वदनि पेग घेता ....

Submitted by चामुंडराय on 20 August, 2017 - 09:14

कृपया नशापाणी न करता, वारुणीला साथीला न घेता हे काव्य वाचू नये.
अतिबाल्य आणि अतिसंवेदनशील तसेच हे कंबख्त मैं पीता नही अश्या व्यक्तींनी हे काव्य वाचू नये.
विसू: Drink responsibly, Drive sober
.
.
.

वदनि पेग घेता
चव घ्या चखण्याची ।

सहज किक बसते
मिळता पिण्या फुकाची ।

सातत्ये करि मैफिल
दारू हि झिंगब्रह्म ।

सुरापान नोहे
जाणिजे नशाकर्म ॥१॥

पेगवर पेग घेता
नाम घ्या साकियाचे |

पिताना स्मरण ठेवा
आम्हा बांधवांचे |

रम जीन व्हिस्की
सोनेरी पेय्य चषकात |

त्रास चिंता काळजी
विसरा या नशेत ॥२॥

वारुणी हि वैरिणी
असे जे सांगतात |

बियर वाईन टकिला
वर्ज्य मानतात |

स्मरण करुनी त्यांचे
दारू प्या खुशाल |

सुरापान करील
चित्तवृत्ती विशाल ॥३॥

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users