तांदूळादूधाची खीर (कोकणी पद्धत)

Submitted by देवीका on 30 July, 2017 - 02:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

श्रावण सुरु असल्याने काही पारंपारीक असे पदार्थ लिहित आहे. आता कोकणी गोड पदार्थ म्हटले की ह्या पदार्थांचा कणा तांदूळ, खोबरं आणि गूळ असे असणारच त्यामुळे वाटेल की त्या मध्ये काय वेगळं असणार पण करण्याची पद्धत वेगळी असली की चव वेगळीच असतए.
उदाहरण म्हणजे, उकडीचे मोदक आणि पातोळी जिन्नस अगदी तेच पण पातोळी उकडवताना एका हळदीच्या पानाने चम्तकार केला असतो. असो, वेळ ज्यास्त बघून घाबरू नका.

प्रमाण दहा माणसांसाठी आहे.

तीनच चमचे( चहा पूडीचा चमचा) हातसडीचा आंबेमोहोर किंवा कुठलाही सुवासिक तांदूळ,
दोन मध्यम नारळाचा चव, त्याचा दोन वाट्या घट्ट दूध आधी काढावे मग पातळ दूध
वाटीभर गूळ( चवीप्रमाणे गूळ घ्या; काहींना गोड आवडतं , काहींना अगोड),
ताजे काजू किंवा सुकवलेले सालीचे काजू आवडी नुसार गरम पाण्यात भिजवून,
वेलची, केशर पूड, बेदाणे
साजूक तूप लागेल तसे
एखादेच हळदीचे पान धूवून गाठ मारून,

क्रमवार पाककृती: 

१) तांदूळ धुवून सावलीत थोडा वेळ वाळवून मग कुटून घ्यावा. झीरो नंबरचा बारीक रवा असतो ना तशी कणी काढावी.
२) जाड बुडाचा टोपात, दोन चमचा साजूक तूप घेवून जरासे तापले की, केशराच्या काड्या टाकाव्य मग काजू आणि बेदाणे परतावे, तीन चार मिनिटात काढावे व बाजूल ताटलीत काढून घ्यावे. लपवून ठेवले की बरे नाहितर खीरीला उरत नाही. Happy
३) आता कणी टाकून मंद आचेवर परतायला घ्यावी, गुलाबी रंग येइपर्यंत परतून घ्या.
४) पातळ दूध अलगद ओतून पटकन सतत ढवळत गुठळी न होउ देता दहा मिनिटे परता. नारळाचे पातळ दूध हे इतके असावे की कणीच्या चार पट असावे. आच मंद करून कणी शिजु ध्यावी.
५) गूळ जरासे पाणी टाकून वितळवून गाळोन घ्यावा.
६) मधून मधून , कणी चिकटू नये आणि गुठळी होउ नये म्हणून घोटावी.
७)कणी शिजली की, गूळ घोटावा त्यातच. गूळ एकजीव झाला की घट्ट दूध घालावे, पाचेक मिनीटात आच बंद करावे. वेलची पूड, काजू, बेदाणे आणि गाठ मारलेले हळदीचे पान वरच राहिल असे ठीवून झाकण ठेवावे. त्या वाफेवर हळदीचा पानाचा हलका सुगंध खीरीत शोषला जातो. पानाची गाठ वरच राहिल बघावे. ढवळत राहु नये.
वाढताना, पान देवु नये.
थंदगार खीर अप्रतिम लागते.
ह्याचे वेरीअशन म्हणजे, २:१ प्रमाणात तांदूळ आणि मूगाची डाळ घ्यावी. डाळ तशीच धुवून वाळवून कणी करावी व आधे तूपात परतावी मग तांदूळाची कणी घालावी.

अधिक टिपा: 

आधुनिक पद्धतीने मिक्सर वापराव कणी काढायल, अगदी जात्यावर बसायची गरज नाही. Happy

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला पाकृ वाचून कळत नाही.. फोटो येऊ द्या.. आमच्याकडे अशी बनते का चेक करता येईल
मला लहानपणी तांदळाची खीर आवडायची नाही.. हल्ली हल्ली आवडू लागलीय .. श्राद्ध, वर्षश्राद्ध, वगैरेला आमच्यात ही बरेचदा असते..

>>>श्राद्ध, वर्षश्राद्ध, वगैरेला आमच्यात ही बरेचदा असते..<<<

ओ , श्राद्धाला वगैरे बनवतात ती पांढरी असते मी जे काही एकले/ पाहिले त्यानुसार.. केशर वगैरे टाकत नाही.

वरची खीर मध्ये नारळाचं दूध आणि कणी वगैरे म्हणजे छान फिरनी टाईप असेल.. हो न देवीका?

सोपी वाटते आहे रेसिपी. सिर्सी / कुमठा / उडपी वगैरे भागात तांदूळ भिजवून , वाटून मडगणें नावाचा प्रकार करतात त्याची आठ्वण झाली. भिजवलेली चण्याची डाळ, दुधी भोपळ्याचे तुकडे आणि ओल्या नारळाचे तुकडे घालतात त्याच्यात.