ये, दिक्कालबंध तोडून ये....

Submitted by अनन्त्_यात्री on 17 August, 2017 - 02:31

ये,
उद्याच्या कविते
दिक्कालबंध तोडून ये,
ओसंडत, रोरावत, अनावर ये
भारून टाक अवघ्या अस्तित्वाचे अवकाश
कडाड कोसळ या अस्थिमज्जेच्या पिंजऱ्यावर
एक एक अणू व्यापून टाक जाणिवेचा-तुझे देणे चुकेपर्यंत
घे आधार तोकड्या अक्षरांचा - कागदावर वज्रलेप होण्याआधी

दे
उसंत
फक्त
कालच्या
कवितेच्या
कलेवरावर
कायमचे कफन घालण्याची !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults