मायबोली २०१७ गणेशोत्सवासंबंधी घोषणा

Submitted by संयोजक on 6 August, 2017 - 22:19

IMG_5436.JPG

पयलं नमन हो करितो वंदन. पयलं नमन हो पयलं नमन. तुम्ही ऐका हो गुणिजन. आम्ही करितो कथन.

नमस्कार मायबोलीकर
हे मायबोलीचे एकविसावे वर्ष. या वर्षीच्या गणेशोत्सवात पाककृती स्पर्धा, लहान मुलांसाठी कार्यक्रम , झब्बू हे मायबोलीकरांचे आवडते कार्यक्रम तर आहेतच. सर्व माय॑बोलीकरांना आवडतील, लहान थोरांना भाग घेता येईल असे काही नवीन उपक्रमही यावर्षी असतील. या सर्व उपक्रमांबद्दलची माहिती संयोजक मंडऴ लवकरच इथे जाहीर करेल.

Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या 10 दिवसात नैवेद्याची ताटे रिकामी करून वाढवलेले वजन कमी करायला गेल्यावर्षी रिद्धी-सिद्धी ने IF करायला लावले, माहिती आहे ना तुला?
ते काही नाही.. यावेळी काय खायचे, काय नाही याची लिस्टच घेऊन जाणार आहे..." >>>> वाट पहातेय या लिस्टीची

कोण म्हणतं मायबोलीचं वय वाढलं आहे?!
मायबोली तर आता पुढच्या पिढीला पण आपलंसं करून घेणार आहे!
तर बाकीच्या कार्यक्रमांसोबतच घेऊन येत आहोत आपल्या छोट्या भावी मायबोलीकरांसाठी काही खास उपक्रम !
अधिक माहिती आणि घोषणा - लवकरच!!

teaser kids.pngmaboganesh utsav.jpg
नियमितपणे वाचताय ना हा बाफ? वाचत रहा!!

लिटील शेफ भारी कल्पना आहे. मी लहान असतो तर भाग घेतला असता. मस्त उकडलेले अंडे आणि लेमन गोळ्यांचे सरबत केले असते.

चित्रकला उपक्रम आपल्या माबो आईबाबांचे पोट्रेट काढायचा दिसतोय.

संयोजक, कल्पक कल्पना.
मोठ्यांसाठीच्या उपक्रमाची देखील वाट बघतोय . (पाककला स्पर्धा सोडून . because that is not my cup of tea Lol )

तनिष्का,
या स्पर्धा ऑनलाइन होतात,
कशा?? ते लवकरच तुम्हाला दिसेल Happy

स्पर्धा, नेवैद्य, झब्बू , वेगवेगळे उपक्रम आणि समारोप .. खूप भारलेले दिवस असतात हे माबोवरचे . मला तर घरच्या गणपती एवढी मजा येते इथे त्या दिवसात .
तुम्ही पण खूप आनंद घ्याल .

स्पर्धा, नेवैद्य, झब्बू , वेगवेगळे उपक्रम आणि समारोप .. खूप भारलेले दिवस असतात हे माबोवरचे . मला तर घरच्या गणपती एवढी मजा येते इथे त्या दिवसात . >> + ११११११११११११
सगल्या जाहिराती मस्त...वाट बघते आहे

****************************************************************************************************************
मायबोलीकरांनो, लागताय ना तयारीला?
खालील स्पर्धा आणि उपक्रम जाहीर झालेत !!
पाककृती स्पर्धा
भावी मायबोलीकरांसाठी उपक्रम -
रंगरंगोटी
मायबोली ज्युनियर मास्टरशेफ

****************************************************************************************************************

***************************************************************************************************************
मायबोलीकरांनो, लागताय ना तयारीला?
खालील स्पर्धा आणि उपक्रम जाहीर झालेत !!
पाककृती स्पर्धा
अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा
भावी मायबोलीकरांसाठी उपक्रम -
रंगरंगोटी
मायबोली ज्युनियर मास्टरशेफ

****************************************************************************************************************

आज गणेश चतुर्थी! 'मायबोली'चा वाढदिवस सुद्धा!
यानिमित्त सर्व माबो टीमचे मनःपूर्वक अभिनंदन,पुढील वाटचालीस अनेकानेक शुभेच्छा व आजवरच्या कामगिरीबद्दल खूप-खूप आभार!
आपल्या सहभागातून मायबोली समृद्ध करणाऱ्या, सर्व क्षेत्रांतील तज्ञ मंडळी,लेखक-कवी-कलाकार-रसिक-प्रतिसादक-वाचकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभकामना!
मोरया...!!

संयोजक/वेबमास्तर हा धागा आणि
https://www.maayboli.com/node/63566 अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती - स्पर्धा- मायबोली गणेशोत्सव २०१७
https://www.maayboli.com/node/63509 मायबोली गणेशोत्सव २०१७ - पाककृती स्पर्धा

मायबोली गणेशोत्सव २०१७ या ग्रुपात नाहीत का ते तपासाल का? मला दिसले नाहीत.
तसंच वरच्या गणेशोत्सव २०१७ च्या लँडिंग पेजवर ही या तिन्हीची लिंक हवी.

आता हे धागे शोधण्यासाठी मला संयोजकांच्या लेखनापर्यंत जावं लागलं.

जाई, लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. तो धागा चुकून सार्वजनिक करायचा राहिला होता. आता केला आहे.
येऊ देत आता झब्बू!!

आम्हाला सर्वांना हा गणेशोत्सव उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि त्यात सहभागी होण्याची संधी देऊन आनंद दिल्याबद्दल मायबोली प्रशासकांचे, संयोजक मंडळींचे आभार. धन्यवाद लोक्स! Happy

गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!

सर्व संयोजक मंडळाचे आभार व अभिनंदन!

Pages