाडे on 22 August, 2017 - 08:56

तुला न भेटलो मी आसवांची रास आहे
सांग कसा जगू मी आठवांचा भास आहे

एकटाच राहतो मी एकटाच गात आहे
एकदाच भेट आता एवढीच आस आहे

मनी न पाहिले ते हे स्वप्न मी जगत आहे
मनात माझिया का तुमचाच वास आहे

नभी जुना अता तो सावल्यांचा खेळ आहे
करेल का पूर्ण इच्छा ताऱ्याचा ह्रास आहे

तुझेच वागणे हे वाटतेच विशेष आहे
सुटोत बंधही सारे कैद ही खास आहे

तूही इथेच आहे अन् मी ही इथेच आहे
एकांत आज आहे का होतोच त्रास आहे

नको करूस सोंगे मुखवटे फाटतील येथे
निखिल सांगतो आहे बातच ही खास आहे

Group content visibility: 
Use group defaults

आवडली.

नभी जुना अता तो सावल्यांचा खेळ आहे
करेल का पूर्ण इच्छा ताऱ्याचा ह्रास आहे>>>> सूर्यग्रहण Happy