सोनेरी गवत भाग ४

Submitted by निर्झरा on 29 July, 2017 - 03:46

https://www.maayboli.com/node/63245 भाग १
https://www.maayboli.com/node/63260 भाग २
https://www.maayboli.com/node/63275 भाग ३
आधीच्या भागात....
( रात्रीचे दोन वाजतात. अवनीला बाहेरून काही आवाज ऐकू येतात. ती जागी होते. ते आवाज तिला ओळखीचे वाटतात. ती रूमच्या गॅलरीत येते आणि ईकडे तिकडे बघते. पण तिला कोणीच दिसत नाही. ती रुम मधे जायला वळते तेवढ्यात तिला रूपा मेन गेट मधून आत येताना दिसते. अवनीची नजर रस्त्यावर कोणी दिसते का ते शोधू लागते. तेवढ्यात….. तेवढ्यात तिला रस्ताच्या कडेला ते ‘सोनेरी गवत’ दिसते. एक क्षण तिला काहीच कळत नाही की काय घडतय. तिला पुन्हा हवेत गारवा जाणवू लागतो. बाहेर शीतल चांदण असुन सुद्धा सगळीकडे काळाकुट्ट अंधार झाल्या सारख वाटत. तिला वाटत की तिला काही तरी आजार झालाय ज्या मुळे तिला काही विचित्र गोष्टींचे भास व्हायला लागलेत. ती गॅलरीच दार बंद करते आणि झोपते. खर तर तिच्या डोळ्यांसमोर सारख बाहेरच चित्र ऊभ रहात असत. शेवटी डोक्यावर पांघरूण ओढून ती कशीबशी झोपायचा प्रयत्न करते.)
ईथून पुढे.....

“अवनी किती झोपलीस बाळ, आमचा नाष्टा केव्हाच झाला. बाबा तुझी वाट बघून निघुन गेले त्यांच्या कामाला. चल मी नाष्टा वाढते. आणि हो ; तुझी ती मैत्रीण जेनी येऊन गेली तुला भेटायला. तु कळवल होतस का तिला तु ईथे येणार आहेस ते.”
‘हो अग मी कळवल होत जेनीला. दरवेळी मी ईथे आले की तिला भेटायच राहून जायच. मला उठवायचना मग. रूपा कूठे आहे?’
“ती बाहेर बागेत आहे. झाडांची कापणी करतेय. मी म्हणल तिला राहूदे म्हणुन, पण म्हणे मला काम नसेल तर करमणार नाही काहीतरी करूद्या मला. बर जेनीचा निरोप आहे तुला, तुझ सगळ आवरल की तिच्या घरी बोलवलय तुला”

(दाराची बेल वाजते जेनी दरवाजा उघडते. )
‘हाय जेनी कशी आहेस, कित्ती दिवसांनी भेटतीयेस’
“हाय अवनी, किती बदलली आहेस ग. मी मजेत आहे. तू कशी आहेस?”
‘मी मजेत. ए आज खुप गप्पा मारायच्या आहेत तुझ्या बरोबर.’
“बोल ना, मला पण तुला खुप काही सांगायचय, एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी”
‘सांग ना लवकर काय आहे सरप्राईज’
“हो हो किती ती घाई. ऐक माझ लग्न ठरलय. तु कॉफी घेणार की अजून काही”
‘व्वॉव! काय सांगतेस, कोण आहे तो लकी चार्म? मला मस्त पैकी कॉफीच कर. खुप दिवस झालेत तुझ्या हातची कॉफी प्यायले नाही.’
“जोसेफ नाव आहे त्याच. माझ्याच ऑफिस मधे आहे. तिथेच ओळख झाली आमची. दोन वर्ष झाली आम्ही एक मेकांना डेट करतोय. आता लवकरच लग्न करतोय”
‘जेनी दोन वर्ष तू डेट करतेय आणि मला हे सगळ आत्ता सांगतेयस.’
“हो, आमच तस ठरल होत की लग्न ठरेपर्यन्त हे कोणाला सांगायच नाही.”
ए कधी भेटवतेस त्याला?
“आज संध्याकाळी येणारे तो. तेव्हा तुझी पण ओळख करून देते.”
‘ए बोलायच्या नादात दुपार कधी झाली ते कळच नाही. चल मी संध्याकाळी येते परत. आई वाट बघत असेल जेवाणासाठी. आणि हो कॉफी मस्त झाली होती.’
“काय ग किती वेळ त्या गप्पा मारायच्या. मी केव्हाची थांबलीये, बाबा पण आज घरी आलेत तुझ्या सोबत जेवायच म्हणुन.”
‘सॉरी आई, खुप दिवसांनी भेटलो ना. गप्पाच संपत न्हवत्या. बर मी संध्याकाळी परत जाणारे जेनी कडे.’
“तु माझ्याशी बोलायला कधी वेळ देणार आहेस. हे आठ दिवस असेच निघून जातील. चल जेवायला बस आता. मी बाबांना हाक मारते.”
“काय अवनी कशी आहेस. आल्यापासुन आत्ता वेळ मिळालाय तुझ्याशी बोलायला. कसा आहे नवीन बंगला?”
‘बंगला एकदम मस्त आहे बाबा. भरपूर झाडी आहेत. आजूबाजूला शांतता आहे मोहितला आवडते तशी. आई बाबा तुम्ही याना त्या बंगल्यात रहायला काही दिवस. तुम्हाला पण आवडेल.’
“हो येऊ की. पुढ्च्या महिन्यात माझी रिटायर्डमेंट आहे. मग काय आम्ही मोकळेच आहोत फिरायला. काय ग जायचना आपण अवनीच्या घरी?”
“हो जाऊ की, मला पण जरा या शहराच्या वातावरणातून बाहेर पडायचय.”

( दाराची बेल वाजते , जेनी दार ऊघडते.)
“ये अवनी तुझीच वाट बघत होते. जोसेफ कधीच आलाय. तो पण तुला भेटायला उत्सुक आहे. मी दोघांची ओळख करून देते. जोसेफ ही माझी खास मैत्रीण ‘अवनी’ आणि अवनी हा माझा फियान्से ‘जोसेफ’. तुम्ही दोघ बोला मी कॉफी घेऊन येते.”
“हाय अवनी, खुप ऐकलय तुझ्याबद्दल मी जेनी कडून.”
‘ओ हाय, पण तुझ्या बद्दल मात्र जेनी मला काही बोलली नाही. ते जाऊदे, तू सांग अजून काय काय करतोस तू’
( तेवढ्यात जेनी कॉफीचा ट्रे घेऊन बाहेर येते )
“ अग खुप काही करतो तो. ऑफिस सांभाळून त्याच्या आगळा-वेगळा छ्ंद जोपासतो तो.”
‘कसला छ्ंद?’
“अग त्याला भूतं शोधायला आवडतात. घोस्ट हंटर आहे तो.”
‘क्काय? हा कसला छ्ंद. आत्ता पर्यंत किती भूतं सापडली?’
‘पाच, पाच भूतं सापडवलीत मी आत्तापर्यत्न.”
‘खरच आगळा-वेगळा छंद आहे हा तुझा. तुला भिती नाही वाटत हे करताना. मला आवडेल कधीतरी तुझा हा छंद जाणून घ्यायला.’
“त्या साठी रात्री-अपरात्री माझ्यासोबत याव लागेल तुला आणि आम्हीच घाबरलो तर भुतांपासून तुमच रक्षण कोण करणार.”
‘ येईन की त्यात काय, जेनी तु भेटलीस की नाही अजुन ह्याच्या भुतांना?’
“नो, मी त्याच्य या छंदापासून चार हात लांबच राहते.”
“अवनी…., तुला काही विचारायचय मला. खर तर ही आपली पहिलीच भेट आहे. पण मला राहवत नाहीये म्हणून…”
‘विचार काय विचारायचय ते’
“अवनी मघापासून मी तुझ्याशी बोलताना मला जाणवतय की तु कसल्यातरी टेंशन मधे आहेस. सतत कसलातरी विचार तुझ्या मनात चालूये. नाही म्हणजे तुझ काही पर्सनल असेल तर राहूदे, पण मी काही मदत तुला करू शकलो तर मला त्याच्या आनंद होईल. आत्तापर्यन्तच्या माझ्या अनुभवावरून अस वाटतय की तुझ्या अवती भवती कसली तरी वाईट शक्ती आहे. मला तुला घाबरवायच नाहीये”
‘व्वा! तुझ्या छंदावर तू बराच अभ्यास केलेला दिसतोय. पण तु जे काही म्हणाला ते अगदी खर आहे. मी जेनीशी हे सगळ बोलणारच होते. तुझीही आता ओळख झाली आहे त्यातून तू घोस्ट हंटर आहेस त्यामुळे तुला हे सांगायला काहीच हरकत नाही. गेले काही दिवस मला काही भास होतायत. मला वाटल होत ते फक्त त्या बंगल्यापुरतेच असतील, पण काल मी ईथे आईकडे आले असताना पण अगदी तसाच भास मला झाला. मला काही विचित्र गोष्टी दिसतात माझ्या डोळ्यासमोर घडताना.’
“म्हणजे नेमक काय दिसत तुला. जरा सविस्तर सांगशील’
‘कस सांगाव कळत नाहिये. तुम्ही विश्वास ठेवाल की नाही…’
“हे बघ अवनी, तु जे सांगशील त्यावर नक्कीच मी विश्वास ठेवेन. तू मला जे काही घडलय; तू जे काही बघितलय ते तसच्या तस सांगायचा प्रयत्न कर.”
‘जोसेफ, मला रात्री काही आवाज ऐकायला येतात, मी ऊठून बघते तेव्हा कोणीच नसत आजुबाजूला. आणि रूपा, रूपा बरोब्बर त्याच दरम्यान घरात कुठेच नसते आणि अचानक काही वेळानी ती समोर येते. नुसत एवढच नाही, तर बंगल्याच्या माग रूपाला मी कसलीतरी पुजा करताना बघितल. त्या वेळी ते ‘सोनेरी गवत’…हो मला चांगल आठवतय ते गवत जमीनीतुन वर-वर येत होत आणि त्यातून अचानक….. मी नेमकी त्यावेळी बेशुद्ध पडले. मला जेव्हा जाग आली मी माझ्या जागेवर झोपले होते. काल पण मला असेच आवाज आले. मी उठून गॅलरीत गेले. तेव्हा पण रुपा मेन गेट जवळ मला दिसली. आणि ते ‘सोनेरी गवत’ जे आमच्या बंगल्यात आहे ते मला ईथे दिसल. रोडच्या कडेला. मला काहीच कळेना ते गवत बंगल्यातुन ईथे आल कस. एवढ्च नाही तर कोणीतरी माझा गळा दाबतय अस वाटत.’
“ हम्म्म, तु सांगतेयस त्यावरून तरी मला अस वाटतय की तुमच्या बंगल्यात कुठल्यातरी वाईट शक्तीचा वास आहे. तुझी हरकत नसेल तर मला त्या बंगल्याची पहाणी करायचीये.’
‘माझी काहीच हरकत नाहीये याला. पण हे सगळ आईला आणि मोहितला कळता कामा नये. त्यांना हे नाही आवडणार.’
“अवनी आपण उद्याच तुमच्या बंगल्यात जाऊया.”
“जोसेफ म्हणतो ते बरोबर आहे अवनी. आपण अस करूयात, उद्याला पिकनीकचा प्लान केला म्हणुन काकूंना सांगूयात. सकाळीच बाहेर पडून रात्री परत येउ काय’
‘ठिक आहे जेनी. आपण असच करू.’
“आणि हो अवनी तुझ्या त्या रूपाला यातल काही कळू देऊ नकोस’
‘ठिक आहे. भेटूयात उद्या सकाळी’

(अवनी, जोसेफ आणि जेनी बंगल्यात पोहोचतात. तेवढ्यात समोरून पाटील येतात. अवनीला तिथे बघून ते दचकतात.)
“अव वहिनीसाहेब तुम्हालच भेटायला आलो होतो. दाराला कुलूप बघितल अन माघारी निघालो. तेवढ्यात तुमी समोर आला.”
‘बोला पाटिलसाहेब काय काम होत?’
“ते रुपा कुठ दिसत नाही?”
‘ती नाही आली आमच्या बरोबर. आणि मी पण माझ्या माहेरी गेले आहे काही दिवस. हे माझे मित्र आहेत. तुमचा बंगला त्यांना बघायचा होता म्हणुन मी त्यांना ईथे घेऊन आले. आम्ही लगेच परत निघणार आहोत. रुपा कडे काही काम होत का?’
“नाही तस खास काही नाही. ते बरेच दिवस झाले. तिला डॉक्टरला दाखवल नाही. एकदा डॉक्टरकड नेऊन आनायच होत.”
‘आम्ही चार पाच दिवसांत परत येणार आहोत. मग घेऊन जा तुम्ही तिला.’
“ठिक आहे. निघतो मी आता. पाहुण्यांना घेऊन या घरला चहा प्यायला.”
“अवनी हा माणुस मला जरा विचित्रच वाटतो.”
‘नाही जोसेफ, ते फक्त दिसायला तसे आहेत. पण मनाने खुप चांगले आहेत.’
“ह्ंम्म् असेलही. चल मला बंगला बघायचाय. तुम्ही दोघी इथे हॉल मधेच थांबा. मी माझ काम करतो. मी सांगे पर्यन्त तुम्ही ईथून कुठेही जाऊ नका.”
“अवनी बंगला खरच खुप छान आहे. ईथून कुठे जाऊच नये अस वाटतय.”
(थोड्याच वेळात जोसेफ हॉल मधे येतो.)
‘काय रे जोसेफ, काही मिळाल का तुला?’
“हे बघ जेनी, आपल्याला ईथून ताबडतोब निघाव लागेल. मी जाताना वाटेत सगळ सांगतो. आत्ता ईथून बाहेर पडू. चला लवकर.”
‘काहीतरी सांग, काय झालय?’
“अवनी आत्ता बोलायला वेळ नाहीये. पहिले ईथून बाहेर पडा नाहीतर आपण खुप मोठ्या संकटात सापडू. बसा लवकर गाडीत.”
( गाडी बंगल्याच्या रस्त्यातील धूरळा ऊडवत गावच्या बाहेर पडते. बराच वेळ शांततेत जातो. मुख्य हायवेला गाडी आल्यावर जोसेफ बोलायला सुरूवात करतो.)
“अवनी, मला सांग तुला हा त्रास कधी पासून जाणवतोय?”
‘ गेले काही दिवसच झालेत.’
“तुम्हाला बंगल्यात येऊन किती महिने झाले?”
‘सहा महिने होऊन गेले.’
“तुला सुरवातीला कसलाच त्रास झाला नाही?”
‘नाही. पहिले चार महिने काहीच जाणवल नाही.’
“रूपा बद्दल तुला काय माहिती आहे?”
‘ रुपा, फार गरीब आहेरे ती. नवरा गेल्या पासन तिच्या डोक्यावर परिणाम झाला होता. पाटिलांनी तिच्यावर उपचार केले. विषेश म्हणजे, जेव्हा पासून रुपा बंगल्यात आली तिच्यात खुप फरक पडला. ती एकदम नीट झाली. मला तर आता तिच्या मदतीची ईतकी सवय झालीये. पण तु तिच्या बद्दल का विचारतोयस?’
“अवनी, मी बंगल्याची पाहणी केली. मला तिथे जे काही अनुभव आले. त्या वरून अस जाणवल की पुढ्च्या काही दिवसांत काहीतरी भयंकर घडणार आहे. तु माझ्याशी बोलताना एकदा म्हणाली होतीस की रुपाला तू कसली तरी पुजा करताना बघितलस. मला जरा तिचा संशय येतोय. तिच्या बद्दल मला अजुन माहीती काढावी लागणार आहे. या बंगल्याला पण मला परत एकदा भेटाव लागणार आहे. पण त्या वेळी तुम्ही दोघी माझ्या बरोबर नसाल. मला एकट्यालाच याव लागणार आहे.”
‘जोसेफ अस काय आहे त्या बंगल्यात. काय घडणार आहे पुढच्या काही दिवसांत’
“आत्तातरी नेमक काय घडणार आहे ते मला सांगता येणार नाही. त्या साठीच मला परत तिथ जाव लागणार आहे. तूला अजुन एक खबरदारी घ्यावी लागेल. रुपाला आपला कुठलाही संशय येता कामा नये. तुला तिच्यावर नजर ठेवायची आहे. मी तुला काही गोष्टी सांगतो. तु त्या प्रमाणे सगळ कर. तुझ्या जीवाला मला धोका जाणवतोय. मी काही मंतरलेल्या गोष्टी तुला देतो. तु त्या कायम तुझ्या जवळ ठेव. कुठल्याही परिस्थितीत त्या तुझ्या पासुन दूर जाता कामा नये. कदाचित आजची रात्र तुला काही भास होणार नाहीत. मी बंगल्यात काही मंत्रोच्चार करून आलोय”

( सकाळची वेळ; आईची नाष्ट्याची गडबड चालू असते. आज सुट्टीचा वार असल्यामुळे बाबा पण घरी असतात. रूपा बाहेर अंगणात झाडांची मशागत करत असते.)
“काय ग, अवनी आज अजून उठली नाही?.”
“अहो काल पिकनिकला गेली होती ना, दमली असेल. म्हणुन मीच ऊठवल नाही तिला. झोपू द्या थोडा वेळ. तुम्ही नाष्टा करून घ्या. आज जरा रूपा कडून मला बागेत नवीन झाड लावून घ्यायची आहेत. अरे अवनी ऊठलीस बाळ. कशी झाली पिकनिक. काल आलीस आणि लगेच बेडरूम मधे जाऊन झोपलीस.”
‘ह्म्म्म् छान झाली. मला पण नाष्टा दे.’
“अवनी आज मला सुट्टी आहे. मस्त गप्पा मारू आज. चालेलना तुला, का काही प्लान आधीच ठरलाय तुझा”
‘नाही ओ बाबा. आहे मी घरी आज. बोलूयात आपण’ ( तेवढ्यात अवनीचा फोन वाजतो. मोहितचा कॉल असतो. अवनी फोन उचलते आणि बोलत बोलत अंगणात जाते.)
“सॉरी अवनी, तुला दोन दिवसांत फोन नाही करता आला. ईथे आलो आणि माझा फोनच खराब झाला. आजच आलाय नीट करून. पहिला फोन तुला लावला. कशी आहेस?, आई बाबा कसे आहेत.”
‘मी मजेत. आई बाब पण मजेत. खुष आहेत खुप मी रहायला आले म्हणुन. तुझी मिटींग कशी चाललीये?’
“ काही विचारु नकोस. ईथे आल्यापासून काहीन काही चालूच आहे. पहिले माझा फोन बंद पडला. मग काय…. आम्ही ज्या हॉटेलवर उतरलोय तिथून ऑफिस बरच लांब आहे. ट्रॅफिक मधे अडकल्यामुळे आम्ही वेळेत पोहोचलोच नाही मिटींगला. त्या दिवशीची मिटींग कॅन्सल झाली. त्यामुळे आता कदाचीत अजुन एखादा दिवस वाढेल आमचा रहायचा. हॉटेल पण काही खास नाही. रात्री नीट झोप होत नाही. कसलेतरी आवाज येत असतात सारखे. आपल्या बंगल्यात यायचे ना तसे.”
‘मोहित अजुन काही जाणवत का तुला तिथे. मला जरा भिती वाटायला लागलिये. हे बघ अस कर, तू परत ये ईकडे.’
“अवनी अग अस काय करतेस. यात घाबरण्यासारख काय आहे. नवीन जागी अश्या गोष्टी घडतच असतात. चल मी नंतर बोलतो मिटींगला निघायची वेळ झाली.’
‘ठिक आहे, पण काळजी घे स्वताची. फोन कर आणि मला.’
(बोलता बोलता अवनीच लक्ष रुपा कडे जात. झाडांच्या फांदीत ती काहीतरी अडकवत असते. ती थोडी पुढे जाते. तेवढ्यात रुपा मागे बघते. त्या वेळी रुपाचा चेहरा बघून अवनी घाबरते. विखूरलेले केस, लाल बूंद डोळे, घामजलेला चेहरा, चेहर्यावर विचित्र असे भाव. अवनी तिच रूप बघून घाबरून आत जाते.)
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांचे धन्यवाद प्रतिसादाबद्दल. गुढ उकलण्यासाठी अजून प्रतिक्षा करावी लागेल.