सोनेरी गवत भाग ६

Submitted by निर्झरा on 4 August, 2017 - 03:19

https://www.maayboli.com/node/63245 भाग १
https://www.maayboli.com/node/63260 भाग २
https://www.maayboli.com/node/63275 भाग ३
https://www.maayboli.com/node/63290 भाग ४
https://www.maayboli.com/node/63311 भाग ५
आधीच्या भागात....
“जोसेफ आतातरी सांगशील का हे काय चाललय ते.”
‘हो काका सांगतो.”
( आत्ता पर्यन्त घडलेल सगळ जोसेफ काका-काकूंना सांगतो.)
“काय? म्हणजे अवनीच्या आणि मोहितच्या जीवाला धोका आहे?”
“होय काकू. तुम्ही घाबरू नका. आता रुपा आपल्या ताब्यात आहे. ती आता त्या शक्तीच काही ऐकणार नाही. मी आता मोहितशी बोलतो आणि त्याला पण ईकडे बोलावून घेतो.”

ईथून पुढे.....
(एव्हाना सकाळ झालेली असते. काकू-काका हताश बसलेले असतात. अवनी आणि जेनी तिथेच सोफ्यावर झोपलेल्या असतात. रुपा तिच्या खोलीत झोपलेली असते.)
“जोसेफ, माझा तर या गोष्टीवर कधीच विश्वास नसता बसला. बर मोहितशी तुझ बोलण झाल, काय म्हणाला तो?”
“काकू मी बोललो त्याच्याशी. तो आज रात्रीच निघतोय ईकडे परत यायला. त्याचा पण आधी विश्वास न्हवता यावर, काल जे काही घडल त्यामुळे तो खुप घाबरलाय.”
(अवनी आणि जेनीला जाग येते.)
“अरे, उठलात तुम्ही, चला फ्रेश व्हा मी चहा टाकते.”
“जोसेफ मला सांग आता पुढे काय कारायचय आपण?”
“काका….. त्या साठी आपल्याला बंगल्यात परत जाव लागेल. कारण त्या शक्तीला संपवायच असेल तर तिच मूळ नष्ट कराव लागेल. ईथे आपण फक्त तिला काही काळ थोपवू शकतो.”
“अरे पण तिथ जाण धोक्याच ठरेल…”
“हो काका पण आपल्याकडे दुसरा काहीच ऊपाय नाही. रुपा उठली की मी अजून काही माहीती तिच्याकडून मिळतेय का ते बघतो. उद्या मी त्या गावात पण जाऊन येतो.”
(काकू चहा घेऊन येतात. अवनी आणि जेनी पण फ्रेश होऊन येतात. तेवढ्यात रुपा जागी होते.)
‘जोसेफ, रुपाला जाग आली बघ’
“हंम्म, अवनी तिला हॉल मधे घेऊन ये. आणि हो तुम्ही कोणीच काही बोलू नका. मी माझ्या पद्धतीनी तिच्याशी बोलतो. पहिले तिला थोड फ्रेश होऊद्या.”
(थोड्या वेळातच अवनी रुपाला घेऊन हॉल मधे येते.)
“काय झाल, समदे अशे का बघताय माझ्याकड?”
'रुपा काल रात्रीच तुला काही आठवतय का?'
"नाही बा, काय झाल हुत काल?"
“रुपा मला सांग काल रात्री जे काही घडल त्यातल काहीच तुला आठवत नाहीये?”
“नाय, काय झाल काल?”
(जोसेफ तिला काय घडल ते सांगतो)
“आर देव…… म्हणजे बबन्या….. तो जागा झाला. आता आपण कोणीच जीत नाही राहणार. आपल्याला तो मारून टाकणार.”
“ हे बघ रुपा, तो आपल्याला काही करणार नाही. तु मला तुला जे काही माहिती आहे ते सांग. मी तुम्हा सगळ्यांना यातून बाहेर काढेल.”
“ नाही साहेब ते ईतक सोप्प नाय. त्यो लै शक्तीशाली झाला असन आता. त्याला कोणीबी काही करू शकत न्हाय. मी त्याला लै समजावलय, हे बंगल्यातले लोक लै चांगले हायत. ताईसाहेबसांना काही त्रास देऊ नग म्हणुन. पण त्यो काही ऐकत न्हाय माझ. त्याला पुन्हा जीत व्हायचय.”
“रुपा मला सांग, तो तर जिवंत नाही मग तू त्याच्याशी कस बोलतेस?”
“तो जीता हाय, बंगल्याच्या माग ते सोनेरी गवत हाय त्यात त्याच्या जीव हाय. त्यान मला काही मंत्र शिकवले होते. ते वापरुन मी बोलते त्याचाशी.”
“नेमक काय झाल होत त्याला; म्हणजे तो कशामुळे मेला?”
“त्यो मेला न्हाय, मारल त्याला”
“कोणी मारल त्याला आणि का?”
“त्या पाटलानी मारल त्याला. तुम्हाला सांगते ताईसाहेब, दोन वर्ष आम्ही लै सुखी होतो आमच्या संसारात. आम्ही सगळे त्या बंगल्यात रहायचो. मी आणि बबन्या त्या बंगल्याची देखभाल करायचो. पाटिल पन तिथच रहायचे. लग्नाला दोन वर्ष झाली अन दुखाचे दिस सुरू झाले. घरात काही पाळणा हलेना म्हणून बबन्या दुखी झाला. गावातले लोक नाई नाई ते बोलू लागले. त्यातच पाटलांनी त्यो बंगला सोडला आनि गावातल्या घरात रहायला गेले. आम्ही तिथच राहिलो बंगल्याची देखभल करायला. बबन्याला कोणीतरी काळ्या जादु बद्दल सांगितल. त्यातून आम्हाला मूल होईल अस सांगीतल आणि बबन्या त्यात अडकला. त्याला ती काळी जादू शिकायचा नादच लागला. बंगल्याच्या मागच्या जंगलात एक बाबा रहायचा. त्याच्याकड जायचा बबन्या शिकायला. काय काय न्हाई केल त्यानी त्या पाई. मी लै समजावल त्याला पण माझ काही ऐकल नाही त्यानी. पोर होईल या साठी त्यानी लै लोकांचा जीव घेतला.
“त्यानी बंगल्यातच त्याच काम सुरू केल. त्यो बाबा अन बबन्या मिळून काही तरी पुजा करायचे. अंगाला कसली तरी राख लावायचा, गळ्यात हे मोठ्या मोठ्या कवट्यांची माळ घालायचा. जंगालतले प्राणी मारून आणायचा. कधी कधी तर तान्ह पोर बी आनायचे. माझा लै जीव तुटायचा त्या येळी. ज्या कोणाच पोर असेल तीच काय व्हत असेल ते सापडत न्हाई म्हणल्यावर. हळु हळू तो लै शक्ती शाली झाला. आता त्याला आम्हाला पोर होत नाही याचा काही बी फरक पडत न्हवता. त्याला फक्त लोकांचा जीव घ्यायला आवडायचा. एक दिस ही गोष्ट पाटलाला कळाली. त्यांनी बी समजावल त्याला. पण त्यो थांबायच नाव घेत न्हवता. गावातले लोक बी त्याला घाबरू लागले होते. खुप येळा समजावून पण ऐकत नाही म्हणल्यावर पाटलानी त्याला मारून टाकल.
त्या दिवशी…….. त्या दिवशी अमावस होती. बबन्या लै मोठी पुजा करणार हुता. ही गोष्ट पाटलाला गावातल्या कुनीतरी सांगीतली. पाटिल घरी आले. त्यांच्या हातात बंदूक होती. रागातच होत पाटिल. त्यांनी बबन्याला धमकी दिली, हे सगळ आत्ताच्या आत्ता थांबव म्हणुन. बबन्या त्या वेळी त्याच्या पुजेत घुसला हुता. त्यो बाबा पण होता तिथ. मी घाबरून एका कोपर्याला उभी राहून समद बघत होते. पाटलानी आवाज देऊन पण त्यांची पुजा चालूच होती. समोर मानसाच्या कवट्या, हाडं, रगत काय काय मांडल होत. बबन्या ध्यान लावून बसला होता. त्यो बाबा काहीतरी मंत्र बोलत होता आणि त्या पुजेत जंगलातून पकडून आनलेले प्राण्यांची डोकी कापून टाकत होता. सगळ्या घरात रगताचा सडा पडला होता. हे सगळ बघून पाटिल जास्तच चिडले आणि पुजा थांबवायला पुढे झाले; त्या बाबानी पाटलाला अडवल. तिथन निघून जायला सांगीतल. ही त्यांची शेवटची पुजा हाय म्हनाला. मग बबन्या आणि तो कधीच मरणार नाई म्हणाला. पाटिल चिडल आनी त्यांनी त्या बाबाला गोळी घातली. बाबा जागीच ठार झाला.
गोळीच्या आवाजान बबन्याच ध्यान तुटल. त्यो पाटलावर चिडला. त्याची पुजा अर्धवट राहीली. पाटलानी त्याच्याकड बंदूक फिरवली. पण त्यो जोर जोरात हसू लागला. पाटिल चिडल आनि त्यांनी बबन्याला गोळी घातली. पाटलाचा नेम चुकला आणि गोळी बबन्याच्या हाताला लागली. त्यो घाबरून बंगल्याच्या मागच्या बाजूने जंगलाकड जायला पळाला , पाटिल बी त्याच्या माग गेले. पाटलानी पुन्हा गोळी मारली. ती गोळी बबन्याच्या छातीत घुसली. बबन्या तिथच खाली कोसळला. मरताना त्याने काहितरी मंत्र म्हणले आणि म्हणाला की त्याच शरीर मेल पण तो जीता राहणार. त्यो कोणाला सोडणार नाही. एवढ बोलून त्यो बंगल्याच्या मागच्या वाळलेल्या गवतावर कोसळला.”
“मग, मग काय झाल पुढे.”
“……., काही झाल तरी त्यो माझा नवरा होता. त्यान मला एक मंत्र शिकवला होता. अन् सांगीतल होत की जर का कोणी त्याला मारल तर त्या वेळी त्याला जिथ जाळल असल किंवा पुरल असल तिथ बसून मी त्यो मंत्र म्हणायचा. पाटलानी त्याला तिथच पुरल होत. पण लगेचच पाटिल मला गावात घेऊन गेले. जे झाल ते कुणाला काही सांगायच नाही म्हणुन बजावल. त्यांच्या घरी एका खोलीत मला बंद करून ठेवल. गावात सगळ्यांना सांगीतल की जंगलातून कोणी जनावर आल अन त्याला मारून टाकल. ते बघून माझ्या डोक्यावर परिणाम झाला. खर तर मला काहीच झाल न्हवत. मला तर माझ्या नवरयाला जीत करायच होत. पण मला त्या बंगल्यात जाता येत न्हवत. या सगळ्यात बरेच दिस गेल. माझी खाण्याची ईच्छा गेली. मी उपाशी राहू लागले. आजारी पडू लागले. पाटलानी मला औषधपानी सुरू केल, पन माझी तब्येत काही सुधारत न्हवती. हळू हळू पाटलानी माझ्या कडे लक्ष देन कमी केल. जणू माझी मरायचीच वाट बघत होते. पन म्या मरनार न्हवते. बबन्याला जीत करायला मला जीत रहायच होत. मी बंगल्यात कधी जायला मिळल या दिसाची वाट बघू लागले.”
“पण मग गावात खर कुणाला कळाल नाही कधी.”
“मी लोकांना सांगायचा प्रयन्त केला. पण लोक मला वेडी म्हणु लागली. तसही माझा नवरा मेला हे ऐकून लोक् खुष झाली होती. त्याला कोणी मारला ह्याच त्यानला काय बी न्हवत.”
‘रुपा, आम्ही जेव्हा बंगल्यत रहायला आलो तेव्हा तर आम्हाला काहीच त्रास झाला नाही तुझ्या नवरयाचा अस का?, त्या काही महिन्यात त्यानी त्रास का दिला नाही?’
“कारन त्यो तेव्हा झोपलेला व्हता. पाटलानी त्याला मारल्यावर मला त्याला जीता कारायला येळ मिळाला न्हवता. तुम्ही जवा पाटलाला विचारल होत बंगल्याच्या कामा बाबत. मी तर लै खुष झाले. कारण ब-याच येळा मी पाटलाला म्हणायचे मला परत बंगल्यात सोडा. मी बंगल्याची देखभाल करेन पन पाटिल म्हणायचे तू एकटी तिथ कशी राहणार. तुम्ही विचारल्यावर लगेच पाटलानी माझ नाव घेतल. तसही त्यांना माझ ओझ होतच होत.”
‘म्हणजे त्या दिवशी जे आवाज बंगल्यात येत होते….’
“ होय, मी बंगल्यात आल्यावर बबन्याला पुरल होत त्या जागी गेले. लै रडले तिथ जमीनीवर डोक ठेवून. त्या रात्री बबन्या माझ्या सपनात आला अन म्हणाला की त्यो वाट बघतोय जीता व्हायची. त्याला लवकर जीत व्हायचय. मग मी रात्री बंगल्याच्या माग गेले. त्यानी सांगीतल तस मंत्र म्हणले. थोड्यावेळातच त्या वाळलेल्या गवताच्या जागी जमीनीवर एक भेग पडली. त्यातून एक काळाकुट्ट गोळा बाहेर आला. मी ते बघून घाबरले आणि घरात येऊन झोपले. तुम्हाला हे सगळ कस सांगाव ते मला कळत न्हवत. तुम्ही विश्वास ठेवला नसता माझ्यावर.”
‘पण मग त्या गोळ्याच काय झाल पुढे?’
“दुस-या दिवशी परत बबन्या माझ्या स्वप्नात आला. त्यो गोळा दुसर कोणी नसुन माझा बबन्याच हाय अस मला म्हनाला. त्यो माझ्या पुजे मुळे जागा झालाय पन त्याच्या कडे त्याची शक्ती नाहीये. त्याला त्याची शक्ती परत हवीये. त्यानी मला परत पुजा करायला सांगीतली. तस मी त्यो सांगल तशी रोज रात्री पुजा केली. अन जे काही झाल ते बघून मी घाबरले. त्या जमीनीतुन बाहेर आलेल एक काळाकुट्ट् गोळा माझ्या समोर होता. त्याला न कसला आकार हुता की काही रुप. त्यो माझ्याशी बोलू शकत हुता. त्यानी मला सांगीतल की त्याला शक्ती परत मिळवण्यासाठी ताईसाहेबांना अन साहेबांना माराव लागणार हाये. मी त्याला सांगीतल की अस करू नग. पन या येळला पन त्यान माझ ऐकल नाई. त्यो त्यांना तरास द्यायला लागला. अन बाकी समद तुमच्या समोरच घड्तय.”

“जोसेफ या सगळ्यावर काय उपाय आहे.”
“काका मी तुम्हाला सांगीतल तस आपल्याला त्या बंगल्यात जाव लागेल. त्या आधी त्या शक्तीला संपवण्याचा काही मार्ग आहे का ते बघाव लागेल.”
‘ते आपल्याला कस कळणार?’
“अवनी ही रुपा आपल्याला त्या कामात मदत करेल.”
“जी ताईसाहेब मी करीन मदत तुम्हाला. गेल्या काही दिसांत माझ्याहातन लै चुका झाल्यात. तुम्हाला लै तरास झालाय त्या पाई. मीच त्याची मदत केली. पन आता न्हाई करणार’
“हे बघ रुपा, ती शक्ती परत तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करेल. त्या वेळी तुला त्याच्या मृत्युकसा होईल हे विचाराव लागेल्. कदाचीत तो सांगणार नाही पन तुला ते कराव लागेल. एकदा का आपल्याला ते कळाल की मग आपण पुढ्च्या कामाला सुरूवात करू शकतो.”
“जोसेफ या सगळ्यात अवनी आनि मोहितच्या जीवाला धोका…….”
“धोका तर आहेच जेनी. आपण काहीच केल नाही तर ती शक्ती त्यांच्या जीव घेईल. म्हणूनच आपण पूर्व तयारीनीच बंगल्यात जायच.”
---------------------------------------------------------------------------------------------------------
(संध्याकाळ होते. मोहित परत आलेला असतो. जोसेफ त्याला सर्व परिस्थिती समजावून सांगतो. तेव्हा कुठे तो हे सगळ करायला तयार होतो. दोन दिवसांन्ंतर बंगल्यावर जायच ठरत. जोसेफने सांगितल्या प्रमाणे रात्री ती शक्ती रुपाशी बोलायचा प्रयत्न करते. नेहमी प्रमाणे ती बंगल्याच्या गेट जवळ जाते. ते सोनेरी गवत रोडच्या बाजूला असते. त्या वळी जोसेफ सर्वांना एका म्ंतरलेल्या खोलीत बंद करतो आणी तो स्वता रुपा जवळ थोड अंतर ठेवून थांबतो. ती शक्ती बोलेले तस रुपा करू लगते. पण तिच्या हातातील धाग्यामुळे त्यात अडथळे निर्माण होतात. हे बघून ती शक्ती चिडते. ते सोनेरी गवत आक्राळ विक्राळ रुप धारण करते. रुपा हिंमतीनी त्याच्या प्रश्नांची उत्तर देते. त्याला बोलण्यात गुंतवून रुपा त्याच्या कडून त्याच्या मुक्ती बद्दल विचारते.)
“हे बघ बबन्या हे लोक लै विचित्र हायेत. तुला ते मारून टाकतील. मला तुला मरू द्यायच न्हाय. या लोकांनी मला त्यांच्या शक्तीनी बांधून ठेवलय. आता तूच सांग म्या कस वाचवू तुला, तुझी मदत कशी करू.”
“मला कोणी मारू शकत न्हाई. मला मारण ईतक सोप न्हाई. तु काळजी करू नगस. तुला पण ह्यांच्या पासन मी मुक्ती मिळवून देईल. त्या साठी तुला बंगल्यात याव लागल. माझ्यावर ईथ काही बंधन हायेत.”
“आर पन तुला काही केल तर मी कस वाचवू तुला. ते अस सोडणार न्हाईत तुला.”
“तु बंगल्यावर आली की सांगेन तुला”
(एवढ बोलून ते गवत तिथन अदृष्य होत. रुपा आणि जोसेफ परत खोलीत येतात.)
“काय झाल जोसेफ. कळाल काही त्याला मारयच कस ते.”
“नाही काकू. आपल्याला बंगल्यावर जावच लागेल. मगच आपल्याला सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल. मी बंगल्यात जायची सगळी तयारी करतो. उद्याच आपण निघूयात. ती शक्ती आत्ता खुप चिडलेली आहे. ती आता शांत बसणार नाही.”
(सर्व योग्य ती तयारी करून सर्व जण बंगल्याकडे निघतात. मोहीत गाडी चालवत असतो. मुख्य हायवे सोडून गाडी गावाच्या रस्त्याला लागते. थोड पुढ गेल्यावर गाडीच चाक पंक्चर झाल्याच लक्षात येत. स्टेपनी लावून ते पुढचा प्रवास सूरू करतात. अचानक त्यांच्या गाडीखाली मोठा दगड येतो आणि मोहितचा गाडीवरचा कंट्रोल सुटतो. गाडी एका झाडाला जाऊन आदळते. स्पीड कमी असल्यामुळे कोणला काही दुखापत होत नाही. काय प्रकार चालू आहे ते जोसेफच्या लक्षात येते. तो मोहितला मागे बसायला सांगतो आणि स्वता गाडी चालवतो. ते आता पाटलांच्या घराजवळ येतात. झाला सगळा प्रकार पाटलांना सांगतात. पाटिल त्यांची मदत करायला तयार होतात.)
“मला वाटलच हुत. त्यो असा शांत राहनार न्हाई म्हणून. मरताना त्यान तस सांगीतल हुत. पण तुमी काय बी काळजी करू नगा. मी हाय तुमच्या मदतीला. आज रातच्याला समदे ईथच थांबा. उद्या सकाळी बंगल्यात जाऊ.”
( खर तर रात्रभर कोणाचाच डोळ्याला डोळा लागला नाई. बंगल्यात गेल्यावर काय होईल याचाच सगळे विचार करत असतात. बाहेर तांबड फुटायला लागत. सर्व जण आवरून तयार होतात. पाटिल बाजूच्या गावातल्या एका मांत्रिकाला बोलावण पाठवतात. सगळे बंगल्याकडे जायला निघतात. गाडी ब्ंगल्याच्या मुख्य दाराशी येऊन थांबते. त्याच क्षणी झाडावरची उलटी लटकलेली वटवाघूळ विचित्र आवाज करत उडून जातात. अचानक एक मांजर अवनीच्या पायाजवळ येते. तिच्याकडे बघून ते गुरगुरायला लागते. मोहीत त्याला हाकलवून लावते. जोसेफ सगळ्यांना दारातच थांबायला सांगून तो बंगल्याच्या अंगणात जातो. काहीतरी मंत्र् म्हणून मंतरलेले पाणी तो सर्वत्र उडवतो. सगळे जण बंगल्यात जातात. एक विचित्र वास सगळीकडे पसरलेला असतो. जणू जवळच एखाद अर्धवट जळालेल शरीर असल्यासारखा. जोसेफ हॉलमधे एक मोठ रिंगण तयार करतो. सर्वांना तो त्या रिंगणात यायला सांगतो. रिंगणाच्या चहूबाजूने तो मेणबत्या लावतो. काहीही झाल तरी कोणीच त्या रिंगणाच्या बाहेर यायच नाही म्हणून बजावतो. ईकडे रुपाला बबन्या तिला त्याला पुरल त्या जागी बोलवत असल्याच जाणवत. तिला कोणीतरी ओढून नेतय अस वाटत. जोसेफ तिला एक होली वॉटरनी भरलेली बाटली तिच्याकडे देतो. त्याच क्षणी तिला जाणवणारी ओढ बंद होते. कोणी काय करायच ते जोसेफ सगळ्यांना सांगू लागतो. यात जास्त महत्वाचा वाटा अवनी, मोहित आणि रुपाचा असतो. हव्या त्या सुचना देऊन जोसेफ बंगल्याच्या मागे त्या सोनेरी गवता जवळ जातो.
हॉल मधे सर्व जण एकमेकांचे हात हातात घट्ट धरून रिंगणात उभे असतात. काही वेळातच ढग गडगडू लागतात. सगळी कडे भयाण असा अंधार पसरतो. हॉल मधील मेणबत्या त्यांचा मिणमिण उजेड पसरवत असतात. बाहेर सोसाट्याच्या वारा सुरू होतो. घराच्या खिडक्या एक मेकांवर आपटू लागतात. वार्यामुळे बाहेरची वाळलेली पान आणि धूळ हॉल मधे ईतरत्र पसरते. त्यामुळे अवनी आणि जेनीला ठसका लागतो. ते पाहून मोहित पाणी आणायला जायला निघतो. अवनी त्याला थांबवते तो पर्यन्त मोहीतचा एक पाय रिंगणच्या बाहेर आलेला असतो. अचानक मोहितला कोणीतरी त्याला ओढत असल्याच जाणवतो. तो त्या रिंगणात अर्धा बाहेर आणि अर्धा आत अश्या अवस्थेत खाली पडतो. पाटिल आणि जेनी मिळून त्याला रिंगणात ओढायचा प्रयत्न करतात, पण काही फायदा होत नाही. त्यांची शक्ती कमी पडते आणि तो पुर्ण रिंगणाच्या बाहेर ओढला जातो. अवनी त्याला पकडायला त्याच्या मागे जाणार तोच जेनी आणि रुपा तिला घट्ट धरून ठेवतात. पाटिल तिला समजावत असतात. तोच मोहित बंगल्याच्या दरवाजाकडे खेचलाजातो. आता तो दरवाजाच्या बाहेर जाणार तोच दारात मांत्रिक येतो आणि काही मंत्र म्हणून भस्म मोहितच्या अंगावर टाकतो. त्या क्षणी कसलातरी काळा धूर त्याच्या शरीराजवळून जाताना सगळ्यांना दिसतो. हे सर्व बघून भीतीने सर्व स्तब्ध होऊन जातात. मांत्रिक मोहितला परत रिंगणात घेऊन येतो. पाटिल काही बोलणार तेवढ्या तो त्यांना थाबवतो.)
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसर्‍यांच्या जीवावर उठणार्या बबन्याचा रुपाला एवढा पुळका का ते समजलं नाही. कसाही असला तरी नवरा आहे हे काही पटले नाही.
बाकी ईंटरेस्टींग आहे.