जखमी फुलपाखरू..

Submitted by राजेंद्र देवी on 10 August, 2017 - 23:47

जखमी फुलपाखरू..

नशिबाच्या वाटा अनेक
कोणता पद्पथ धरु
सरले सारे आयुष्य
नव्हता कोण गुरु

मिटल्या डोळ्यांनी पाहत होतो
स्वप्नांना धरू
विरलेल्या कागदावर
सांग कोणते रंग भरु

चुकले सारे आयुष्य
पुन्हा कसे सावरु
वेदनेला किती गोंजारु
जखमी हे फुलपाखरू

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीलं आहे.
आयुष्याच्या संध्याकाळची वेदना शब्दबद्ध केल्यासारखी वाटली.