डोहाळे

Submitted by राजेंद्र देवी on 6 August, 2017 - 23:03

डोहाळे

सोनसावळे उन कोवळे
मंद वारा झुलती वृक्षदळे

कृष्णमेघ विहरती, अंबर निळे
वारा घालती कल्पतरुंची झावळे

ताजे तवाने झाले चराचर
ऋतु हिरवा, सुरु झाले श्रावण सोहळे

सजली सृष्टी पानाफुलांनी
फुलपाखरांना लागले सुगंधाचे डोहाळे

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults