सोनेरी गवत भाग ३

Submitted by निर्झरा on 28 July, 2017 - 05:34

https://www.maayboli.com/node/63245 भाग १
https://www.maayboli.com/node/63260 भाग २
आधीच्या भागात...
“तुम्हाला म्हणुन सांगते, रुपाचा नवरा मांत्रिक झाला होता. त्याचीच विद्या त्याच्यावर उलटली म्हणे. कसलीतरी अघोरी पूजा करताना. त्याच्याच बाबाने त्याला मारल. तस नक्की कोनालाच माहित नाही त्यो कसा मेला. लोक तोंडाला येईल ते बडबड करतात. कही जण म्हणतात जंगलातल्या प्राण्यान खाल्ल त्याला. पन तुम्ही हे का विचारता.”
‘नाही असच. ते रुपा…’
(तेवढ्यात पाटिल येतात.)

ईथून पुढे.....
(तेवढ्यात पाटिल येतात.)
“अरे! वहीनीसाहेब, आज ईकड कशा काय आला? काही काम होत का आमच्या कड? बंगल्यावर सगळ ठिक आहे नव, अन आमची रुपा कशी हाय? काम करतेय ना की बदलून कोणी दुसर देऊ तुम्हाला.”
‘ अहो पाटील बंगल्यावर सगळ ठीक आहे. रुपा पण मजेत आहे. थोड सामान खरेदी करायच होत म्हणून आले. जाता जात तुमच्याकड चहा साठी थांबले. निघते मी. संध्याकाळच्या आत बंगल्यावर पोहोचायच.’
( अवनी बंगल्यावर पोहोचते. एव्हाना बाहेर काळोख दाटून आलेला असतो. दिवसभराच्या थकव्याने जेवण करून ती लगेच झोपते. मध्यरात्री अवनी अचानक किंचाळून जागी होते. कोणी तरी तिचा गळा आवळतय अस तिला वाटत असत. रुपा पाणी प्यायला देते.)
“काय झाल ताई अस का ओरडला..”
‘रुपा मला बहूदा विचित्र स्वप्न…. नाही नाही हे स्वप्न न्हवत. माझा कोणी तरी गळा आवळत होत. अस वाटल की माझ्या आजूबाजूला कोणीतरी होत.
(रुपा काहीच बोलत नाही. थोड्यावेळ शांततेत जातो. रात्रभर दोघी जाग्या राहतात. अवनीला मात्र कसलेतरी आवाज येतच असतात. बाहेर उजाडू लागत. रात्रीच्या जागरणाने अवनी पेंगायला लागते. रुपा तिला झोपायला सांगते आणि किचन मधे आवरायला जाते. दुपारची वेळ होऊन जाते तरी अवनी झोपलेलीच असते. दाराची बेल वाजते. रुपा दार ऊघडते. दारात मोहित उभा असतो.)
“रुपा अवनी कुठे आहे?”
“ताईसाहेब झोपल्यात”
“क्काय? आत्ता काही झोपायची वेळ नाही. बर नाही का तिला.” ( अस म्हणत मोहित आणि रूपाअवनी जवळ जातात. मोहीत तिच्या कपाळाला हात लावून बघतो. तेवढ्यात अवनीला जाग येते.)
‘मोहित कधी आलास तू? रुपा मला जाग नाही आली तर तू तरी मला उठवायच.’
“अग् आत्ताच येतोय. तू हव तर आराम कर. तब्येत बरी नाही का तुझी?’
‘ मला काय झालय. अरे काल गावात गेले होते थोड सामान आणायला आणि घराची पण आवरा आवर केली त्यानी जरा दमले म्हणून झोप लागली बाकी काही नाही’.
(अवनीचे पुढचे दोन दिवस मात्र मजेत जातात. मोहितनी सुट्टी टाकलेली असते. दोघे जण दोन दिवसाचा ट्रिपचा प्लान करतात. रुपा दोन दिवस पाटलांकडे गेलेली असते. दोन दिवसाच्या ट्रिप वरून अवनी आणी मोहित परत येतात. येताना पाटलांच्या घरून रुपाला पण घेऊन येतात.)
“अवनी हे दोन दिवस खुप मजेत गेले. खुप दिवसांनी अशी निवांत ट्रिप झाली. तुझाही थकवा आता गेला असेल.”
‘हो मोहित. खुप फ्रेश झाल्यासारख वाटतय आता मला.’
“हम्म्म्…, उद्या पासन पुन्हा मिटींग्ज सुरू.”
‘मोहित एक सांगू का? मला ना रात्री या बंगल्यात काही विचित्र भास होतात. कोणीतरी माझा गळा दाबतय अस वाटत.’
“हे बघ हे तुझ्या मनाचे भास आहेत बाकी काही नाही. तुला एवढ्या मोठ्या घरात एकटीला रहायची सवय नाही त्यामुळे होत असेल अस. नाही नाही ते विचार तुझ्या डोक्यात येतात आणि त्याचे तुला भास होतात. तुला माहीती आहे माझा या असल्या गोष्टींवर विश्वास नाही.”
(रात्री अवनीच्या आवाजाने मोहितला जाग येते. अवनी कण्हत असते. मोहित तिच्या कपाळाला हात लावतो. ती तापानी फणफणत असते. रात्रभर मोहित मीठाच्या पाण्याच्या पट्ट्या तिच्या कपाळावर ठेवत असतो. पावसाळी हवा नसून देखील हवेत एक प्रकारचा दमट पणा मोहितला जाणवतो. अचानक बाहेर सोसाट्याचा वार सुरू होतो आणि हवेत गारवा पसरतो. नेमक काय घडतय हे मोहितला कळत नाही. कधी गारवा तर कधी दमटपणा. तो खोलीच्या खिडकीजवळ जाऊन बाहेरच्या वातावरणाचा अंदाज घेतो. त्याच लक्ष खिडकीच्या खाली जाते. काहीतरी जळत असल्याच आणि त्यातून धुर निघत असल्याच त्याला दिसत. काय झाल आहे ते पाहण्यासाठी तो खाली जातो. पण त्या जागी काहीच नसत. तो पुन्हा खोलीत अवनी जवळ येतो. थोड्यावेळातच बाहेर सुर्यकिरणे दिसू लागतात. पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू येऊ लागतो. अवनीला जाग येते. मोहित तिच्या कपाळाला हात लावून बघतो, तिच्या अंगात ताप नसतो. मोहीत अवनीला रात्री काय झाल होत म्हणून विचारतो. तिला काहीच आठवत नसत. तिच्या अंगात रात्रभर ताप असल्याच मोहित तिला सांगतो आणि तिला आराम करायला सांगतो. आल्याच्या कडक चहा तिच्यासाठी घेऊन येतो. त्याची मिटींग तो पोस्टपोन करतो. दिवसभर तो अवनी जवळ बसून राहतो. त्यालाही आता तीची काळजी वाटू लागते.)
‘मोहित अरे किती वेळ अस अंथरूणात पडून राहू मी. कंटाळा आला मला झोपून. संध्याकाळ झाली. तु मला काही काम पण करू दिल नाहीस. तुला सांगीतल ना मला काही झाल नाही म्हणुन. उगीच तुझी आजची मिटींग कॅन्सल केलीस. मला आता रात्रीचा स्वय्ंपाक तरी करू दे.’
“अवनी रात्री तुला ईतका ताप होता मी घाबरलो होतो. तुला डॉक्टर कडे न्यायच म्हणुन मी मिटींग पोस्टपोन केली. तु मात्र काहीच झाल नाही अशी वागतीयेस. डॉक्टरकडे यायलापण नकार दिलास. पुन्हा दिवसभरात तुला काही झाल असत म्हणजे. म्हणून मी घरी राहिलो. मी उद्यापासन बाहेर गेलो की आठदिवसांनीच परत येईल. तुझी काळजी घेणार ईथ कोणीच नाही. अशा अवस्थेत तुला सोडून पण जाता येत नाही.”
‘अरे पण अस किती दिवस मिटींग पुढे ढकलशील आणि घरी थांबशील. तु गेल्यावर मला एकटीलाच रहायचय ईथे.’
“ तोच विचार करतोय मी. मी गेल्यावर तू आजारी पडलीस तर कोण आहे ईथे तुझ्याकडे बघायला. आपण अस करूयात का, तू काही दिवस तुझ्या माहेरी जा.”
‘ हम्म चालेल , तसही खुप दिवस झालेत ईथे आल्यापासुन आई- बाबांना भेटले नाहीये. मी जाते माहेरी.’
(अवनी काम करायला किचन मधे येते. रुपा तिला आराम करायला सांगते. जेवणाची तयारी तिनी केव्हाच केलेली असते. रात्री जेवण आटपुन सगळे झोपायला जातात.)
‘मोहित तुझी बॅग पॅक करून झाली का? नीट चेक कर काही राहील तर नाही. या वेळेस तू मला काहीच मदत करू दिली नाहीस तुझी बॅग भरायला.’
“असूदेग, नेहमी तुच तर भरतेस बॅग. आज मी भरली तर काय झाल. चला सगळी तयारी झाली.”
‘मोहित दिवसभर झोपल्याने मला आता झोप येत नाहीये.’
“मग काय करूयात अस म्हणन आहे राणीसाहेबांच. उद्या मला जायच आहे ते माहिती आहे ना. मला तर झोपावच लागेल.”
‘आपण थोडावेळ गप्पा मारूयात का. कदाचीत गप्पा मारताना झोप लागेल मला.’
“ठिक आहे.”
(अवनी आणि मोहित बराच वेळ गप्पा मारत असतात. तेव्ढ्यात मोहितला काही आवाज ऐकू येतात.)
“ए, तुला कसला आवाज आला का ग…”
‘कसला?, नाही मला कसलाच आवाज येत नाहीये.’
“अग नीट ऐक, कुणीतरी बोलतय असा आवाज येतोय.”
‘ए… तु मला उगाच घाबरवू नकोस हं, मला माहितीये तु मुद्दाम करतोयस हे सगळ’
“ नाही, मी मुद्दाम नाही करत आहे. थांब मी बघुन येतो.”
‘मी पण येते’
नको, तु थांब ईथेच मी आलो बघुन, ती बॅटरी दे मला
(थोड्याच वेळात मोहित रूम मधे येतो)
‘काय रे काय झाल, मिळाल का काही’
“नाही , मी खाली गेलो तर सगळी दार बंद होती…. रूपा खोलीत कुठेच न्हवती. मग मी मेन दरवाजा उघडून बाहेर जाउन पाहिल तर काहीच न्हवत. मी दार बंद करुन आत आलो तर… रूपा हॉल मधे शांत झोपली होती.”
तुला पण भास झाला असेल. तु नको जास्त विचार करू. झोप आता. मलापण झोप आलीये.’
-----------------------------------------------------------------------------------------------------------
(रुपाची आणि अवनीची सकाळची नाष्ट्याची गडबड चालू असते.)
‘रूपा काल तुला काही आवाज आला का बाहेरून?’
“काल रातच्याला, नाही मी तर झोपलेच होते.”
बर ते जाऊदे साहेबांचा नाष्टा तयार आहे का, लवकर लाव टेबलवर.
“व्वा ! आज खमंग वास येतोय किचन मधुन. काय केलय नाष्ट्याला?”
‘तुझ्या आवडीची थालपीठ’
‘ह्यायेत का मोहित साहेब?’
“अरे !, पाटिलसाहेब याना या. रुपा नाष्टा लाव अजुन एक”
‘नको नको, मी नाष्टा करून आलोय घरन.’
“बोला पाटिलसाहेब आज कस काय येण केलत ईकड.”
‘खुप दिस झाले. तुमची गाठ नाही पडली. अन वहिनीसाब पण गावाकड आल्या नाहीत. काळजी वाटली म्हणून आलो.’
‘अहो पाटिलसाहेब मागच्या वेळेला मी सगळ सामान भरल ते अजुन पुरलय मला. गावात काही काम पडलच नाही, म्हणून येण नाही झाल. तुम्ही थोडा नाष्टा करा. मी रुपाला सांगते गरम गरम थालपीठ करायला.’
“नाही नको, रुपा कुठ हाय मला जरा तिच्याशी बोलायचय.”
‘आत नाष्टा बनवतिये, बोलवते, रूपा.. ए रूपा, पाटिलसाहेब आलेत बघ.’
“आले ताईसाहेब, बोलाजी काय काम हाय माझ्याकड”
“तुमची काही हरकत नसेल तर मला रूपाशी जरा एकांतात बोलायचय.”
“हो चालेल की आमची काय हरकत असणार, तुम्ही बोला आम्ही वर जातो.”
“नाही नाही मोहित साहेब तुम्हाला वर जायची गरज नाही. आम्ही बाहेर आंगणात बोलतो.”
“ठिक आहे. अवनी तोपर्यंत चहा तरी ठेव साहेबांसाठी. पाटिलसाहेब मला जरा निघयची घाई आहे. तुम्ही चहा घेतल्याशिवाय जाऊ नका.”
‘मोहित सगळ घेतलस का तुझ सामान, आणि फोन कर अधुन मधुन’
“अवनी काळजी घे स्वताची. मी फोन करेनच. चल माझी गाडी आली. तू आपली गाडी घेऊन जा तुझ्या माहेरी.”
(पाटिल रुपाशी बोलून निघून जातात.)
‘रूपा, उद्या मी माझ्या माहेरी जाणारे. तुला पण घेऊन जाईल. तु एकटी इथे काय करणार.’
“उद्या?, ताईसाहेब उद्या नाई जाता येणार आपल्याला.”
‘का? तुला काही दुसर काम आहे का?’
“नाही तस नाही, म्हणजे…. कस सांगू ताईसाहेब तुम्हाला. मला काही बी समजत नाई.”
‘अग काय झालय. अस काय बोलतेयस. तुला माझ्याबरोबर यायच नाहिये का? तुला पाटलांकडे सोडू का मी?. तु तिथे रहा मी येईपर्यन्त. चल आता राहिलेल काम संपवून टाकू. मला माझी बॅग पॅक करायचीये.’
( रात्री पुन्हा अवनीला काही आवाज येतात. ती जागी होते. या वेळी पण रूपा जागेवर नसते. अवनी सगळ घर शोधते. ज्या दिशेने आवाज येत असतो अवनी त्या बाजूने चालू लागते. बंगल्याच्या मागच्या आवारातून आवाज येत असतो. अवनी बंगल्याच्या मागच्या दारापाशी येऊन पोहोचते. दाराच्या शेजारच्या खिडकिच्या फटीतून ती बाहेर बघायचा प्रयत्न करते. तिला प्रथम रूपा दिसते. ती कसलीतरी पुजा करत असते. तिच्या बाजूला कसलीतरी हालचाल अवनीला जाणवते. त्याच वेळी तिच्या शरीराला अचानक एक प्रकारचा गारवा जाणवतो. ती खिडकिची फट अजुन मोठी करते तोच ती बाहेरच दृष्य बघुन जागेवरच बेशुद्ध होते. तिला सकाळी जाग येते तेव्हा ती तिच्या अंथरुणावर झोपलेली असते.)
“ताईसाहेब ऊठलात का, चला नाष्टा तयार आहे.”
‘रूपा मी ईथे कशी आले. तु काल रात्री त्या मागच्या बाजूला..’
“ताईसाहेब, अव तुम्ही काल ईथेच झोपलातकी साहेब न्हवते म्हणुन, आनि तुम्हाला दमल्यामुळे लै गाढ झोप लागली. तुम्ही तर काहीबाही बडबडतपण हुता. मला वाटत काहीतरी स्वप्न बघितल असन तुम्ही. त्येच आठवत आसन तुम्हाला. आता जास्त विचार करू नका. आवरून घ्या, तुमच्या माहेरी जायच न्हव.”
‘अग हो, खरच की, कालच्या गोंधळात मी तर हे विसरूनच गेले होते. पण रुपा मला खरच स्वप्न न्हवत पडल. मी बघितल ते खर होत.’
“ताईसाहेब, आता पुन्हा पुन्हा तो रातचा विषय नगा काढू. चला आपल्याला उशीर होतोय. म्या पण माझ गाठोड घेतलय. म्या पन तुमच्या संगत येते.’
‘रूपा मी गाडी बाहेर काढते, तू दार बंद करून कुलूप लावून बाहेर ये. अरे देवा हे काय ?’
“काय झाल ताईसाहेब?’
‘अग गाडी पंक्चर आहे. आता स्टेपनी लावून काम चालवाव लागणार त्यात अजुन वेळ जाणार आणि आपल्याला उशीर होणार.’
“ मला वाटलच हुत तो आपल्याला जाऊ देणार न्हाई ते. तरी म्या त्याला सांगीतल हुत. आम्हाला ईथून जाऊदे म्हणुन’
‘अग कोण जाऊ देणार नाही, कोणा बद्दल बोलतियेस तू, काय बडबडतियेस सांगशील का मला?’
“ताईसाहेब, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार न्हाई, पण तरी बी तुम्हाला सांगते. माझा नवरा….., माझा नवरा आपल्याला ईथन जाऊ देणार न्हाई. हे गाडीला त्यानच खराब केलय. म्या उगाच तुमच्या पासन सगल लपवल. आन त्याला मदत केली. काल रातच्याला तुमी जे बघितल ते सगळ खर हुत. तुमच स्वप्न न्हवत ते”
‘रूपा…. तुझा नवरा तर जिवंत नाही मग तो हे सगळ कस करेल.’
“‘होय. तो जीता न्हाई. पण त्यो इथ हाय. तुम्ही जे पाहिल ते खर होत. मी काल पुजा करत होते. ‘त्या सोनेरी गवताची”
‘रूपा मला वाटतय तुला जरा आरामाची गरज आहे. गेले काही दिवस खुप काम पडल तुझ्यावर आपण परत आलो की एकदा डॉक्टरकडे जाऊन येऊ. चल झाली माझी स्टेपनी बदलून. बस गाडीत.’
---------------------------------------------------------------------------------------------------------
(अवनी आणि रुपा तिच्या माहेरी येतात)
‘आई….. आई मी आलेय.’
“अवनी अग किती उशीर. सकाळी निघणार होतीस. किती वाजलेत बघ आता. एकतर एकटीच होतीस ड्राईव्ह करायला.”
‘कशाला काळजी करतेस आई. मी का आता लहान आहे. अग आम्ही सकाळीच निघालो होतो. पण निघतानाच गाडीनी त्रास दिला. म्हणून उशीर झाला.’
“बर चला आता फ्रेश व्हा, मी चहा टाकते.”
‘रूपा या खोलीत तुझ सामान ठेव. माझी खोली वरती आहे. तुला काही लागल तर मला किंवा आईला हाक मार. तु आता आराम कर. जेवायच्या वेळेला मी उठवते तुला.’
‘आई काय मस्त जेवण बनवलयस ग, खुप दिवसांनी तुझ्या हातच खायला मिळाल.’
“तु येतेच कुठे ईथे माझ्याकडे रहायला. आताही मोहित नाही म्हणुन आलीस, नाहीतर ही अशी सकाळी यायची आणी संध्याकाळी निघुन जायची.”
‘आई आता चक्क आठ दिवस आहे मी तुझ्याकडे. बघच आता माझे सगळे लाड करून घेणारे मी तुझ्या कडून. आई मला खुप झोप येतीये मी जाते झोपायला आपण उद्या मस्त गप्पा मारूयात.’
( रात्रीचे दोन वाजतात. अवनीला बाहेरून काही आवाज ऐकू येतात. ती जागी होते. ते आवाज तिला ओळखीचे वाटतात. ती रूमच्या गॅलरीत येते आणि ईकडे तिकडे बघते. पण तिला कोणीच दिसत नाही. ती रुम मधे जायला वळते तेवढ्यात तिला रूपा मेन गेट मधून आत येताना दिसते. अवनीची नजर रस्त्यावर कोणी दिसते का ते शोधू लागते. तेवढ्यात….. तेवढ्यात तिला रस्ताच्या कडेला ते ‘सोनेरी गवत’ दिसते. एक क्षण तिला काहीच कळत नाही की काय घडतय. तिला पुन्हा हवेत गारवा जाणवू लागतो. बाहेर शीतल चांदण असुन सुद्धा सगळीकडे काळाकुट्ट अंधार झाल्या सारख वाटत. तिला वाटत की तिला काही तरी आजार झालाय ज्या मुळे तिला काही विचित्र गोष्टींचे भास व्हायला लागलेत. ती गॅलरीच दार बंद करते आणि झोपते. खर तर तिच्या डोळ्यांसमोर सारख बाहेरच चित्र ऊभ रहात असत. शेवटी डोक्यावर पांघरूण ओढून ती कशीबशी झोपायचा प्रयत्न करते.)
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users