शापित जीणं

Submitted by र।हुल on 11 August, 2017 - 17:04

वेदना त्यांचीलिहीण्या
दारिद्र्य माझ्या लेखणी
मन माझे सुन्न होते
ऐकूनी त्यांची कहानी

नवनिर्माणाचे सौंदर्य अंगी
का ठरावा शाप जिवनी
स्वप्नं साध्याच जगण्याचे
का उधळावे हे लहानपणी

कर्मयोग त्यांनी आचरीला
गिताज्ञान नकळत मिळाले
सांग हे भिकारड्या देवा, का
भोग त्यांच्या भाळी लिहीले

सभ्यतेचा उगाची आव आणितो
क्रूर त्याचे हिनकस वागणे
वासनांध माणसांची नजर झाली
माता भगिनी आपल्याच विसरणे

[अपुर्ण]

―₹!हुल/१२.८.१७

Group content visibility: 
Public - accessible to all site users