ऐसी भी क्या जल्दी है !

Submitted by sudhirvdeshmukh on 11 August, 2017 - 21:39

सध्या सर्वाना पुढे जायची घाई आहे. परंतु काहि महाभागांना मात्र जरा जास्तच घाई दिसते. ही सतत व्यस्त, त्रस्त आणि काहिशी अत्यव्यस्त असणारी मंडळी भेटणार्यांची अनेक ठिकाणे आहेत. प्रामुख्याने ATM, पेट्रोल पंप, ट्राफिक सिग्नल्स, टिकिट खिडकी इत्यादी ठिकाणी ही मंडळी हटकुन भेटतात. गर्दीच्या रस्त्यांवरून सुसाट वेगाने वाहने पळवनारे कुशल वाहन चालक याच जात कुळीतले. बहुतेक सर्वाना रेल्वे स्टेशन वर जायचे आहे व पोहचले नाहीतर यांची गाड़ी सुटनार, अर्थातच गाडी सुटली तर यांचे आयुष्यभराचे नुकसान होणार, असेच आपल्याला वाटावे एवढ्या सुसाट वेगात ही मंडळी जात असतात. कधी कधी तर यांचा जवाळचा नातलग ईस्पितळ मधे आहे आणि त्याला हवे असलेले रक्त यांच्याच जवळ आहे असे ही वाटते. ही मंडळी एवढ्या वेगात जाते की आपल्या छातीत धडकी भरते. मधे एकदा असाच वेगात निघलेला तरुण माझ्या छातीत धडकी भरून माझ्या जवळून गेला. पहाटेचि वेळ होती, मला वाटले याचा नक्की पेपर असणार. बिचारा रात्रभर जागला असणार सकाळी सकाळी डोळा लागला असणार. आता निघायला उशीर झाला त्याला तो तरी काय करणार ?

आई वडिलांची स्वप्न पुरी करण्यासाठी ही कोवळी मूल किती कष्ट उपसतात. माझे स्वप्नरंजन थोड्याच वेळात , धावत्या गाडीला ब्रेक लावावा तसे खचकन थांबले. कारण थोड्याच वेळा पूर्वी माझ्या समोरून झपाट्याने गेलेला तरुण रस्त्या शेजारील एका पानठेल्यावर गप्पा मारत उभा होता. एवढ्या वेगात निघालेले हे प्रवासी शेवटी पोहचतात कुठे हा मला नेहमी पडनारा प्रश्न. ऐक मात्र खरे गुळगुळीत रस्त्यावर दिसनारी स्पीडब्रेकर (शासकीय मराठीत गतिरोधक) यांच्या मुळेच करावी लागतात. परंतु हे स्पीड ब्रेकर, स्पीड ब्रेक करायला आहेत की हाडं याचा उळगळा मात्र होत नाही. एकदा एका हाडाच्या दवाखान्या समोर भलामोठा स्पीड ब्रेकर मी बघितला होता, तो या डॉक्टर च्या सोईसाठीच केला की काय असा कुत्सित विचार माझ्या मनात यायचा. एकदा तर एका अडलेल्या बाईला वाहनातच मूल या स्पीड ब्रेकर मुळे झाले म्हणे. (लोक पण काहिही अफवा करतात )
आपण घाईतल्या लोकांविषयी बोलत होतो. वर जी यांची आवडती स्थानं सांगितली त्यातलच एक म्हणजे ATM. खरतर ATM मुळे वेळेची प्रचंड बचत होते असा माझा अनेक दिवस गैर समज होता, आणि हो तो गैर समज या उद्योगी लोकंनीच दुर केला. तुम्ही ATM च्या आतमधे आहात आणि तुमचा पिन नंबर चुकला, तुम्ही परत प्रयत्न करणार नेमका त्यावेळेस वर उल्लेखीत उद्योगी स्वभावाचा व्यक्ति नेमका तुमच्या मागे असला तर तो खचकन दरवाजा लोटनार व तुम्हाला विचारणार "क्या बात है ! पैसा नहीं क्या?" तुम्हाला मानसीक ताण येणार त्या ताणात तुम्ही परत पिन नंबर विसरणार तो परत आत येणार आता त्याचा प्रश्न " क्या बात है ? जम नही रहा क्या ?" या पूर्वी तुम्ही अनेक वेळा पैसे काळले असले तरी तो तुमच्या कड़े "नया है यह" च्या अविर्भाव आणत पाहनार. शेवटी तो तिथून हटनार नाही. "तुम्ही म्हणणार अच्छा पहले आप निकाल लो" शेवटी तो प्रचंड उद्योगी असल्यामुळे तुम्हचे ऐकणार. माझ्या सारख्या रिकामटेकळ्या माणसाला अशी बिजी लोक नेहमीच भेटतात. अशीच काही घाईतली लोकं भेटन्याची जागा ट्राफिक सिग्नल्स. खरतर ट्राफिक सीगनल्स वर कोणी निवारा करण्यासाठी आलेला नसतो. सध्या लाल सिग्नल सुरु आहे, हिरवा सिग्नल सुरु व्हायला काही सेकन्दाचा अवकाश लगेच मागून हॉर्न वाजने सुरु झाले की समजावे मागे कोणी उद्योगी व्यक्ती आहे. आपल्या सारखा रिकामा व्यक्ति नेमका त्याच्या समोर यावे हे त्याचेच दूर्देव

पेट्रोल पंपवर तर ही मंडळी एवढ्या शिताफीने गाडी लावतात की तुम्ही ही विचार कराल की माझी लाइन बरोबर की याची. टिकिट साठी खिडकित उभे राहणाऱ्या माझ्या सारखी वेंदळी, ही मानसं नसतात. रांगेत आपल्या समोर उभ्या असणाऱ्या युवकाला चुपचाप पैसे देवून ही आपल्या आधीच टिकिट काढून घेणार. काही काही तर इथे चक्क लाइन नाही असे समजून थेट टिकिट खिडकी जवळ जातात. मागून ओरड होते "दिखता नही क्या लाइन हैं! "
या प्रकारच्या लोकांना कायम घाई असते घरी दारी कुठेही यांचा जन्मच घाईत झाला का असा संशय मला वारंवार येत असतो. ही माणसं तुमच्या माझ्या सारख्या धीमी गतीसे चलने वाल्यांना कधी आडवी येतील सांगणे कठिन.

सुधीर विनायकराव देशमुख
अमरावती
15/05/16
http://sudhirvdeshmukh27.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users