मग्रूरी तुझी मोडतो आहे

Submitted by दत्तात्रय साळुंके on 20 August, 2017 - 12:19

मग्रूरी तुझी मोडतो आहे

पाहीली तुझी दया, दयाघना
घास गरीबाच्या घराचा घेतलाना
झिजलो, जमविली काडी, काडी
चंद्रमौळी बनवली होती झोपडी

वाहले सारे, विझली चूल
फाटका संसार, नागडे मूल
त्याचीही पडावी तुला भूल
सर्वस्व लुटून झालास गूल

उघडयावर आता लढतो आहे
नशीब फाटके शिवतो आहे
काडी, काडी जोडतो आहे
मग्रूरी तुझी मोडतो आहे

काही तरी यातून आता शिक
कोलंबस न मागे कोणा भीक
अगस्तीचे आम्ही वंशज
आचमनी प्राशन करु तुज

दत्तात्रय साळुंके

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहीली. आवडली..
>> अगस्तीचे आम्ही वंशज
आचमनी प्राशन करु तुज<<< +१ मला हा विचार खुप भावला.

राहुल , VB
उत्कट प्रतिसादासाठी मनस्वी धन्यवाद .

छान लिहलय आवडली.
खूप भारी असतात तुमच्या कविता असंच लिहीत रहा पुलेशु

आवडली...

गरीबाच्या घराचा घेतला घासना

"घास गरीबाच्या घराचा घेतलाना" असा बदल सुचवावास वाटतो...

राजेंद्र देवी

राजेंद्रजी परिणाम कारक बदल सुचविल्या बद्दल खूप खूप धन्यवाद . योग्य तो बदल केला आहे ! या पुढे देखील असे बदल वा मार्गदर्शन स्वागतार्ह असेल .