माझं झोपडं गळाय लागलं

Submitted by र।हुल on 20 August, 2017 - 04:50

आरं मेल्या तुला रं भरतं आलं
माझं झोपडं गळाय लागलं ॥धृ॥
तुझ्या येण्यानं गारठं वाढलं
माझं लेकरु कुडकुडाय् लागलं ॥१॥

तू हैदोस घालतोय सैतानी
कुठं घ्यावा आसरा आम्ही
हे वारं भणभणाय लागलंय
कसं तगावं ह्या झोपड्यांनी ॥२॥

पै पैका जोडूनी कष्टानी
हा जोडला संसार दोघांनी
तु कोसळतोय केवढ्यानी
भिजलं सगळंच चाल्लंय वाहूनी ॥३॥

थांबव रं आता तुझं रुप मर्दानी
ये रं थोडा हलका, हलक्यावानी
जगू दे रं आम्हाला बी मानानी
खाऊ दे कि रं चार घास सुखानी ॥४॥

―₹!हुल/ २०.८.१७

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !

छान Happy