अस्वस्थ एकटाच उरलो

Submitted by र।हुल on 18 August, 2017 - 07:37

या आभासी जगतात
घटकाभरी मी रमलो
रास दु:खांची विशाल
विसरण्या मी स्थिरलो

शब्दांचे बाण विखारी
घायाळ करतसे अंतरी
प्रेम ओलावा नात्यांचा
मिळवण्या मी धडपडलो

होताच जाणिव मर्यादांची
अस्वस्थ एकटाच उरलो
प्रेमफुंकर घालण्या कुणाची
व्याकूळ! वाट बघत बसलो

शब्द-वेलींच्या सोबतीनं
जग एकट्यानंच बनविलं
जगण्याची धडपड दीन
पाणी घालण्या मी विसरलो

₹!हुल/ १८.८.१७

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्दांचे बाण विखारी
घायाळ करतसे अंतरी
प्रेम ओलावा नात्यांचा
मिळवण्या मी धडपडलो
होताच जाणिव मर्यादांची
अस्वस्थ एकटाच उरलो
प्रेमफुंकर घालण्या कुणाची
व्याकूळ! वाट बघत बसलो>>>.> Happy