राजकुमारी

Submitted by र।हुल on 11 August, 2017 - 08:54

लहानगी परी खेळकर ती
जणू नक्षत्रांचे चांदणे
हसताना चमके शुभ्र मोती
जणू चांदण्यांचे सांडणे

बोबडे बोल ते सुरीले
जणू मंजूळ गाणे
निरागस हसणे मुखीचे
भान दोघांचे* हरवणे

सुंदर ती राजकुमारी
बाबा म्हणूनी हाक मारी
धन्य आहे 'ती' देणारी
पदरी माझ्या राजकुमारी

―₹!हुल /११.८.१७
[*दोघांचे- आम्ही दोघं अर्थात् आईबाबा]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !