वैद्य खडीवाले ....यांची माहिती शेयर करा प्लीज ...

Submitted by नाविन्या on 9 August, 2017 - 05:21

Vitiligo विषयी माहिती या ग्रुप वर विचारले पण कोणी तिकडे प्रतिसाद देत नाही म्हणून हा धागा
प्लीज मदत करा ...

मला आधि पितिरिअसिस व्हरसिकलर म्हनुन डाय्गग्नोस केलेला डाग आता व्हिटिलिगो म्हनुन सन्गितल आहे
छोटासा डाग आहे खांद्यावर आणि वाढतो आहे
खूप डिस्टरबिंग आहे, डॉक्टर UV ट्रीटमेंट घ्यायला सांगा आहेत

इंटरनेट वर सगळीकडेच हेरेडीटी म्हंटलं आहे
लहान मुलगी आहे... उगाचच नको ते विचार येतात
माझ्या माहेरी सासरी कोणालाही हा त्रास नाही
डॉक ने सांगितलं आहे कि जास्त इन्फो वाचूच नका जस्ट बेलीव्ह मी
नवरा आणि घरचे सगळेच खूप सपोर्टिव्ह आहेत

पण अजून तरी "मीच का" हि फेज आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Khadiwale Doctor
352-,Narayan Peth, Pune - 30

020 2445 1871

तिथे अपॉइंटमेंट विना जात येते का
....खूप प्रश्न विचारते आहे पण सध्या तरी सेकंड ओपिनियनची खूप गरज वाटते आहे.... प्रचंड अस्वस्थता आहे

आणि इथेच वाचून समजला वैद्य खडीवाल्यांबद्दल..

तिथे अपॉइंटमेंट विना जात येते का>>> हो जाता येते.बरीच गर्दी असते,त्यामुळे थांबण्याच्या तयारीने जा..सोबत फडके,रुमाल अवश्य ठेवा.घाण वासाचा त्रास होतो शेजारच्या बाथरुममुळे.

ओके..थँक्स अंकु...
कॉन्टॅक्ट केला मी, ते म्हणाले अपॉइंटमेंट ची गरज नाही ...लांब आहे... म्हणून लवकरच जाइन

नाविन्या... फक्त आयुर्वेदिक औषधे घ्या.. आणि जर फरक पडला नाही तर एक सगेशन देतो... स्किन सिटी म्हणून एक हॉस्पिटल आहे पुण्यात, तिथे शरीराच्या दुसऱ्या बाजूच स्किन काढून ते प्याच वर लावून पिगमेंटशन करतात..
बेसिकली, मेल्यानीन मिळते आणि डाग निघून जातो..

यास आयुर्वेदात श्वेतकुष्ठ म्हणतात. पंडित रामनारायण शर्मा आरोग्यप्रकाश/ बैद्यनाथ प्रकाशन ( भाग दुसरा) मध्ये काय म्हणतात पाहा-
कोठा साफ ठेवणारी औषधे घेणे आणि इतर औषधे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ घेतल्यावरच काही गुण दिसण्याची शक्यता असते. रक्तदोष हेसुद्धा कारण असते.

डॉक ने सांगितलं आहे कि जास्त इन्फो वाचूच नका जस्ट बेलीव्ह मी>>>>>>> खरंय त्यांचे म्हणणे.

सांगायला सोपे वाटते पण धीराने घ्या. डाग हळुहळू निघून जाईल.माझ्या जवळच्या नातलगाना असे झाले होते.ते आता पूर्ण बरे झाले आहे.

नाविन्या, धीराने घ्या.
आयुर्वेदिक उपचाराने फरक पडतो.
ही व्याधी जितकी जुनी तितका वेळ लागतो बरे व्हायला, तुम्हाला आताच सुरूवात आहे तर गुण येण्याची शक्यता वाढते.
शरीराच्या प्रतिकारशक्तीवरही गुण येणे अवलंबून असते.
मानसिक ताणाने हे वाढू शकते म्हणून मन खंबीर + उमेदीचे विचार -- हे आवश्यक आहे.
याचा ईलाज हा व्यक्तिसापेक्ष असतो. तुम्हाला कुठले औषध आणि उपचार पद्धती ( पोटात औषध घेणे, बाहेरून लेप, शरीराचे शुद्धीकरण इ) लागू पडतेय ते बघून तो ईलाज पुढे कंटीन्यू होईल.

मी वैद्यकीय तज्ज्ञ नाही. माझी मैत्रीण आयुर्वेदिक डॉ आहे आणि स्वतःवर उपचार करते आहे. तिच्या वैयक्तिक नोंदी आणि निरीक्षणे यातून ही माहिती तिने मला दिली. मनापासून शुभेच्छा.

हे वैद्य शनिवार, रविवारी दादर पूर्व, मुंबई येथे असतात. (नक्की वेळ माहित नाही, कळली की इथे टाकेन).
मात्र त्यांच्याशी बोलताना नेमक्या शब्दातच, थोडक्यात आपली समस्या सांगावी, त्यांना उगाच पाल्हाळ लावलेले, अघळ-पघळ बोललेले आवडत नाही, असे ऐकलेले आहे.

if anybody wants more information about Dr. khadiwale (senior) P.Y.Vaidya khadiwale, please call me 9822041308. I know him since 2 years and now i am also doing his 1 year program called " Barefoot Doctor"

<<डॉक ने सांगितलं आहे कि जास्त इन्फो वाचूच नका जस्ट बेलीव्ह मी>>
-------- मी तुमच्या जागी असेल तर असे अजिबातच करणार नाही.... माहिती मिळवणे, त्यावर विचार करणे या पक्रिया थाम्बवू नका. माहिती मिळवण्याचे सर्व उपलब्द स्त्रोतान्चा पुर्ण वापर करा आणि विचार करुन निर्णय घ्यायचा आहे. कुठलाही निर्णय घेताना घाई अजिबात करु नका.... १-२ आठवडे, महिन्यान्नी काहीच फरक पडत नाही.

<<पण अजून तरी "मीच का" हि फेज आहे>>
-------- त्याच बा फ वर माझा पहिला प्रतिसादा तुम्ही बघितला असेल... त्वचेची अशी स्थिती autoimmune disorder या प्रकारत मोडते. यावर १०० % उपाय नाही आहे. उपाय असतीलही पण त्याचे काही दुष्परिणामही आहेत. काही ट्रिटमेन्टचे उदा: UV, laser, PUVA दुरगामी परिणाम होण्याची शक्यता असते. protopic मलमाने काहीन्ना फरक पडलेला आहे.

या विषयाचे पुर्ण आकलन अजुनही झालेले नाही. पण (अ) अनुवन्शिक, (ब) अपघात, मोठा मानसिक धक्का ?, (क) स्ट्रेस लेवल असे कारणे वाचले आहेत. साधारणतः १ % लोकान्ना हा त्रास आहे, तुम्ही त्या १ % पैकी आहात, त्यापैकी १ % लोक नैसर्गिक रितीने पुर्वव्रत होतातही.

भारतात वर्तमान पत्रात किव्वा परदेशात, इन्टरनेट जाळात अनेक अनेक जाहिराती आहेत. या सर्व जाहिराती फसव्या आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. पुन्हा मी काही वैद्यकीय डॉक्टर नाही पण अनेक अनुभवी डॉक्टरान्शी चर्चा केल्यावर माझे मत बनले आहे.

तुम्हाला परिस्थिती बरोबर सामना करण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी मनापासुन शुभेच्छा.

प्रतिक्रियां बद्दल सगळ्यांचे खूप आभार
डॉक्टर खडीवाले यांच्याकडे जाऊन आले,
आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू करण्याचा निर्णय घेतला आहे...

त्यासोबतच तुम्ही एकदा डॉ. माया तुळपुळेंना भेटलात तर तुम्हाला इतर खुप माहिती मिळेल असं वाटतंय. त्या स्वतः यातून गेल्या आहेत. त्यांचा या विषयाला वाहिलेला एक सपोर्ट ग्रुपदेखील आहे. त्यांनी याविषयावर नितळ नावाचा चित्रपटदेखील काढला होता. मायश्वेता डॉट कॉम येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.

मीच का!!!!!>>>>>असा विचार करु नका ,आपण जैविक यंत्र आहोत.यंत्रात बिघाड होणारच.मनाला लावून घेणे टाळा.विटीलीगो प्रोग्रेसिव्ह असतो.ॲलोपॅथिक उपचार घ्या.भोंदू आयुर्वेदाच्या व कस्ले बुवा बापू कापू जापूच्य नादाला लागणे टाळा.

भोंदू आयुर्वेदाच्या व कस्ले बुवा बापू कापू जापूच्य नादाला लागणे टाळा.>>>>>> सिंजी,वैद्य खडीवाले हे एक प्रथितयश वैद्य आहेत.

पॅथी कोणतीहि असली तरी जर डॅाक्टर हुशार असेल तर आजार बरा होतो,आटोक्यात येतो....घेत असलेल्या उपचारांबद्दल पाॅजिटिव्ह रहा......मनावर जास्त ताण येऊ नये असा प्रयत्न करा

TL;DR इथे भर्पूर प्रतिसाद आलेले आहेत, मी एकही वाचलेला नाही.

डॉ. माया तुळपुळे म्हणून एक माझ्या परिचित आहेत. त्यांना योगायोगाने स्वतःला संपूर्ण गोरी त्वचा मिळाली आहे! अन त्यामुळे त्यांना जे अनुभव आले, त्यावरून त्यांनी हे सगळे प्रकरण उभे केले आहे.

त्यांची ही वेबसाईट व चळवळ. याची माहिती घ्या, व या सपोर्ट ग्रूपमधे सामिल व्हा, असे सुचवितो.

वैद्य प.य. खडीवाले यांचे आज पुण्यात वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना!

ओह..
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.