काय झालय मला काही कळत नाही

Submitted by मंगेश.... on 19 August, 2017 - 23:02

काय झालय मला काही कळत नाही
कुठे दुखतय काही असही नाही
कुठे खुपतय म्हणाव तसही नाही
मग काय झालय माहित नाही
काय झालय मला काही कळत नाही
तिच्या प्रेमात पडलोय असही नाही
फक मैत्री आहे आमच्यात तसही नाही
नेमक काय मी ही सांगु शकत नाही
छे हो काय झालय मला काही कळत नाही
तिच्याशी भांडाव वाटतय आजिबात नाही
फोन करुन बोलाव वाटतय तसही नाही
खरतर फोनवर तिच्याशी बोलायच
साध धाडसही अंगात नाही
खरच काय झालय मला काहि कळत नाही
आता ठरवलय या प्रश्नाच उत्तर शोधायच
उद्या तिला भेटायला बोलवुन सरळ प्रपोज
करायच
पण ती हो म्हणेल का? माहित नाही
नाही म्हणेल असही वाटत नाही
कस होणार माझ काही कळत नाही
काय झालय मला काही कळत नाही

Group content visibility: 
Use group defaults

छान !