घाव झेलण्यास सज्ज मी परी....

Submitted by राजेंद्र देवी on 22 August, 2017 - 00:06

घाव झेलण्यास सज्ज मी परी....

किती ताकद या खगात
कोणी का पाहिले आहे
या नभात मला
कोंडुन ठेवले आहे

किती उसळू पाहतो हा दर्या
कोणी आजमाऊन का पाहिले आहे
या किनार्‍यांनी मला
बांधुन ठेवले आहे

चौफेर धाव माझी
कोणी फिरुन का पाहिले आहे
या क्षितिजाने मला
अडवुन ठेवले आहे

घाव झेलण्यास सज्ज मी परी
कोणी विंधुन पाहिले आहे
या हृदयात माझ्या
जखमा विशाल आहे

राजेंद्र देवी

Group content visibility: 
Public - accessible to all site users